Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 2 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अंगावर उठणाऱ्या पित्तामुळे त्वचा लाल होत असेल तर ‘हे’ घरगुती उपाय नक्की करा, त्वरित मिळेल आराम

अपचनाची समस्या उद्भवल्यानंतर अनेकांच्या अंगावर लगेच पित्ताच्या गाठी उठतात. या गाठी उठल्यानंतर सतत जळजळ होणे, खाज येणे इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. या समस्येपासून आराम जाणून घ्या घरगुती उपाय.

  • By सुरुची कदम
Updated On: Dec 24, 2024 | 05:30 AM
पित्ताच्या समस्येपासून आराम मिळवण्यासाठी घरगुती उपाय

पित्ताच्या समस्येपासून आराम मिळवण्यासाठी घरगुती उपाय

Follow Us
Follow Us:

बदलती जीवनशैली, खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी, जंक फूडचे सेवन, अपुऱ्या झोपेमुळे आरोग्य बिघडण्याची शक्यता असते. खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये बदल झाल्यानंतर प्रामुख्याने उद्भवणारी समस्या म्हणजे अंगावर पित्ताची गाठी उठणे. शरीरात पित्त तयार झाल्यानंतर अंगावर पित्ताच्या गाठी उठू लागतात. शिवाय त्वचा पूर्णपणे लाल होऊन जाते. त्वचा लाल झाल्यानंतर अंगाला खाज येण्यास सुरुवात होते. अंगावर पित्ताच्या गाठी उठण्यामागे अनेक कारण आहेत. थंडी, उष्णता, ऍलर्जी, तणाव किंवा इतर कोणत्याही समस्येमुळे अंगावर पित्ताच्या गाठी उठतात. त्यामुळे आरोग्याची योग्य ती काळजी घेणे गरजेचे आहे. शरीरात पित्ताची वाढ झाल्यानंतर पचनक्रिया कमकुवत होऊन जाते. शिवाय गॅस, ऍसिडिटी आणि पोटासंबंधित समस्या उद्भवण्याची शक्यता असते. म्हणून हं आम्ही तुम्हाला पित्ताच्या समस्येपासून आराम मिळवण्यासाठी काही घरगुती उपाय सांगणार आहोत. हे घरगुती उपाय केल्यामुळे पित्ताच्या समस्येपासून आराम मिळण्यास मदत होईल.(फोटो सौजन्य-istock)

लाईफ स्टाईलसंबंधित बातम्यांसाठी इथे किल्क करा

पित्ताच्या समस्येपासून आराम मिळवण्यासाठी घरगुती उपाय:

चहाचा तेलाचा वापर:

चहाच्या तेलाचा वापर केल्यामुळे पित्त कमी होते. या तेलामध्ये दाहक-विरोधी आणि बॅक्टेरियाविरोधी गुणधर्म आढळून येतात, ज्यामुळे अंगाला येणारी खाज आणि जळजळ कमी होते. यासाठी एक वाटी पाण्यामध्ये २ थेंब तेल टाकून मिक्स करून घ्या. त्यानंतर तयार केलेले मिश्रण कापसाच्या मदतीने अंगाला खाज आलेल्या जागेवर लावा. यामुळे शरीर थंड होईल आणि खाज जळजळपासून सुटका मिळेल.

कडुलिंबाच्या पानांची पेस्ट:

अंगाला खाज किंवा जळजळ झाल्यास कडुलिंबाच्या पानांची पेस्ट बनवून लावू शकता. या पेस्टमध्ये अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म आढळून येतात, ज्यामुळे शरीराला होणारी जळजळ आणि खाज कमी होण्यास मदत होईल. अंगावर उठलेले पित्ताचे डाग निघून जातील आणि त्वचा पुन्हा एकदा होती तशीच होऊन जाईल.

खोबऱ्याचे तेल:

खोबऱ्याच्या तेलाचा वापर त्वचेसंबंधित समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी केला जातो. शिवाय हे तेल जेवण बनवण्यसाठीसुद्धा वापरले जाते. खाज, जळजळ, पित्ताचे डाग घालवण्यासाठी खोबऱ्याच्या तेलाचा वापर करावा. यासाठी खोबरेल तेल हातावर घेऊन खाज आणि जळजळ होत असलेल्या ठिकाणी लावावे. यामुळे जळजळ कमी होईल आणि आराम मिळेल. खोबरेल तेलात असलेले गुणधर्म त्वचेवरील आर्द्रता टिकवून ठेवण्याचे काम करतात.

लाईफ स्टाईलसंबंधित बातम्यांसाठी इथे किल्क करा

कोरफड:

त्वचेसंबंधित समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी मागील अनेक वर्षांपासून कोरफडचा वापर केला जात आहे. कोरफड त्वचा हायड्रेट ठेवण्याचे काम करते. त्यामुळे पित्ताच्या डागांमुळे होत असलेली जळजळ कमी करण्यासाठी कोरफडचा वापर करावा. घरात कोरफड उपलब्ध नसल्यास तुम्ही कोरफड जेल सुद्धा लावू शकता. यामुळे आराम मिळेल.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.

Web Title: Home remedies to get relief from pitta problem acidity problem health care tips

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 24, 2024 | 05:30 AM

Topics:  

  • Health Care Tips

संबंधित बातम्या

पावसाळ्यात वारंवार आजारी पडताय? ‘या’ संसर्गजन्य गंभीर आजारांपासून स्वतःचा करा बचाव, रोगप्रतिकारशक्ती होईल कमकुवत
1

पावसाळ्यात वारंवार आजारी पडताय? ‘या’ संसर्गजन्य गंभीर आजारांपासून स्वतःचा करा बचाव, रोगप्रतिकारशक्ती होईल कमकुवत

Health News: मुंबई विद्यापीठात अत्याधुनिक RT-PCR प्रशिक्षण! कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना मिळाले आधुनिक प्रयोगशाळा कौशल्यांचे बळ
2

Health News: मुंबई विद्यापीठात अत्याधुनिक RT-PCR प्रशिक्षण! कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना मिळाले आधुनिक प्रयोगशाळा कौशल्यांचे बळ

सतत गोड पदार्थ खाण्याची इच्छा होते? मग नैसर्गिक गोडवा असलेले ‘हे’ पदार्थ खाल्ल्यास वजन राहील नियंत्रणात, क्रेविंग होईल पूर्ण
3

सतत गोड पदार्थ खाण्याची इच्छा होते? मग नैसर्गिक गोडवा असलेले ‘हे’ पदार्थ खाल्ल्यास वजन राहील नियंत्रणात, क्रेविंग होईल पूर्ण

Menstrual Migraine म्हणजे काय? मासिक पाळीतील वेदना आणि असह्य डोकेदुखीपासून सुटका मिळवण्यासाठी करा ‘हे’ उपाय
4

Menstrual Migraine म्हणजे काय? मासिक पाळीतील वेदना आणि असह्य डोकेदुखीपासून सुटका मिळवण्यासाठी करा ‘हे’ उपाय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.