दातांवर साचलेला पिवळा थर स्वच्छ करण्यासाठी घरगुती उपाय
दातांच्या स्वच्छतेकडे व्यवस्थित लक्ष न दिल्यामुळे दातांचे आरोग्य बिघडून जाते. दात अस्वच्छ दिसणे, दात पिवळे पडणे, दातांवर पांढऱ्या रंगाचा थर साचून राहणे इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. या सर्व समस्या उद्भवू लागल्यानंतर दातांचे आरोग्य बिघडून जाते. दातांवर पिवळ्या रंगाचा थर साचून राहिल्यामुळे हसताना किंवा बोलताना लाजिरवण्यासारखे वाटू लागते. शिवाय यामुळे महिलांचा आत्मविश्वास कमी होऊन जातो. त्यामुळे दात स्वच्छ आणि चमकदार असणे आवश्यक आहे. निरोगी आरोग्य जगताना स्वच्छतेकडे लक्ष देणे आवश्यक आहे. त्यामुळे नियमित दातांच्या आरोग्याची काळजी घेणे आणि दात स्वच्छ करणे आवश्यक आहे. दातांवर साचलेला पिवळा थर आहारामुळे आणि दात स्वच्छ न केल्यामुळे दातांवर तयार होतो. त्यामुळेच आज आम्ही तुम्हाला दातांवर साचलेला पिवळा थर स्वच्छ करण्यासाठी कोणते घरगुती पदार्थ वापरावे, याबद्दल सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य-istock)
लाईफस्टाईल संबंधित बातम्यांसाठी इथे क्लिक करा
दात स्वच्छ करण्यासाठी टूथपेस्ट, मशेरी इत्यादी अनेक गोष्टी वापरल्या जातात. मात्र केमिकल प्रॉडक्टचा वापर करण्याऐवजी घरगुती पदार्थांचा वापर करावा, ज्यामुळे दात स्वच्छ आणि सुंदर दिसतील. दात स्वच्छ करण्यासाठी टूथपेस्ट बनवताना हळद आणि मोहरीचे तेल मिक्स करून मिश्रण तयार करावे. या पेस्टचा नियमित वापर केल्यामुळे दात स्वच्छ होतील आणि दातांना कीड लागणार नाही. हळदीमध्ये आढळून येणारे अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म दात स्वच्छ करण्यासाठी मदत करतात.
पांढऱ्या शुभ्र दातांसाठी संस्त्र्याच्या पावडरचा वापर करावा. संत्र्याच्या पावडरमध्ये विटामिन सी आणि कॅल्शियम आढळून येते, जे दातांच्या आरोग्यासाठी अतिशय चांगले आहे. दातांवर साचून राहिलेला पिवळा थर काढून टाकण्यासाठी संत्र्याची साल अतिशय गुणकारी आहे. संत्र्याची सालींची पावडर दातांवर लावून दात हाताने व्यवस्थित घासा. ही पावडर नियमित लावल्यास दात स्वच्छ होतील.
लिंबाचा रस आणि बेकिंग सोडा एकत्र करून पेस्ट तयार करावी. तयार केलेली पेस्ट दातांवर लावून दात स्वच्छ घासावे. यामुळे दातांवर साचून राहिलेला पिवळा थर कमी होईल. लिंबामध्ये असलेले असिड दातांवरील घाण स्वच्छ करते. पण या पदार्थांचा वापर योग्य प्रमाणात करावा. अतिवापरामुळे दातांचे आरोग्य खराब होऊ शकते.
लाईफस्टाईल संबंधित बातम्यांसाठी इथे क्लिक करा
दातांवर साचून राहिलेला पिवळा थर काढून टाकण्यासाठी बेकिंग सोड्याचा वापर करावा. यामुळे दात स्वच्छ होतात. बेकिंग सोडा दातांवर लावल्यामुळे दातांमध्ये चिटकून राहिलेली घाण स्वच्छ होण्यास मदत होते. टूथपेस्टवर चिमूटभर बेकिंग सोडा घेऊन हळुवार दात घासावे. यामुळे दात पांढरे शुभ्र दिसतील.