Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 2 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

७ दिवसात कमी होतील चेहऱ्यावर वाढलेले पिंपल्स आणि काळे डाग! कडुलिंबाच्या पानांचा ‘या’ पद्धतीने करा वापर, त्वचा होईल स्वच्छ

चेहऱ्यावर आलेले पिंपल्स घालवण्यासाठी कडुलिंबाच्या पानांचा वापर करावा. यामुळे त्वचा आतून स्वच्छ होते आणि चेहऱ्यावरील घाण नष्ट होण्यास मदत होते. जाणून घ्या कडुलिंबाच्या पानांचा मास्क बनवण्याची कृती.

  • By सुरुची कदम
Updated On: Feb 12, 2026 | 09:59 AM
७ दिवसात कमी होतील चेहऱ्यावर वाढलेले पिंपल्स आणि काळे डाग! कडुलिंबाच्या पानांचा 'या' पद्धतीने करा वापर, त्वचा होईल स्वच्छ

७ दिवसात कमी होतील चेहऱ्यावर वाढलेले पिंपल्स आणि काळे डाग! कडुलिंबाच्या पानांचा 'या' पद्धतीने करा वापर, त्वचा होईल स्वच्छ

Follow Us
Follow Us:

वातावरणात सतत होणारे बदल, कामाचा वाढलेला तणाव, धूळ, माती, प्रदूषण इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम आरोग्यासह त्वचेवर सुद्धा लगेच दिसून येतो. सततच्या धूळ, माती आणि प्रदूषणामुळे त्वचेवर घाण जमा होते. त्वचेच्या छिद्रांमध्ये जमा झालेल्या घाणीमुळे चेहऱ्यावर मोठे मोठे पिंपल्स येतात. चेहऱ्यावर आलेल्यापिंपल्स आणि काळ्या डागांमुळे महिलांचा आत्मविश्वास कमी होऊन जातो. प्रत्येकालाच अतिशय ग्लोइंग आणि चमकदार त्वचा हवी असते. धावपळीच्या जीवनशैलीमुळे त्वचेकडे लक्ष देण्यासाठी जास्तीचा वेळ मिळत नाही. याचे दुष्परिणाम चेहऱ्यावर लगेच दिसून येतात. पिंपल्स आणि काळे डाग घालवण्यासाठी बाजारात उपलब्ध महागडी क्रीम्स, सीरम आणि पार्लरमधील फेशियल करून हजारो रुपये वाया घालवले जातात.(फोटो सौजन्य – istock)

Valentine’s Day 2026 : डेट नाईटसाठी परफेक्ट लूक हवाय? या घरगुती टिप्स चेहऱ्याला मिळवून देतील इन्स्टंट ग्लो

त्वचेच्या समस्या वाढू लागल्यानंतर सतत केमिकलयुक्त स्किन केअर प्रॉडक्टचा वापर करण्याऐवजी घरगुती उपाय करून त्वचेची काळजी घ्यावी. घरगुती उपाय केल्यामुळे त्वचेवर नैसर्गिक ग्लो येतो आणि त्वचा अतिशय चमकदार होते. आज आम्ही तुम्हाला चेहऱ्यावर आलेले पिंपल्स घालवण्यासाठी कडुलिंबाच्या पानांचा वापर कसा करावा, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. कडुलिंबाच्या पानांमध्ये असलेले घटक त्वचा आतून स्वच्छ करण्यास मदत करतात आणि चेहऱ्यावर ग्लो आणतात. जाणून घ्या सविस्तर.

चवीला कडू असणारी कडुलिंबाची पाने सौंदर्यासाठी खूप फायदेशीर आहेत. ७ दिवस नियमित कडुलिंबाच्या पानांचा फेसमास्क चेहऱ्यावर लावल्यास त्वचा खूप उजळदार होण्यास मदत होईल. या पानांमध्ये अँटी-बॅक्टेरियल, अँटी-फंगल आणि अँटी-इन्फ्लेमेटरी गुणधर्म आढळून येतात. ज्यामुळे त्वचा आतून डिटॉक्स होते. त्वचेवरील ओपन पोअर्स स्वच्छ करण्यासाठी कडुलिंबाच्या पानांचा वापर करावा. कडुलिंबाच्या पानांचा वापर करण्यासाठी टोपात पाणी गरम करण्यासाठी ठेवा. त्यानंतर त्यात पाने घालून उकळवून घ्या. गरम पाण्याची वाफ घ्यावी. ५ मिनिटं नेहमी कडुलिंबाच्या पानांची वाफ घेतल्यास आठवडाभरात त्वचा स्वच्छ होईल.

चेहऱ्यावर आलेले काळे डाग- वांग होतील कायमचे गायब! ‘या’ पद्धतीने करा जायफळाचा वापर, आजीबाईच्या बटव्यातील घरगुती उपाय

त्वचेच्या छिद्रांमध्ये साचून राहिलेली घाण स्वच्छ करण्यासाठी कडुलिंबाच्या पानांचा वापर करावा. यामध्ये असणारे घटक त्वचेवर आलेले मुरूम कायमच नष्ट करतात. त्वचेमध्ये वाढलेली जळजळ कमी करण्यासाठी कडुलिंबाच्या पानांची वाफ घ्यावी. याशिवाय कडुलिंबाच्या पानांचा वापर तुम्ही टोनर म्हणून सुद्धा करू शकता. कडुलिंबाच्या पानांची ताजी पेस्ट बनवून संपूर्ण चेहऱ्यावर लावा आणि काहीवेळ तसेच ठेवून द्या. यामुळे त्वचा आतून स्वच्छ आणि डागविरहित होईल.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: Pimples and dark spots on the face will reduce in 7 days use neem leaves in this way

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 12, 2026 | 09:59 AM

Topics:  

  • glowing face
  • home remedies
  • skin care tips

संबंधित बातम्या

Hair Care Tips: महागडे हेअर डाय लावणे कायमचे जाल विसरून! ‘या’ पद्धतीने घरीच तयार करा कढीपत्त्याच्या पानांचा हेअर मास्क
1

Hair Care Tips: महागडे हेअर डाय लावणे कायमचे जाल विसरून! ‘या’ पद्धतीने घरीच तयार करा कढीपत्त्याच्या पानांचा हेअर मास्क

Lifestyle News : सकाळी रोज फक्त १० मिनिटे करा ‘ॐ’चा जप! शरीराला मिळतील ‘हे’ अद्भूत फायदे
2

Lifestyle News : सकाळी रोज फक्त १० मिनिटे करा ‘ॐ’चा जप! शरीराला मिळतील ‘हे’ अद्भूत फायदे

डासांचा करायचाय नायनाट! लिंबाचे साल फेकून देण्याऐवजी त्याचा असा करा वापर; घरगुती उपायाने सर्व डास होतील छुमंतर
3

डासांचा करायचाय नायनाट! लिंबाचे साल फेकून देण्याऐवजी त्याचा असा करा वापर; घरगुती उपायाने सर्व डास होतील छुमंतर

Skin Care: सतत उन्हामध्ये फिरून त्वचा काळवंडली आहे? मग ‘या’ पद्धतीने चेहऱ्यावर लावा चिंचेचा कोळ, त्वचेवर येईल चमकदार ग्लो
4

Skin Care: सतत उन्हामध्ये फिरून त्वचा काळवंडली आहे? मग ‘या’ पद्धतीने चेहऱ्यावर लावा चिंचेचा कोळ, त्वचेवर येईल चमकदार ग्लो

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.