केस कोरडे झाले आहेत? मग 'या' पद्धतीने केसांवर लावा चहाचे पाणी
बदलेले वातावरण, आहारात होणारे बदल, पोषक घटकांची कमतरता, पाण्याची कमतरता आणि सतत केलेल्या केमिकल ट्रीटमेंटचा परिणाम केसांवर लगेच दिसून येतो. हल्ली केसांच्या समस्या मोठ्या प्रमाणावर वाढू लागल्या आहेत. केस गळणे, केसांमध्ये वाढलेला कोंडा, केस अचानक तुटणे इत्यादी अनेक समस्या वाढू लागतात. कमी केस पांढरे झाल्यानंतर महिला बाजारात उपलब्ध असलेल्या वेगवेगळ्या हेअर केअर प्रॉडक्टचा वापर किंवा हेअर कलर लावतात. पण चुकीच्या पद्धतीने हेअर कलर किंवा केमिकल ट्रीटमेंट केल्यामुळे केसांची गुणवत्ता खराब होऊन जाते. केस खराब झाल्यानंतर ते सुधारण्यासाठी खूप जास्त वेळ लागतो. त्यामुळे केसांची योग्य काळजी घेणे आवश्यक आहे. केसांची चमक कमी झाल्यानंतर केस अचानक कोरडे आणि निस्तेज वाटू लागतात. केसांच्या समस्या वाढू लागल्यानंतर केमिकल ट्रीटमेंट केल्या जातात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला केसांच्या समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी केसांसाठी चहाच्या पाण्याचा वापर कशा पद्धतीने करावा, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.(फोटो सौजन्य – istock)
वारंवार होणारी केस गळती, केसांमध्ये वाढलेला कोंडा इत्यादी समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी चहाच्या पाण्याचा वापर करावा. यासाठी एक ग्लास पाणी टोपात घेऊन त्यात २ चमचे चहा पावडर उकळवून घ्या. तयार केलेले पाणी उकळवून घ्या. पाणी थंड झाल्यानंतर तयार केलेले पाणी गाळून घ्या. त्यानंतर त्यात कोरफड जेल, कॉफी पावडर आणि मध घेऊन मिक्स करा. तयार केलेल्या मिश्रणात कोणताही शॅम्पू मिक्स करून केस स्वच्छ धुवून घ्या. केसांवर तयार केलेले मिश्रण लावून काहीवेळ तसेच ठेवा आणि पाण्याने स्वच्छ करून घ्या. हा उपाय आठवड्यातून दोनदा करा. यामुळे केसांच्या समस्या दूर होतील.
चहाच्या पावडरमध्ये असलेले गुणधर्म केसांच्या समस्या दूर करण्यासाठी मदत करतात. केस अतिशय कोरडे किंवा निस्तेज झाल्यानंतर कोणत्याही केमिकल ट्रीटमेंट किंवा हेअर केअर प्रॉडक्टचा वापर करण्याऐवजी घरगुती उपाय करून केसांची काळजी घ्यावी. घरगुती उपाय केल्यामुळे केसांच्या मुळांना पोषण मिळते. कोरफड जेल लावल्यामुळे केस हायड्रेट राहतात. याशिवाय केस मऊ आणि चमकदार होण्यासाठी आठवड्यातून दोनदा किंवा तीनदा कोरफड जेल केसांना लावावे.