वयाच्या ९० व्य वर्षी हृदय राहील कायम हेल्दी! घरबसल्या नियमित करा 'ही' योगासने
जगभरात हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू होणाऱ्या लोकांच्या संख्येत वाढ झाली आहे. शरीरात वाढलेले खराब कोलेस्ट्रॉल आरोग्यासाठी अतिशय घातक आहे. कोलेस्ट्रॉलची पातळी वाढल्यानंतर शरीरात अनेक बदल दिसून येतात. रोजच्या आहारात मसालेदार, तिखट आणि तेलकट पदार्थांचे सेवन केल्यामुळे शरीरात पिवळ्या रंगाचा चिकट थर जमा होण्यास सुरुवात होते. हा थर हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये साचून राहण्यास सुरुवात झाल्यानंतर आरोग्य बिघडते. धावपळीची जीवनशैली, कामाचा वाढलेला ताण, अपुरी झोप, आहारात सतत होणारे बदल इत्यादी अनेक बदलांमुळे आरोग्य बिघडून जाते. शरीरात कोलेस्ट्रॉल वाढल्यानंतर हार्ट अटॅक येण्याची जास्त शक्यता असते.(फोटो सौजन्य – istock)
शरीरात वाढलेले कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्याने औषध उपचार करावे. याशिवाय तुम्ही नियमित योगासने करू शकता. योगासने केल्यामुळे शरीरात अनेक सकारात्मक बदल दिसून येतात. नियमित योगासने केल्यामुळे शरीराचे रक्तभिसरण सुधारण्यास मदत होते. आज आम्ही तुम्हाला हृदयाचे आरोग्य कायम निरोगी आणि हेल्दी ठेवण्यासाठी कोणती योगासने करावीत, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. ही योगासने शरीरात अनेक सकारात्मक बदल घडवून आणतात.
ताडासन करणे आरोग्यासाठी अतिशय प्रभावी आहे. योगासने केल्यामुळे मानसिक तणाव कमी होतो. याशिवाय शरीराचे रक्तभिसरण सुधारते. शरीराला स्ट्रेच करण्यासाठी नियमित ताडासन करावे. हे आसन केल्यामुळे मसल्सवरील ताण कमी होतो आणि बॉडीची पोश्चर सुधारण्यास मदत होते. ताडासन करताना सर्वप्रथम ताठ उभे राहावे. त्यानंतर दोन्ही हात शरीरापासून लांब करावे. त्यानंतर तळव्यांवर उभे राहावे. हे आसन नियमित केल्यास काही दिवसांमध्येच शरीरात अनेक बदल दिसून येतील.
वृक्षासन म्हणजे झाडासारखे आसन. हे आसन नियमित केल्यास शरीरात स्थिरता, संतुलन आणि सहनशक्ती वाढण्यास मदत होते. शरीरात वाढलेला कोलेस्ट्रॉल नियमित ठेवण्यासाठी नियमित वृक्षासन करावे. सकाळी उठल्यानंतर नियमित वृक्षासन केल्यामुळे मांड्या, खांदे, छाती या अवयवांना व्यवस्थित स्ट्रेच मिळतो. याशिवाय कोलेस्टरॉलमुळे बंद झालेल्या रक्तवाहिन्या मोकळ्या होण्यास मदत होते. वर्षाच्या बाराही महिने नियमित योगासने केल्यास शरीर कायम सुदृढ आणि निरोगी राहील. वयाच्या ९० व्या वर्षीसुद्धा कायम तुम्ही निरोगी राहाल.
International Yoga Day: 8 तास बैठे काम, वाढतोय लठ्ठपणा; मात करण्यासाठी वापरा 7 Desk Yoga चे प्रकार
योग विज्ञानातील महत्वाचे आसन म्हणजे त्रिकोणासन. हे आसन करताना ३० सेकंदाचा वेळ लागतो. याशिवाय यामुळे टाचा, ग्रोईन, मांड्या, खांदे, गुडघे, हिप्स, हॅम्स्ट्रीग, थॉरेक्स आणि रिब्सवर ताण येतो. ज्यामुळे शरीरात वाढलेला मानसिक तणाव, स्ट्रेस कमी होऊन मन कायमच आनंदी राहते. मानसिक तणाव कमी करण्यासाठी त्रिकोणासन करावे.