Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 7 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Tea Side Effects: उपाशी पोटी चहासोबत चुकूनही करू नका ‘या’ पदार्थांचे सेवन, आतड्यांचे होईल गंभीर नुकसान

Tea Side Effects: चहासोबत तिखट, तेलकट किंवा अतिप्रमाणात आंबट पदार्थांचे सेवन अजिबात करू नये. या पदार्थांच्या सेवनामुळे आतड्यांचे आरोग्य बिघडते आणि संपूर्ण शरीराला हानी पोहचते.

  • By सुरुची कदम
Updated On: Nov 07, 2026 | 08:16 AM
Tea Side Effects: उपाशी पोटी चहासोबत चुकूनही करू नका 'या' पदार्थांचे सेवन, आतड्यांचे होईल गंभीर नुकसान

Tea Side Effects: उपाशी पोटी चहासोबत चुकूनही करू नका 'या' पदार्थांचे सेवन, आतड्यांचे होईल गंभीर नुकसान

Follow Us
Follow Us:

Tea Side Effects: सकाळी उठल्यानंतर सगळ्यांचं चहा किंवा कॉफी पिण्याची सवय असते. चहा कॉफीच्या सेवनाशिवाय दिवसाची सुरुवात चांगली झाल्यासारखे अजिबात वाटत नाही. याशिवाय चहासोबत बिस्किट, चिवडा किंवा स्नॅकस आणून खाल्ले जातात. पण उपाशी पोटी तिखट किंवा तेलकट पदार्थांचे सेवन केल्यामुळे शरीराला हानी पोहचण्याची जास्त शक्यता असते. कळत नकळत खाल्लेल्या पदार्थांमुळे आणि चुकीच्या फूड कॉम्बिनेशन्समुळे आतड्यांचे नुकसान होऊन आरोग्य बिघडते. अन्नपदार्थांचे चुकीच्या पद्धतीने सेवन केल्यामुळे पचनक्रिया बिघडते आणि वारंवार ऍसिडिटी होते. त्यामुळे चहासोबत चुकूनही या पदार्थांचे सेवन अजिबात करू नये.(फोटो सौजन्य – istock)

एकदा वापरलेलं तेल पुन्हा तळण्यासाठी वापरताय? शरीराला होऊ शकतात हे धोके!

चहासोबत करू नका ‘या’ पदार्थांचे सेवन:

थंड पाणी किंवा थंड पदार्थ:

गरमागरम चहा प्यायल्यानंतर लगेच थंड पाणी किंवा कोणत्याही थंड पदार्थांचे अजिबात सेवन करू नका. थंड पाण्याचे सेवन केल्यामुळे शरीराच्या तापमानात अनेक बदल होतात. यामुळे गळा आणि दाढांमध्ये वेदना वाढू लागतात. गरम आणि थंड पदार्थांचे मिश्रण एकत्र खाल्ल्यामुळे पचनक्रिया बिघडते आणि शरीरात अनेक बदल दिसून येतात.

जास्त मसालेदार पदार्थ:

चहासोबत चिवडा, चकली किंवा अतितिखट पदार्थांचे सेवन केल्यामुळे पोटात ॲसिडिटी आणि छातीत जळजळ होऊन अपचनाच्या समस्या वाढू लागतात. त्यामुळे रिकाम्या पोटी चहासोबत कोणत्याही पदार्थांचे सेवन करू नये. चहामध्ये कॅफिन असते, जे तिखट पदार्थ एकत्र खाल्ल्यामुळे पोटाचा समतोल बिघडण्यास कारणीभूत ठरते. चहासोबत हळद असलेल्या पदार्थांचे अजिबात सेवन करू नये. चहा आणि हळदीचे घटक पोटात एकत्र गेल्यामुळे गॅस, अपच आणि बद्धकोष्ठता यांसारख्या समस्या वाढू शकतात.

चहासोबत आंबट पदार्थ:

चहासोबत चुकूनही आंबट पदार्थांचे सेवन करू नये. आंबट पदार्थांच्या सेवनामुळे आम्ल्पित वाढते आणि अपचनाच्या समस्या वाढून शरीराला हानी पोहचते. दूध घालून बनवलेल्या चहासोबत लिंबू किंवा लिंबापासून बनवलेला कोणताही आंबट पदार्थ खाल्ल्यास पोटात जाऊन दूध फाटते आणि तीव्र ऍसिडिटी आणि अपचनाच्या समस्या वाढू लागतात.

