योनी आणि गुदद्वारातील नाजूक भागाला पेरिनियम म्हणतात. प्रसूतीनंतर पेरिनियममध्ये वेदना आणि अस्वस्थता याला प्रसूतिपश्चात ‘पेरिनल वेदना’ म्हणतात. सामान्य प्रसूतीदरम्यान, बहुतेक स्त्रियांना पेरिनियमच्या भागावर दाब आणि स्ट्रेचिंग असते. जेव्हा बाळाचे डोके योनिमार्गातून बाहेर येते तेव्हा डॉक्टर पेरिनियम मध्ये एक लहान चीर देऊ बाळाचे डोके बाहेर काढले जाते. नंतर या चीर पाडलेल्या जागेवर टाके टाकले जातात, पण बरे होईपर्यंत या भागात दुखत असते.
पेरिनिअल टिअर( व्हजायनल टिअर) त्यांच्या आकार आणि जखमेवर आधारीत असतो आणि त्यानुसार त्याचे वर्गीकरण केले जाते. डॉ. पद्मा श्रीवास्तव, प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ज्ञ, मदरहूड हॉस्पिटल, लुल्लानगर, पुणे यांनी याबाबत अधिक माहिती आपल्या वाचकांसाठी दिली आहे. (फोटो सौजन्य – iStock)
[read_also content=”प्रिमॅच्युअर डिलिव्हरी टाळता येते का? https://www.navarashtra.com/lifestyle/causes-symptoms-risk-factors-of-preterm-birth-why-is-increasing-536661.html”]
कोणत्या आहेत 4 श्रेणी?
चीर बरी होण्यासाठी कालावधी
पेरिनिअल टीअर बरे होण्याचा कालावधी हा त्याच्या तीव्रतेनुसार बदलतो, अधिक खोलवर झालेली चीर बरी होण्यासाठी दीर्घ कालावधीची आवश्यकता भासते. हे छेद बरे होण्यासाठी किमान 2 ते 3 महिने लागू शकतात. या नाजूक भागाचे संरक्षण करण्यासाठी आणि संक्रमण टाळण्यासाठी व्हजायनल टिअर्सचे व्यवस्थापन करणे अत्यावश्यक आहे.
[read_also content=”घरच्या घरी मिळवा गुड न्यूज, मिठानेही करता येते टेस्ट https://www.navarashtra.com/latest-news/health/pregnancy-tests-can-also-be-done-with-salt-such-is-the-method-nrng-142965.html”]
घरच्या घरी कशी काळजी घ्याल?
व्हजायनल टिअर ही महिलांकरिता चिंतेची बाब ठरु शकते. त्यामुळे वेळीच उपचार करणे आवश्यक आहे.
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.