फुफ्फुसांमधील सर्व घाण-चिकट कफ लगेच बाहेर पडेल; फक्त डॉक्टरांनी सांगितलेल्या या 5 जालीम उपायांचा वापर करा
फुफ्फुसे पेंशींना जगवण्यासाठी ऑक्सिजन पुरवण्याचे काम करतात. ऑक्सिजनवर आपले जीवन निर्भर असते, ज्यामुळे फुफ्फुसांची योग्य काळजी घेणे फार गरजेचे आहे. पण अनेकांचे याकडे नेहमीच दुर्लक्ष होते. जोपर्यंत कोणती समस्या जाणवत नाही तोपर्यंत लोक आपल्या फुफ्फुसांकडे लक्ष देत नाही. फुफ्फुसांची काळजी न राखल्यास श्वास घेण्यास त्रास होणे किंवा सतत खोकला येणे यांसारख्या समस्या जाणवू शकतात. तुम्हालाही या समस्या जाणवत असतील तर आज आम्ही तुम्हाला काही प्रभावी उपाय सांगणार आहोत, ज्यांच्या मदतीने तुम्ही तुमच्या फुफ्फुसांना एक निरोगी आयुष्य देऊ शकता. आपल्या जीवनशैलीत काही महत्त्वाचे बदल करुन आपण फुफ्फुसांच्या आजाराचा धोका कमी करु शकतो. चला त्या कोणत्या सवयी आहेत ते सविस्तर जाणून घेऊया.
शारीरिक हालचाल महत्त्वाची
डाॅक्टरांच्या मते, शारीरिक हालचाली फुफ्फुसांची क्षमता आणि कार्य सुधारण्याचे काम करते. वेगाने चालून, सायकलिंग करुन किंवा पाण्यात पोहून हृदयाची गती वाढवता येते. हे असे एरोबिक एक्सरसाईस फुफ्फुसांना ऑक्सिजनचा अधिक प्रभावीपणे वापर करण्यास मदत होते. संशोधनात असे आढळून आले आहे की, मध्यम शारीरिक हालचाली असलेल्या व्यक्तींचे श्वसन कार्य चांगले राहते. अशा लोकांना COPD होण्याचा धोका कमी होतो. दररोज किमान ३० मिनिटे चालणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरते.
व्यायाम करत चला
व्यायाम हा आपल्या आरोग्यासाठी नेहमीच फायद्याचा ठरतो. फुफ्फुसांचे आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी व्यायाम महत्त्त्वाचा आहे. डायफ्रामॅटिक श्वासोच्छवास (ओटीपोटात श्वास घेणे) आणि पर्स-लिप श्वासोच्छवास यासारख्या तंत्रांमुळे श्वसनाचे कार्य सुधारले जाऊ शकते. यामुळे पटकन दम लागत नाही आणि शारीरिक जास्तीत जास्त प्राणवायू मिळतो. दररोज दिवसातून काहीवेळ तुम्ही हे व्यायाम करू शकता, ते तुमच्या फुफ्फुसांच्या आरोग्यासाठी फायद्याचे ठरेल.
निरोगी वजन राखा
पोटावरची जास्तीची चरबी डायाफ्रामवर दबाब टाकते ज्यामुळे फुफ्फुसांचा विस्तार कमी होऊ लागतो. एका अभ्यासातून असे दिसून आले आहे की, लठ्ठपणा आपल्या फुफ्फुसांचे आरोग्य बिघडवतो आणि स्लीप एपनिया सारख्या आजरांचा धोका वाढवतो. तर दुसरीकडे वजन नियंत्रणात असल्यास फुफ्फुसांचे कार्य चांगले राहते. फळे, भाज्या आणि संपूर्ण धान्यांनी समृद्ध निरोगी आहार फुफ्फुसांमधील पेशींच संरक्षण करण्यास मदत करते. वजन नियंत्रणात असल्यास फुफ्फुसांवर फार दबाब येत नाही, ही सवय त्यांना मोकळं ठेवण्यास मदत करते.
धूम्रपान आणि सेकंडहँड धूम्रपान टाळा.
धूम्रपान फुफ्फुसांच्या आरोग्यासाठी किती घातक आहे हे आपल्या सर्वांना ठाऊक आहे. सिगारेटच्या धुरात हजारो विषारी घटक असतात जे फुफ्फुसांच्या ऊतींना नुकसान पोहचवण्याचे काम करते. हे श्वसनमार्ग अरुंद करतात आणि फुफ्फुसांचा कर्करोग, सीओपीडी आणि हृदयरोगाचा धोका वाढवण्याचे काम करतात. धूम्रपानाचे सेवन कमी वयातच फुफ्फुसांचे आरोग्य खराब करू शकते, त्यामुळे वेळीच ही सवय कमी करा किंवा पूर्णपणे बंद करा.
वॅक्स, रेझर की ट्रिमर… वजाईनावर कशाचा वापर करावा? महिलांनो, आजच जाणून घ्या योग्य पर्याय
भरपूर पाणी प्या
पाण्याचे सेवन आपल्या आरोग्यासाठी तर फायद्याचे आहेच पण फुफ्फुसांच्या आरोग्यासाठीही पाण्याचे सेवन फायद्याचे ठरते. जास्तीत जास्त पाण्याचे सेवन श्वसनमार्गांमध्ये श्लेष्मा पातळ करण्यास मदत करते, ज्यामुळे तुमच्या फुफ्फुसांना श्लेष्मा बाहेर काढणे आणि त्यात साचलेले कोणतेही बॅक्टेरिया किंवा विषाणू काढून टाकणे सोपे होते. एका अभ्यासातून असे दिसून आले की, हायड्रेशन फुफ्फुसांच्या नैसर्गिक क्लिअरिंग सिस्टमला समर्थन देण्याचे कार्य करते ज्याला म्यूकोसिलरी क्लिअरिंग सिस्टम असे म्हटले जाते. यासाठी पाणी, हर्बल टी किंवा काकडीसारख्या पाण्याने भरलेल्या पदार्थांचे सेवन करता येऊ शकते.
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.