खोकल्याच्या समस्येवर आराम मिळवण्यासाठी घरगुती उपाय
दिवाळी उत्सवाला सुरुवात झाल्यानंतर सगळीकडे मोठ्या प्रमाणावर फटाके फोडले जाते. फटाक्यांच्या धुरामुळे देशभरातील प्रदूषणात मोठी वाढ झाली आहे. हवेतील प्रदूषणामध्ये वाढ झाल्यानंतर आरोग्यसुद्धा हळूहळू बिघडू लागते. प्रदूषण वाढल्यानंतर फुफ्फुसांसंबधित आजार, श्वासांचे आजार आणि इतर आजारांची लागण होण्याची शक्यता असते. हवेतील प्रदूषणात वाढ झाल्यानंतर तोंडा वाटे सर्व घाण, धूळ, माती घशावाटे तोंडामध्ये जाते. तोंडात विषारी पदार्थ गेल्यामुळे सर्दी, खोकला इत्यादी आजार वाढू लागतात. सर्दी किंवा खोकल्याचा त्रास झाल्यानंतर घसा दुखु लागतो.(फोटो सौजन्य-istock)
देशाची राजधानी दिल्लीमध्ये प्रदूषणात वाढ झाली आहे. दिल्लीसह राज्यातील इतर भागांमध्ये प्रदूषण वाढू लागले आहे. प्रदूषण वाढल्यानंतर खोकल्याची समस्या उद्भवते. राजधानी दिल्लीतील हवेची गुणवत्ता सरासरी निर्देशांक ५५६ इतका नोंदवला गेला आहे. वाढत्या प्रदूषणामुळे लोकांच्या आरोग्यावरही गंभीर परिणाम होत आहे. विषारी हवेमुळे लोकांना श्वास घेण्यास त्रास, खोकला, घसादुखी, डोळ्यात जळजळ अशा समस्यांना सामोरे जावे लागत आहे. खोकला वाढल्यानंतर पोट दुखीही समस्या उद्भवते, तर इतरही समस्या उद्भवतात. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला खोकल्याच्या समस्येपासून आराम मिळवण्यासाठी कोणते घरगुती उपाय करावे, याबद्दल सांगणार आहोत. चला तयार जाणून घेऊया.
हे देखील वाचा: मोहरीच्या तेलाने पायाचे मालिश करण्याचे फायदे
आल्यामध्ये असलेले गुणकारी घटक आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहेत. आल्यामध्ये दाहक विरोधी गुणधर्म आढळून येतात, ज्यामुळे सर्दी, खोकल्यापासून आराम मिळतो. शिवाय यात अँटी-मायक्रोबियल आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात. सर्दी किंवा खोकला झाल्यानंतर आल्याचे पाणी किंवा चाटण बनवून सेवन केल्यास सर्दी खोकल्यापासून आराम मिळतो.
खोकल्यावर मध खाल्यास लगेच आराम मिळतो. तसेच यामध्ये डेक्स्ट्रोमेथोरफान नावाचा घटक आढळून येतो. यामुळे कफावर नियंत्रण मिळण्यास मदत होते. खोकल्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी एक ग्लास कोमट पाण्यात २ चमचे मध टाकून मिक्स करून घ्या. हे पाणी २ ते ३ दिवस नियमित प्यायल्यास खोकल्यापासून आराम मिळतो.
खोकल्यावर आराम मिळवण्यासाठी गरम पाणी करून त्यात मीठ टाकून गुळण्या करा. गुळण्या केल्यामुळे घशातील खोकल्याचे विषाणू बाहेर निघून जातात. तसेच फुफ्फुसे आणि श्वसन प्रणाली स्वच्छ होण्यास मदत होतो. मिठाच्या पाण्याच्या गुळण्या दिवसाभरातुन दोन ते तीन वेळा केल्यास खोकल्यापासून आराम मिळेल.
हे देखील वाचा: हिवाळ्यात जेवणानंतर नियमित करा गुळाचे सेवन, शरीराला होतील गुणकारी फायदे
प्रदूषण वाढल्यानंतर खोकल्याची समस्या मोठ्या प्रमाणावर वाढू लागते. त्यामुळे खोकल्यापासून आराम मिळवण्यासाठी नियमित वाफ घ्या. वाफ घेतल्यामुळे सर्दी खोकल्यापासून आराम मिळेल.