Coffee Drinking: आपल्याला दिवसभरात अनेकदा कॉफी पिण्याची सवय असते. कोणा-कोणाला उठल्यावर, ऑफिसमध्ये अनेकदा काम करताना किंवा दिवसभरात खूप वेळेस कॉफी पिण्याची सवय असते. कॉफी हे जगातील लोकप्रिय पेयांपैकी एक आहे. सकाळपासून रात्रीपर्यंत अनेकदा कॉफीचे सेवन केले जाते. कॉफी पिण्याचे अनेक फायदे आहेत, तसेच कॉफीचे बऱ्याच प्रमाणात सेवन करणे घातक देखील ठरू शकते.
कॉफीचे खूप प्रमाणात सेवन करण्यास शरीरास घातक ठरू शकते. आरोग्याच्या समस्या वाढू शकतात. आज आपण कोणी कॉफीचे सेवन करण्यापासून स्वतःला रोखले पाहिजे, याबाबत जाणून घेऊयात.
कोणत्या लोकांनी कॉफीचे सेवन केले नाही पाहिजे?
गरोदरपणात
गर्भवती महिलांना कॉफीचे सेवन टाळण्याचा सल्ला दिला जातो. कॅफिनचे सेवन केल्याने गर्भाच्या विकासावार परिणाम होण्याची शक्यता असते. गर्भपात किंवा अकाली प्रसूतीचा धोका वाढू शकतो. WHO च्या माहितीनुसार, गरोदरपणात 200 मिलीग्रामपेक्षा कॅफिनचे सेवन
करू नये.
झोपेची समस्या असल्यास
ज्यांना शांत झोप लागत नाही किंवा ज्यांना झोपेची समस्या आहे, त्या लोकांनी कॉफीचे सेवन करण्यापासून वाचले पाहिजे. कॅफिन एक प्रकारचे उत्तेजक असून, मध्यवर्ती मज्जासंस्थेला सक्रिय करते. त्यामुळे तुम्हाला झोप येण्यास कठीण होते. खूप झोप येत नाही.
मायग्रेनचे रुग्ण
तज्ञ लोकांच्या सांगण्यानुसार, मायग्रेनचे रूग्ण असल्यास त्यांच्यासाठी कॉफीचे सेवन घातक ठरू शकते. कॅफिन हे मायग्रेनला ट्रीगर करते. त्यामुळे कॉफीचे सेवन करणे टाळावे.
हृदयाशी संबंधित आजार
ज्या लोकांना हृदयाशी संबंधित आजार आहेत, त्यांनी कॉफीचे सेवन करण्यापासून वाचले पाहिजे. कॅफिनमुळे ब्लड प्रेशर आणि हार्ट रेट वधू शकतो. जे हृद्यसाठी धोकादायक ठरू शकते. त्यामुळे डॉक्टरांचा सल्ला घेऊन कॉफीचे सेवन करावे.
काचबिंदु असल्यास
काचबिंदु हा गंभीर नेत्र रोग आहे. यामध्ये हळूहळू डोळ्यांची दृष्टी कमी होऊ लागते. त्यामुळे आशा लोकांनी देखील कॉफीचे सेवन करणे टाळले पाहिजे.
लिंबूच नाही तर लिंबाची सालही देते कमालीचे फायदे
आपण लिंबू वापरुन त्याचे साल फेकून देतो. कारण आल्याला त्याचे फायदे माहिती नसतात. मात्र असा विचार करणे चुकीचे आहे. लिंबू वापरुन झाल्यावर त्याचे साले देखील आपल्या उपयोगात येऊ शकते. चालला तर आज आपण लिंबांच्या सालीचे काय काय फायदे आहेत, ते जाणून घेऊयात.
महत्वाची टीप: आम्ही दिलेला लेख हा उपलब्ध माहितीच्या आधारावर दिला आहे. त्यामुळे कोणताही उपाय करण्याच्या आधी डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्यावा.