Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 7 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कच्च्या भाज्यांचे सॅलड खाल्ल्यामुळे आतड्यांमध्ये इन्फेक्शन का वाढते? संसर्गाचा धोका टाळण्यासाठी ‘या’ पद्धतीने खा भाज्या

Raw Vegetables: कच्चा भाज्यांचे सेवन केल्यामुळे काहीवेळा अपचनाच्या समस्या उद्भवतात आणि आरोग्य बिघाडून जाते. भाज्या खाण्यापूर्वी स्वच्छ न धुवणे, अस्वच्छपणा इत्यादी अनेक गोष्टींमुळे पोटाचा संसर्ग होण्याची जास्त शक्यता असते. हानिकारक जिवाणू थेट पोटात गेल्यामुळे अन्नातून विषबाधा, उलट्या, जुलाब आणि पोटाचे गंभीर विकार होतात.

  • By सुरुची कदम
Updated On: Nov 07, 2026 | 02:00 PM
Raw Vegetables: कच्च्या भाज्यांचे सॅलड खाल्ल्यामुळे आतड्यांमध्ये इन्फेक्शन का वाढते? संसर्गाचा धोका टाळण्यासाठी 'या' पद्धतीने खा भाज्या

Raw Vegetables: कच्च्या भाज्यांचे सॅलड खाल्ल्यामुळे आतड्यांमध्ये इन्फेक्शन का वाढते? संसर्गाचा धोका टाळण्यासाठी 'या' पद्धतीने खा भाज्या

Follow Us
Follow Us:

Raw Vegetables: दैनंदिन आहारात वेगवेगळ्या भाज्यांचे सेवन केले जाते. भाज्यांच्या सेवनामुळे शरीराला भरमसाट फायदे होतात. निरोगी राहण्यासाठी आठवड्यातून दोनदा किंवा तीनदा कच्च्या भाज्यांचे सॅलड बनवून खाल्ले जाते. याशिवाय बाजारात कच्च्या भाज्यांचे सॅलड किंवा विविध हेल्दी बाऊलसुद्धा उपलब्ध आहेत. कच्च्या भाज्या खाल्ल्यामुळे शरीराला फायदे होतात, पण याच भाज्या चुकीच्या पद्धतीने खाल्ल्यामुळे फायदे होण्याऐवजी आरोग्य बिघडून जाते. पाण्याचे उच्च प्रमाण आणि उष्णतेने भाज्यांमधील आवश्यक पोषक घटक आणि विटामिन नष्ट होतात.(फोटो सौजन्य – istock)

एकदा वापरलेलं तेल पुन्हा तळण्यासाठी वापरताय? शरीराला होऊ शकतात हे धोके!

उत्साहात कच्च्या भाज्यांचे सेवन केल्यामुळे काहीवेळा पोटात अचानक जडपणा जाणवणे, आतड्यांचे आरोग्य बिघडणे, अपचन आणि ऍसिडिटी वाढून शरीराला हानी पोहचते. कच्च्या भाज्या खाताना योग्य काळजी न घेतल्यामुळे शरीरात अनेक बदल जाणवू लागतात. ज्यामुळे संसर्गाचा धोका अधिक पटीने वाढतो आणि आतड्यांचे आरोग्य बिघडते. त्यामुळे संसर्ग टाळण्यासाठी या पद्धतीने भाज्यांचे सेवन करावे. यामुळे शरीराला पुरेशी पोषण आणि आवश्यक घटक मिळतात.

कच्च्या भाज्यांमुळे पोटाचा संसर्ग का होतो?

कच्च्या भाज्यांचे सेवन केल्यामुळे पोटाचा संसर्ग होऊ शकतो. शेतातील माती, अस्वच्छ पाणी, कीटकनाशके आणि वाहतुकीदरम्यान भाज्यांवर ‘ई-कोलाय किंवा साल्मोनेला यांसारखे हानिकारक घटक चिकटून राहिल्यामुळे भाज्यांची पोषण मूल्य कमी होऊन जातात. तसेच भाज्या खाण्यापूर्वी स्वच्छ न धुवणे, अस्वच्छपणा इत्यादी अनेक गोष्टींमुळे पोटाचा संसर्ग होण्याची जास्त शक्यता असते. हानिकारक जिवाणू थेट पोटात गेल्यामुळे अन्नातून विषबाधा, उलट्या, जुलाब आणि पोटाचे गंभीर विकार होतात.

