मधुमेह झाल्यानंतर या औषधी वनस्पतींचा आहारात करा समावेश:
जगभरात मधुमेह या गंभीर आजाराने अनेक लोक त्रस्त आहेत. मधुमेह झाल्यानंतर आरोग्य बिघडून जाते. रक्तातील साखरेची पातळी वाढल्यानंतर आरोग्याला हानी पोहचण्याची शक्यता असते. चुकीची जीवनशैली, खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये होणारे बदल, जंक फूडचे सेवन, अपुरी झोप, सतत गोड पदार्थ खाणे इत्यादी गोष्टींचा परिणाम आरोग्यावर लगेच लगेच येतो. निरोगी आरोग्य जगण्यासाठी दैनंदिन आहारात पौष्टिक आणि शरीराला पचन होईल अशा पदार्थांचे सेवन करावे. मधुमेह झाल्यानंतर कायमस्वरूपी गोळ्या औषध घेणे बंधनकारक असत. मधुमेहाच्या रुग्णांची संख्या वाढली आहे. सतत बाहेरील पदार्थांचे सेवन केल्यामुळे आरोग्याला हानी पोहचते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला रक्तातील साखरेची पातळी वाढल्यानंतर कोणत्या औषधी वनस्पतींचा आहारात समावेश करावा, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य-istock)
लाईफस्टाईल संबंधित बातम्यांसाठी इथे क्लिक करा
रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी दैनंदिन आहारात दालचिनीचे सेवन करावे. दालचिनीच्या सेवनामुळे आरोग्य निरोगी राहते. कोमट पाण्यात एक तुकडा दालचिनी टाकून रात्रभर पाण्यात भिजत ठेवा. त्यानंतर सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी पाण्याचे सेवन करावे. यामुळे शरीराला अनेक फायदे होतात. दालचिनीच्या पाण्याचे नियमित सेवन केल्यामुळे शरीरात वाढलेली कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात राहण्यास मदत होईल.
मधुमेह झाल्यानंतर मेथी दाण्यांचे पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. त्यामुळे दैनंदिन आहारात तुम्ही मेथी दाण्यांचे पाणी पिऊ शकता. मेथी दाण्यांमध्ये फायबर, प्रथिने आणि इतर पोषक तत्वचे प्रमाण अधिक असते. एक ग्लास पाण्यात मेथी दाणे टाकून भिजत ठेवा. सकाळी उठल्यानंतर मेथी दाण्यांसोबत पाण्याचे सेवन करावे. यामुळे रक्तात वाढलेली साखर नियंत्रणात राहण्यास मदत होईल.
जांभळाच्या बियांमध्ये हायपोग्लायसेमिक गुणधर्म आढळून येतात, ज्यामुळे रक्तात वाढलेली साखरेची पातळी नियंत्रणात राहण्यास मदत होते. शिवाय जांभळाच्या पावडरचे नियमित सेवन केल्यास स्वादुपिंड निरोगी राहते आणि इन्सुलिनचे उत्पादन सुधारते.
कडुलिंबामध्ये अँटी-बॅक्टेरियल, अँटी-व्हायरल आणि अँटी-डायबेटिक गुणधर्म आढळून येतात. त्यामुळे मधुमेह झाल्यानंतर कडुलिंबाच्या पाण्याचे सेवन करावे. बाजारात कडुलिंबाची पाने आणि पावडर उपब्ध आहे. या पाण्याच्या सेवनामुळे वाढलेले वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते.
लाईफस्टाईल संबंधित बातम्यांसाठी इथे क्लिक करा
आवळ्यामध्ये मुबलक प्रमाणात विटामिन सी आढळून येते. वाढलेले वजन नियंत्रणात ठेवण्यापासून ते मधुमेहासाठी आवळ्याची पावडर अतिशय प्रभावज आहे. आवळ्यामध्ये आढळणारे अँटीऑक्सिडंट्स रक्तातील साखर कमी करतात.