हिवाळ्यच्या दिवसांमध्ये शरीरात ऊर्जा कमी होत जाते. यामुळे सतत अशक्तपणा आणि थकवा जाणवू लागतो. अशावेळी शरीराला ऊर्जा देण्यासाठी गूळ खावे. गूळ खाल्यामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात. गुळामध्ये लोह, कॅल्शियम, फॉस्फरस, पोटॅशियम आणि विटामिन सी मुबलक प्रमाणात आढळून येते. त्यामुळे नियमित रात्री झोपण्यापूर्वी गुळाचे सेवन करावे. आज आम्ही तुम्हाला हिवाळ्यात गूळ खाल्यामुळे शरीराला नेमके काय फायदे होतात, याबद्दल सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य-istock)
हिवाळ्यात जेवणानंतर नियमित करा गुळाचे सेवन
मधुमेहाच्या आजाराने त्रस्त असलेल्या लोकांनी आहारात गुळाचे सेवन करावे. गुळामध्ये असलेला नैसर्गिक गोडवा शरीरातील साखरेचे प्रमाण वाढवण्याऐवजी नियंत्रणात ठेवण्यासाठी मदत करतो.
वाढलेले वजन कमी करण्यासाठी अनेक लोक गोड खाणे बंद करतात. मात्र गोड खाणे बंद करण्याऐवजी तुम्ही गुळाचे सेवन करू शकता. गूळ खाल्यामुळे रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यास मदत होते.
गुळामध्ये असलेले पोटॅशियम चयापचय गतिमान कमी करण्यास मदत करते. त्यामुळे जेवल्यानंतर गूळ खाल्यास लवकर भूक लागत नाही आणि पोटही भरलेले राहते.
गुळामध्ये लोहाचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे ज्या व्यक्तींच्या शरीरात रक्ताची कमतरता आहे अशांनी आहारात गुळाचे सेवन करावे. गूळ खाल्यामुळे रक्त वाढण्यास मदत होते.
हाडांच्या मजबूत आरोग्यासाठी नियमित गुळाचे सेवन करावे. गुळामध्ये असलेले कॅल्शियम हाडं मजबूत करण्यासाठी मदत करतात.