मुदतपूर्व प्रसुतीस विविध घटक कारणीभूत ठरतात
गर्भधारणेचे 37 आठवडे पूर्ण होण्यापूर्वी बाळ जन्माला आल्यास त्याला मुदतपूर्व (प्रीमॅच्युअर) बाळ म्हटले जाते. मुदतपूर्व प्रसुतीस विविध घटक कारणीभूत ठरतात. यामध्ये मानसिक आरोग्याच्या समस्या, गंभीर संक्रमण, जुळ्या किंवा तिळ्या बाळांची गर्भधारणा, नाळेची समस्या, आईचे वय, धूम्रपान, तणाव, उच्च रक्तदाब किंवा मधुमेहासारख्या आरोग्यविषयक परिस्थितींचा समावेश असू शकतो.
ही मुले लवकर जन्माला येतात कारण ते अधिक नाजूक असतात आणि त्यांना अधिक काळजी घेण्याची आवश्यकता असते. अकाली जन्मलेल्या बाळांना श्वासोच्छवासाच्या समस्या, कावीळ, अशक्तपणा, विकासात विलंब, आहार घेण्यात अडचण आणि गॅस्ट्रोइंटेस्टाइनल समस्या यासारख्या आरोग्य समस्यांना सामोरे जाण्याची शक्यता असते. जन्मानंतर, या अकाली जन्मलेल्या बाळांना विशेष काळजी घेण्यासाठी NICU (नवजात अतिदक्षता विभाग) मध्ये दाखल केले जाते. मुदतपूर्व जन्माच्या बाबतीत विविध गैरसमजूती आहेत. हे गैरसमज जोडप्यांमध्ये गोंधळ निर्माण करू शकतात. अकाली जन्मलेल्या बाळांना त्यांच्या वयानुसार विकासाचे टप्पे गाठण्यास मदत करणे ही काळाची गरज आहे. डॉ. अनुषा राव, नवजात शिशु व बालरोग तज्ज्ञ, अंकुरा हॉस्पिटल फॉर वूमन अँड चिल्ड्रेन, पुणे यांनी अधिक माहिती दिली आहे.
गैरसमज: गर्भवती माता मुदतपूर्व जन्म टाळू शकते
प्रिमॅच्युअर डिलिव्हरी टाळता येते की नाही
वास्तविकता: मुदतपूर्व जन्म टाळता येतो हा एक सामान्य गैरसमज आहे. बहुतेक मुदतपूर्व जन्म कोणत्याही लक्षणांशिवाय दिसून येतात ज्यांना नेहमीच प्रतिबंध करता येत नाही. वय, संक्रमण, उच्च रक्तदाब किंवा तणाव यांसारख्या जोखीम घटकांमुळे मुदतपूर्व प्रसुतीचा धोका वाढू शकतो, परंतु जोखीम घटक नसलेल्यांनाही मुदतपूर्व प्रसुतीचा अनुभव येऊ शकतो. प्रत्येक गर्भवती महिलेने प्रसूतीपूर्व काळजी घेतली पाहिजे आणि गर्भधारणेच्या प्रवासात सावधगिरी बाळगली पाहिजे.
गैरसमज – अकाली जन्मलेल्या अर्भकांच्या विकासात विलंब होतो
वास्तविकता: सर्वच अकाली जन्मलेल्या बाळांना विकासात विलंब होतो असे नाही. प्रीमी बाळांना जास्त धोका असला तरी वेळीच उपचार आणि योग्य काळजी घेऊन या विकासातील विलंब टाळता येऊ शकतो. नवजात अतिदक्षता विभाग (NICU)मध्ये योग्य उपचारांनी अकाली जन्मलेल्या बाळाची वाढ आणि विकासाला चालना दिली जाते.
नॉर्मल डिलिव्हरीनंतर टाके पडलेल्या नाजूक भागावरील त्वचेची अशी घ्या काळजी
गैरसमज : मुदतपूर्व जन्म हा आईच्या जीवनशैलीच्या निवडीमुळे होतो
निरोगी गर्भधारणेसाठी काय करावे
वास्तविकता: निरोगी गर्भधारणेसाठी आईच्या जीवनशैलीची निवड महत्त्वाची भूमिका बजावते. धुम्रपान, मद्यपान, ताणतणाव आणि संतुलित आहाराचे सेवन न केल्याने जीवनशैलीतील काही घटकांमुळे संसर्ग, एकाधिक गर्भधारणा किंवा प्रीक्लेम्पसिया सारख्या इतर कारणांमुळे अकाली जन्माचा धोका वाढू शकतो.
गैरसमज: अकाली जन्मलेल्या बाळांना स्तनपान करता येत नाही
वास्तविकता: अनेक अकाली बाळांना त्यांच्या आईच्या स्तनपाणात अडचण येते. या बाळांना योग्य काळजी आणि मातांना प्रशिक्षणाची आवश्यकता भासू शकते. जर प्रीमी बाळाला स्तनपान करता येत नसेल तर माता ब्रेस्ट पंपचा वाप करु शकतात. यासाठी स्तनपान विशेष तज्ज्ञांचा सल्ला घ्या
नॉर्मल डिलिव्हरीसाठी करा 5 व्यायाम, गायनोकॉलॉजिस्टने सांगितले रिकव्हरी होईल सोपी