लिव्हिंग रूम कशी सजवाल, सोप्या टिप्स (फोटो सौजन्य - iStock)
घराचा सर्वात महत्वाचा भाग म्हणजे बैठकीची खोली ज्याला शहरासारख्या ठिकाणी Living Room म्हटलं जातं, कारण येथे येणाऱ्या पाहुण्यांचे स्वागत केले जाते, कुटुंबासोबत एकत्र वेळ घालवला जातो आणि ही अशी जागा आहे जी तुमच्या संपूर्ण घराची पहिली छाप सोडते. पण तुमचा बैठकीचा खोलीदेखील आता तुम्हाला कंटाळवाणी आणि जुनी वाटत आहे का?
तुम्हाला असेही वाटते का की या जागेला थोडीशी रिफ्रेशमेंट हवी आहे, पण जास्त खर्च न करता? जर हो, तर तुम्हाला तुमच्या सजावटीला थोडा मॉडर्न टच देण्याची आवश्यकता आहे. चला जाणून घेऊया काही उत्तम आणि सोप्या सजावटीच्या टिप्स ज्या तुमच्या बैठकीच्या खोलीचे सौंदर्य वाढवतील. इंटिरिअर डिझाईनर प्रसाद लाड यांनी काही सोप्या टिप्स आम्हाला सांगितल्या आहेत आणि आम्ही तेच इथे देत आहोत (फोटो सौजन्य – iStock)
भिंती सजवण्याने दिसेल अधिक सुंदर
भिंतींना द्या सुंदर आकर्षक लुक
भिंती कोणत्याही खोलीचा मूड सेट करतात. तुम्ही तुमच्या लिविंग रूमच्या भिंतींना हलक्या पेस्टल शेड्सने रंगवू शकता किंवा वॉलपेपर वापरू शकता. आजकाल ट्रेंडी वॉल आर्ट्सनाही खूप पसंती दिली जात आहे. वॉलपेपर तुमच्या पसंतीचा आणि क्लासी असावा, जेणेकरून तुम्हाला लिव्हिंग रूममध्ये बसल्यानंतर कंटाळा येणार नाही. हवं तर कॉम्बिनेशन कलर्स वापरून तुम्ही भिंतींना रंग काढावा.
Amazon.in वर ‘होम शॉपिंग स्प्री’ दरम्यान हिवाळ्याच्या हंगामासाठी तुमचे घर ठेवा सज्ज
उशा आणि पडद्यांनी मूड बदला
उशा आणि पडद्यांनी द्या आकर्षक लुक
लिविंग रूममधील सोफा किंवा खुर्चीचा लूक बदलणे कठीण असू शकते, परंतु कुशन कव्हर आणि पडदे बदलून तुम्ही संपूर्ण खोलीचा लुक सहजपणे बदलू शकता. तोच पडदा आणि उशांची कव्हरं तुम्ही नियमित बघून नक्कीच कंटाळला असणार. अशावेळी चमकदार, विरोधाभासी रंग आणि पॅटर्नसह फॅब्रिक वापरा. ऋतूनुसार पडद्यांचे आणि कुशन कव्हर्सचे कपडे निवडा, उन्हाळ्यात मलमल आणि हिवाळ्यात मखमली किंवा रेशीम वापरून लिव्हिंग रूमची शोभा वाढवा.
इनडोअर प्लांट्सचा वापर
इनडोअर प्लांट्स वाढवतील शोभा
झाडे केवळ ऑक्सिजन प्रदान करत नाहीत तर तुमच्या घराला एक नैसर्गिक आणि ताजे स्वरूपदेखील देतात. स्नेक प्लांट, मनी प्लांट किंवा एरेका पाम सारखी घरातील झाडे तुमच्या लिविंग रूमला सुंदर आणि शांत बनवू शकतात. कोपऱ्यातील टेबल किंवा खिडकीवर लहान रोपे सजवा आणि लिव्हिंग रूम अधिक सुंदर आणि आकर्षक करा
लायटिंगचा योग्य वापर
लायटिंगने द्या क्लासी लुक
फक्त चांगली प्रकाशयोजना अर्थात लायटिंगदेखील लिविंग रूमचा लुक वाढवू शकते. वॉर्म पिवळे दिवे, फरशीचे दिवे किंवा लहान सुंदर आणि आकर्षक असे लाईट्स लिव्हिंग रूमला अधिक आरामदायी आणि आकर्षक बनवू शकतात. सेंटर लाईट्ससह तुम्ही साई़ड लॅम्प्सचा उपयोगही करून घेऊ शकता. यामुळे घरात आल्यानंतर अधिक फ्रेश आणि आनंदी वातावरण वाटेल
कमालीची रंगसंगती आणि क्लासी वूड फर्निचर, असा आहे सोनाक्षीचा 11 कोटीचा फ्लॅट
अॅक्सेसरीजसह पर्सनल टच
लिव्हिंग रूमला द्या पर्सनल टच
फोटो फ्रेम्स, मेणबत्ती स्टँड, बुक शेल्फ किंवा हँडी आर्ट्स हे सर्व तुमच्या लिविंग रूमला अद्वितीय बनवू शकतात आणि तुमच्या लिव्हिंग रूममध्ये पाहिल्यानंतर तुमच्या व्यक्तिमत्त्वाची जाणीवही करून देऊ शकतात.
लिविंग रूमला एक नवीन लुक देणे हे महाग किंवा कठीण काम नाही. फक्त थोडेसे क्रिएटिव्ह विचार, काही परवडणाऱ्या सजावटीच्या कल्पना आणि योग्य संयोजनाने, तुम्ही तुमची लिविंग रूम अधिक स्टायलिश, सुंदर आणि सर्वात खास बनवू शकता. तर तुम्ही कशाची वाट पाहत आहात? या टिप्स वापरून पहा आणि तुमच्या घराला एक फ्रेश आणि नवा लुक मिळवून द्या