दुधाचा चहा प्यायल्याने आरोग्यावर होणारे दुष्परिणाम
झोपेतून उठल्यानंतर अनेकांना सगळ्यात आधी चहा लागतो. चहा प्याल्याशिवाय त्यांची सकाळचं होत नाही. पण सकाळी उठल्यानंतर दुधाचा चहा प्यायल्याने आरोग्य बिघडण्याची शक्यता असते. दिवसाची सुरुवात चहाने केल्यानंतर दिवसाचा शेवट सुद्धा अनेक लोक चहानेच करतात. झोपेतून उठल्यानंतर दूध, साखर, चहाची पाने आणि आले किंवा वेलची इत्यादी मसाल्याचे पदार्थ वापरून चहा बनवला जातो. पण हा चवीला चांगला असला तरीसुद्धा आरोग्यासाठी घातक आहे. दुधाचा चहा हा व्यसनासारखाच आहे, म्हणून दुधाचा चहा पुन्हा पुन्हा प्यावा असे वाटते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला दुधाचा चहा प्यायल्याने आरोग्यावर नेमके काय दुष्परिणाम होतात, हे जाणून घेऊया.(फोटो सौजन्य-istock)
सतत दुधाचा चहा प्यायल्याने आरोग्यावर त्याचे गंभीर परिणाम दिसून येतात. दुधाच्या चहामुळे ऍसिडिटी किंवा अपचन होण्याची शक्यता असते. त्यामुळे सकाळी उठल्यानंतर शक्यतो काळा चहा प्यावा. काळा चहा आरोग्यासाठी फायदेशीर आहे.
दुधाचा चहा प्यायल्याने आरोग्यावर होणारे दुष्परिणाम
दुधाच्या चहामध्ये थिओफिलिन आढळून येते, ज्यामुळे शरीरात बद्धकोष्ठता वाढू लागते. त्यामुळे लहान मुलांना चहा देऊ नये. दुधाचा चहा प्यायल्याने शरीरामध्ये प्रोटिन्स आणि प्रथिनांची कमतरता जाणवू लागते. तसेच शरीरामध्ये लोह आणि झिंकची कमतरता निर्माण होते.
हे देखील वाचा: व्यायाम न करता पोटावरील चरबी कमी करायची असेल तर ‘हे’ ड्रिंक नक्की प्या
सतत चहा प्यायल्यामुळे झोप कमी होऊन जाते. दुधाच्या चहामध्ये असलेले गुणधर्म आरोग्यासाठी घातक ठरतात. चहामध्ये असलेले कॅफिन झोपेचे चक्र पूर्णपणे बिघडून जाते.
दुधाचा चहा प्यायल्याने आरोग्यावर होणारे दुष्परिणाम
अतिप्रमाणात दुधाच्या चहाचे सेवन केल्यामुळे वजन वाढण्यास सुरुवात होते. शरीरामध्ये अतिरिक्त चरबी जमा होऊ लागते, जी आरोग्यासाठी घातक आहे. दुधाच्या चहामध्ये फुल फॅट दूध आणि साखर असते ज्यामुळे वजन वाढते. दुधाचा चहा प्याल्यामुळे डोकेदुखी, आम्लपित्त, उलट्या, मळमळ, भूक न लागणे, चिंता इत्यादी अनेक समस्या जाणवू लागतात.