भारतामध्ये स्ट्रीट फूड मोठ्या प्रमाणावर खाल्ले जाते. यामध्ये जिलेबी, समोसा, वडापाव, चायनीज यांसारखे पदार्थ सगळ्यांना आवडतात.तर गोड पदार्थांमध्ये केक, पेस्ट्री, डोनट्स यांना मोठी मागणी आहे. पण रोजच्या आहारात जास्त प्रमाणात गोड असलेले पदार्थ खाणे शक्य होत नाही. आहारात जास्त गोड पदार्थांचे सेवन केल्याने लठ्ठपणा, कोलेस्ट्रॉल यांसारख्या समस्या वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे आहारात कमीत कमी गोड आणि तेलकट पदार्थ खाल्ले पाहिजेत. जर तुम्हाला घरच्या घरी पार्टीसाठी किंवा संध्याकाळच्या नाश्त्यासाठी काही पदार्थ बनवायचे असतील तर आम्ही तुम्हाला काही पर्याय सांगणार आहोत.हे पदार्थ तुम्हाला नक्कीच आवडतील. चला तर जाणून घेऊया..
मटर कुलचा:
मटार कुलचा हा पदार्थ उत्तर भारतातील पंजाब आणि आजूबाजूच्या परिसरात बनवला जाणारा फेमस पदार्थ आहे. हा पदार्थ स्ट्रीट फूड पदार्थांमध्ये येतो. मटार कुलचा बनवण्यासाठी मटार उकळून त्यात कच्चा कांदा, टोमॅटो, धणे, हिरवी मिरची आणि विविध मसाले टाकून मिक्स करून घ्या. त्यानंतर मटारपासून बनवलेला मसाला कुलचासोबत खाण्यासाठी दिला जातो. हा पदार्थ तुम्ही संध्याकाळच्या नाश्त्यासाठी किंवा रात्रीच्या जेवणामध्येसुद्धा बनवू शकता.
ढोकळा:
ढोकळा हा गुजराती पदार्थ आहे. हा पदार्थ आरोग्यासाठी फायदेशीर आहे. ढोकळा बनवण्यासाठी आंबवलेला तांदूळ आणि बेसन यापासून बनवला जातो. तसेच काही ठिकाणी हरभऱ्याची डाळ वापरली जाते. तसेच ढोकळ्याला वरून फोडणी देण्यासाठी हिरवी मिरची, आले, मीठ आणि मोहरी वापरली जाते. यामुळे ढोकळ्याची चव आणखीन सुंदर लागते.
[read_also content=”तुम्ही सुद्धा उन्हाळ्यात ऊसाचा रस पिण्याला प्राधान्य देताय? याआधी जाणून घ्या तोटे https://www.navarashtra.com/lifestyle/disadvantages-of-drinking-sugarcane-juice-in-summer-538732.html”]
मोदक:
जर तुम्हाला कमी गोड पदार्थ खायचा असेल तर तुम्ही मोदक बनवू शकता. गणेश चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पाला नैवेद्य म्हणून मोदक दाखवला जातो. मोदक बनवण्यासाठी सोपा असल्याने खास प्रसंगी तुम्ही मोदक बनवू शकता. मोदकांची चव इतकी सुंदर असते की प्रत्येकालाच मोदक खाण्यासाठी आवडतात. मोदक तोंडात टाकल्यानंतर लगेच विरघळून जातात.






