पारंपारीक पद्धतीने बनवा तुळशीच्या पानांचे पवित्र पाणी, डायबिटीज, बीपीसारख्या सर्व आजारांना ठेवेल दूर
बदलत्या वातावरणानुसार आपल्या आरोग्याची योग्य रीतीने काळजी घेणे फार महत्तवाचे आहे. अनेकदा कामाच्या व्यापामुळे लोक कमी वयातच अनेक आजारांना बळी पडतात. हे आजर दूर करण्यासाठी मग आपण विविध औषधांचे सेवन करू पाहतो. मात्र तुम्हाला माहिती आहे का? अनेक आजारांवर मात करण्यासाठी तुम्ही काही घरगुती उपायदेखील तुमच्या कामी पडू शकतात. आयुर्वेदात तुळशीला फार महत्त्व आहे. अनेक आजार दूर करण्यासाठी हीचा वापर केला जातो. मात्र तुम्हाला माहिती आहे का? तुम्ही घरीदेखील तुळशीच्या पानांचे पाणी तयार करून याचे सेवन करू शकता. या पाण्याचे नियमित सेवन केल्याने तुम्ही अनेक आजारांना दूर ठेवू शकता.
शरीरातील अनेक समस्या दूर करण्यासाठी तुळशीच्या पाणी फायदेकारक ठरते. हे पाणी बनवण्यासाठी तुम्हाला अधिक काहीही करण्याची गरज नाही. तसेच यासाठी तुम्हाला विशेष खर्चही लागत नाही. चला तर मग याचे फायदे आणि वापर याविषयी सविस्तर जाणून घ्या.
हेदेखील वाचा – वयाच्या चाळिशीतही 25 वर्षांचे दिसाल! फक्त हे अनोखे घरगुती उपाय करून पहा
तुम्ही घरच्या घरी तुळशीचे पाणी तयार करू शकता. तुळशीचे पाणी तयार करणे फार सोपे आहे. यासाठी एका पातेल्यात एक कप पाणी घ्या आणि यात 7-8 ताजी तुळशीची पाने टाका. मग हे पाणी उकळवून घ्या. नंतर हे पाणी एका ग्लासात गाळून घ्या आणि रोज सकाळी उपाशीपोटी हे पाणी पित रहा. असे केल्याने तुळशीतील औषधी गुणधर्म पाण्यात उतरतात, जे आपल्या शरीरासाठी फायदेशीर ठरतात.
तुळशीचे पाणी पचनक्रिया सुधारण्यास मदत करते. तुळशीतील एंजाइम्स पोटातील ॲसिडचे प्रमाण संतुलित ठेवतात, ज्यामुळे पचनक्रिया सुरळीत होते. यामुळे ॲसिडिटी, गॅस, आणि पोटदुखी यांसारख्या समस्या कमी होतात. पचनाच्या समस्या दूर करण्यासाठी तुळशीचे पाणी एक साधा, सोपा आणि प्रभावी उपाय आहे.
हेदेखील वाचा – करीना कपूरसारखे नॅच्युरली मिळतील लाल गुलाबी गाल, टोमॅटोने नाहीशा होतील चेहऱ्यावरील म्हातारपणाच्या खुणा
त्वचेच्या सौंदर्यवाढीसाठीदेखील तुम्ही तुळशीचे पाणी पिऊ शकता. तुळशीचे पाणी चेहऱ्यावरील मुरूम आणि डाग दूर करण्यास मदत करतात. तुळशीतील अँटीबॅक्टेरियल गुणधर्म त्वचेला स्वच्छ ठेवतात आणि चेहऱ्यावरील चमक वाढवतात. रोज सकाळी हे पाणी प्यायल्याने त्वचेचा रंग उजळतो आणि त्वचा ताजेतवाने राहते.
तुळशीमध्ये अँटीऑक्सिडेंट्स आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात, जे शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करतात. तुळशीचे पाणी रोज पिण्याने सर्दी, खोकला आणि ताप यांसारख्या लहान मोठ्या आजारांपासून संरक्षण मिळते. हे पाणी शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढून शरीर निरोगी बनवण्यास मदत करतात.