Diwali Food Poisoning: सणाचा गोडवा पडू शकतो महागात! मिठाईपासून फराळापर्यंत, खाण्याच्या चुका टाळा

चॉकलेट:

चहा आणि चॉकलेटचे कॉम्बिनेशन ऐकायला चांगले वाटत असेल तरीसुद्धा शरीरासाठी अजिबात चांगले नाही. या दोन्ही पदार्थांमध्ये कॅफिन असते. दोन्ही पदार्थ एकत्र खाल्ल्यामुळे शरीरात कॅफिनची पातळी वाढते आणि अस्वस्थता, चिडचिड आणि रात्री झोप न लागणे इत्यादी समस्या वाढू लागतात. त्यामुळे चहा आणि चॉकलेट एकत्र अजिबात खाऊ नका.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

💡

Frequently Asked Questions

  • Que: उपाशी पोटी चहा प्यायल्याने आरोग्यावर काय परिणाम होतो?

    Ans: उपाशी पोटी चहा प्यायल्याने काही लोकांना अॅसिडिटी, छातीत जळजळ, मळमळ आणि पोटात अस्वस्थता जाणवू शकते. चहामधील कॅफिन आणि टॅनिन्स यामुळे पचनावर परिणाम होऊ शकतो.

  • Que: चहासोबत कोणते पदार्थ खाणे टाळावे?

    Ans: चहासोबत अतितेलकट, तिखट आणि खूप गोड पदार्थांचे सेवन मर्यादित ठेवावे. तसेच चहासोबत लगेच लोहयुक्त आहार घेतल्यास त्यातील लोहाचे शोषण कमी होऊ शकते.

  • Que: चहासोबत लिंबू खाणे किंवा लिंबाचा रस घेणे योग्य आहे का?

    Ans: चहामध्ये लिंबाचा रस मिसळल्याने काही लोकांना अॅसिडिटी किंवा पोटात जळजळ होऊ शकते. ज्यांना आम्लपित्ताचा त्रास आहे त्यांनी याबाबत विशेष काळजी घ्यावी.

Web Title: Side effects of tea never consume these items alongside tea on an empty stomach sk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 07, 2026 | 08:16 AM

Topics:  

  • Digestion Problem
  • Health Care Tips
  • tea side effects

संबंधित बातम्या

Strong Bones: तरुण वयात गुडघे- कंबरेमध्ये वेदना होतात? मग दुधात मिक्स करून प्या ही पावडर, हाडे होतील बळकट
1

Strong Bones: तरुण वयात गुडघे- कंबरेमध्ये वेदना होतात? मग दुधात मिक्स करून प्या ही पावडर, हाडे होतील बळकट

Poor Circulation Symptoms: पायांवरचे केस अचानक गळतायत? शरीरात दिसून येणाऱ्या ‘या’ लक्षणांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष
2

Poor Circulation Symptoms: पायांवरचे केस अचानक गळतायत? शरीरात दिसून येणाऱ्या ‘या’ लक्षणांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष

High Cholesterol: नसांमध्ये साचून राहिलेले खराब कोलेस्ट्रॉल होईल मुळांपासून नष्ट! दररोज सकाळी चावून खा ‘हे’ १ रुपयांचे पान
3

High Cholesterol: नसांमध्ये साचून राहिलेले खराब कोलेस्ट्रॉल होईल मुळांपासून नष्ट! दररोज सकाळी चावून खा ‘हे’ १ रुपयांचे पान

Breast Cancer: बायोप्सी महत्त्वाची का आहे? स्तनाच्या ऊतींचा छोटासा नमुना घेतल्यानंतर लॅबमध्ये नेमकं काय होतं? जाणून घ्या सविस्तर
4

Breast Cancer: बायोप्सी महत्त्वाची का आहे? स्तनाच्या ऊतींचा छोटासा नमुना घेतल्यानंतर लॅबमध्ये नेमकं काय होतं? जाणून घ्या सविस्तर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.