अरबी महिला हम्माम प्रक्रियेने चेहरा ठेवतात तरुण, काय आहे ही जादुई ट्रिक? जाणून घ्या
अरब देश हे त्यांची संस्कृती आणि आदरातिथ्यासाठी ओळखले जातात. त्यातही अरबी लोक त्यांच्या आणखीन एका गोष्टीसाठी खास करून ओळखले जातात आणि ते म्हणजे त्यांचे नैसर्गिक सौंदर्य! विशेषतः अरब महिलांची त्वचा ही त्यांच्या सौंदर्याची खरी ओळख ठरत असते. गोरा रंग, गालावर येणारी गुलाबी लाली आणि फ्लॉलेस त्वचा यासाठी अरबी महिला जगभर प्रसिद्ध आहेत. त्यांचे सौंदर्य पाहताच लोकांना ते हवेहवेसे वाटू लागते. आता आपले सौंदर्य हे आपल्या हातात नसते मात्र आपल्या चेहऱ्याची काळजी घेऊन तिला आणखीन बहारदार बनवणे हे आपल्या हातात असते.
तुम्हाला माहिती आहे का? अरब महिला आपल्या स्किन केअर रुटीनमध्ये ज्या टिप्स फॉलो करतात त्या फॉलो करून तुम्हीही घरच्या घरी एक सुंदर त्वचा मिळवू शकता. हा एक नैसर्गिक उपाय आहे, ज्याचा नियमित वापर केल्याने तुम्हाला नक्कीच तुमच्या त्वचेवर चांगले परिणाम दिसून येतील. चला तर मग अरब महिलांच्या सौंदर्याचे रहस्य जाणून घेऊयात.
लाईफस्टाईल संबंधित बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा
या दुधाचा वापर करा
तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल पण अरब महिला आपल्या सौंदर्यवाढीसाठी उंटाच्या दुधाचा वापर करतात. हे दूध सौंदर्यवाढीसाठी फार फायद्याचे मानले जाते. यामध्ये विटॅमिन बी, सी, डी आणि अल्फा हायड्रॉक्सी एसिड असते, जे त्वचेला गुळगुळीत, ताजीतवानी आणि सुरकुत्यांपासून दूर ठेवते. वय वाढल्यानंतर चेहऱ्यावर येणाऱ्या फाईन लाईन्स कमी करण्यासाठी हे दूध फार फायदेशीर ठरते. तुम्ही घरीच या दुधाचा फेसपॅक तयार करून चेहऱ्याला लावू शकता.
अरबी घरगुती फेसपॅक
साहित्य
लाईफस्टाईल संबंधित बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा
फेसपॅक तयार करण्याची पद्धत
फेसपॅक तयार करण्यासाठी जास्वंदाची फुल काहीतास पाण्यात भिजवून ठेवा. त्यानंतर तुमचा आवडीचा साबण घ्या आणि याला बारीक ग्राइंड करून घ्या. यानंतर एक वाडगा घ्या आणि यात तांदळाचं पीठ, कॉर्न फ्लोअर, मिल्क पावडर, बिटरूट पावडर आणि शेवटी भिजवलेल्या जास्वंदाच्या फुलाचे पाणी टाका. आता आहे सर्व पदार्थ एकत्र मिसळून याची एक पेस्ट तयार करून घ्या. मग ही पेस्ट आइस क्यूबच्या साच्यात घालून 2 आठवडे फ्रिझरमध्ये ठेवा. यानंतर हा आइस क्युब चेहऱ्यावर चोळत मसाज करा. नियमित याचा वापर केल्याने चेहऱ्यावर एक वेगळाच ग्लो दिसून येईल.
हम्माम बाथ
हम्माम बाथ म्हणजे शरीराला वाफ देऊन स्वच्छ करण्याची प्रक्रिया! याला स्टीम बाथ असेही म्हटले जाते. या बाथने त्वचेवरील मृत पेशी काढून टाकल्या जातात. तसेच यामुळे त्वचेच्या पोर्स मधील घाण स्वच्छ होते आणि रक्ताभिसरण सुधारते. यामुळे त्वचेवर एक नैसर्गिक तेज दिसू लागते. आपल्या सौंदर्यवाढीसाठी तुम्हीही तुमच्या आंघोळीवेळी गरम पाण्याने हॉट टॉवेल बाथ घेऊ शकता. आठवड्यातून एकदा असा प्रकार केल्याने तुम्ही त्वचेला ग्लो मिळवून देऊ शकता.
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.