कच्च्या आणि शिजवलेल्या भाज्या:

कच्च्या भाज्यांमध्ये सेल्युलोज नावाच्या कठीण पेशींच्या भिंती असतात, ज्यामध्ये ऑक्सलेट्स, गॉयट्रोजेन्ससारखे नैसर्गिक घटक असतात. संवेदनशील पचनसंस्था, मंद पचनक्रिया किंवा ‘इरिटेबल बाऊल सिंड्रोम’ असणाऱ्या व्यक्तींना या भाज्या पचवणे कठीण जाते. सेल्युलोज मोठ्या आतड्यात तेव्हा बॅक्टेरिया वेगाने पसरतात. बॅक्टेरिया वाढल्यामुळे पोटात तीव्र गॅस, ऍसिडिटी आणि अपचनाच्या समस्या वाढू लागतात. भाज्या शिजवून खाल्ल्यास कठीण फायबर मऊ होतात आणि पोटावर वाढलेला तणाव कमी होतो.

Stroke: स्ट्रोकची सुरुवात मेंदूत नव्हे हृदयातही होऊ शकते! सकाळी उठल्यावर दिसणाऱ्या ‘या’ लक्षणांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष

भाज्यांचे सेवन कशा पद्धतीने करावे:

आहारातून कच्च्या भाज्या खाणे पूर्णपणे काढून न टाकता योग्य पद्धतीने शिजवून खाव्यात. यामुळे पोटाला कोणताही त्रास होणार नाही आणि खाल्लेले अन्नपदार्थ पचन होण्यास मदत होईल. काकडी, टोमॅटो आणि मुळा यांसारख्या मऊ भाज्या सॅलड म्हणून खाताना बारीक चिरून खाव्यात याशिवाय भाज्या खाण्याआधी व्यवस्थित धुवून घ्याव्यात. भाज्या स्वच्छ धुतल्यामुळे भाज्यांवरील माती आणि हानिकारक घटक नष्ट होतात.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

💡

Frequently Asked Questions

  • Que: कच्च्या भाज्यांचे सॅलड खाल्ल्यामुळे आतड्यांमध्ये इन्फेक्शन होऊ शकते का?

    Ans: होय. कच्च्या भाज्या योग्य प्रकारे स्वच्छ न धुता खाल्ल्यास त्यावर असलेले बॅक्टेरिया, विषाणू आणि परजीवी शरीरात जाऊ शकतात. यामुळे अन्नातून होणाऱ्या संसर्गाचा धोका वाढू शकतो.

  • Que: कच्च्या भाज्यांमुळे कोणत्या प्रकारचे संसर्ग होऊ शकतात?

    Ans: दूषित भाज्यांमुळे ई. कोलाई (E. coli), साल्मोनेला आणि लिस्टेरिया यांसारख्या जंतूंचा संसर्ग होऊ शकतो. यामुळे अतिसार, उलट्या, पोटदुखी आणि ताप यांसारखी लक्षणे दिसू शकतात.

  • Que: भाज्या कच्च्या खाण्यापेक्षा शिजवून खाणे अधिक सुरक्षित आहे का?

    Ans: काही वेळा होय. भाज्या योग्य तापमानावर शिजवल्याने त्यावरील अनेक हानिकारक जंतू नष्ट होण्यास मदत होते. मात्र, सर्व भाज्या शिजवूनच खाण्याची गरज नाही. स्वच्छता राखून कच्च्या भाज्याही खाता येतात.

Web Title: Raw vegetable salad why can eating unwashed vegetables cause gut infections sk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 07, 2026 | 02:00 PM

Topics:  

  • Health Care Tips
  • side effect
  • vegetable

संबंधित बातम्या

Tea Side Effects: उपाशी पोटी चहासोबत चुकूनही करू नका ‘या’ पदार्थांचे सेवन, आतड्यांचे होईल गंभीर नुकसान
1

Tea Side Effects: उपाशी पोटी चहासोबत चुकूनही करू नका ‘या’ पदार्थांचे सेवन, आतड्यांचे होईल गंभीर नुकसान

Strong Bones: तरुण वयात गुडघे- कंबरेमध्ये वेदना होतात? मग दुधात मिक्स करून प्या ही पावडर, हाडे होतील बळकट
2

Strong Bones: तरुण वयात गुडघे- कंबरेमध्ये वेदना होतात? मग दुधात मिक्स करून प्या ही पावडर, हाडे होतील बळकट

Poor Circulation Symptoms: पायांवरचे केस अचानक गळतायत? शरीरात दिसून येणाऱ्या ‘या’ लक्षणांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष
3

Poor Circulation Symptoms: पायांवरचे केस अचानक गळतायत? शरीरात दिसून येणाऱ्या ‘या’ लक्षणांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष

High Cholesterol: नसांमध्ये साचून राहिलेले खराब कोलेस्ट्रॉल होईल मुळांपासून नष्ट! दररोज सकाळी चावून खा ‘हे’ १ रुपयांचे पान
4

High Cholesterol: नसांमध्ये साचून राहिलेले खराब कोलेस्ट्रॉल होईल मुळांपासून नष्ट! दररोज सकाळी चावून खा ‘हे’ १ रुपयांचे पान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.