
Strong Bones: तरुण वयात गुडघे- कंबरेमध्ये वेदना होतात? मग दुधात मिक्स करून प्या ही पावडर, हाडे होतील बळकट
Strong Bones: धावपळीची जीवनशैली, जंक फूडचे अतिसेवन, शारीरिक हालचालींचा अभाव, पोषक घटकांची कमतरता, मानसिक तणाव इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम लगेच शरीरावर दिसून येतो. हाडांचे आरोग्य बिघडल्यानंतर सुरुवातीच्या दिवसांमध्ये अजिबात लक्ष दिले जात नाही. तरुण वयात हाडांच्या वेदना,स स्नायू दुखणे किंवा सांध्यांना सतत सूज येत असेल तर दुर्लक्ष न करता वेळीच डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करणे आवश्यक आहे. हाडांमुळे गुडघे, पायांच्या वेदना वाढतात. त्यामुळे वयाच्या तिशीपासून आहारात प्रोटीन आणि कॅल्शियम असलेल्या पदार्थांचे सेवन करावे. हाडांचे आरोग्य सुधारण्यासाठी गोळ्या औषधांवर अवलंबून न राहता नियमित दुधामध्ये ही पावडर मिक्स करून प्यावी. यामुळे हाडांचे आरोग्य सुधारण्यास मदत होईल.(फोटो सौजन्य – istock)
मखाना
पांढरे तीळ
खसखस
न्युट्रिशन पावडर तयार करण्यासाठी सर्वप्रथम, कढई गरम करून मंद आचेवर मखाना भाजून घ्या. मखाना भाजल्यामुळे पावडर लवकर खराब होणार नाही. त्यानंतर त्याच कढईमध्ये खसखस, पांढरे तीळ घालून वेगवेगळे भाजून घ्या. भाजून घेतलेले सर्व साहित्य थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यात घालून बारीक पावडर करून घ्या. तयार केलेली पावडर काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवा. रात्री झोपण्याआधी किंवा सकाळच्या नाश्त्यात एक ग्लास दुधात मिक्स करून प्यावे.
पांढरे तीळ शरीरासाठी खूप जास्त गुणकारी असतात. यामध्ये कॅल्शियम, फॉस्फरस, मॅग्नेशियम खूप जास्त असते. हाडांमधील कॅल्शियम वाढवण्यासाठी आणि हाडे मजबूत करण्यासाठी पांढरे तीळ गुणकारी ठरतात. बोन्स डेंसिटी वाढवण्यासाठी पांढऱ्या तिळाचा आहारात समावेश करावा. तसेच खसखसमध्ये १८ ग्रॅम प्रोटीन, मँगनीज असते. हाडे मजबूत ठेवण्यासाठी मखाने खूप जास्त गुणकारी ठरतात. दुधामध्ये असलेले गुणकारी घटक शरीरात कॅल्शियम आणि प्रथिने असतात. तसेच रात्री झोपण्याआधी कोमट दुधात चिमूटभर हळद आणि सुंठ पावडर मिक्स करून प्यावे.
दुधामध्ये बदाम, खारीक किंवा अक्रोड पावडर घालून नियमित प्यायल्यास शरीराला आवश्यक पोषण मिळते. चेहऱ्यावरील तेज वाढवण्यासाठी कोमट दुधात केशर आणि वेलची पावडर मिक्स करून प्यावी. तसेच पचनक्रिया बिघडल्यानंतर थंड दुधात तूप मिक्स करावे. यामुळे आतड्यांची हालचाल सुलभ राहते आणि खाल्लेले अन्नपदार्थ सहज होण्यास मदत होते.
Ans: शारीरिक हालचालींचा अभाव, चुकीची बसण्याची पद्धत, स्नायूंची कमजोरी, वजन वाढणे, व्हिटॅमिन डी आणि कॅल्शियमची कमतरता यांमुळे तरुण वयात गुडघे आणि कंबरेमध्ये वेदना होऊ शकतात.
Ans: व्हिटॅमिन डी शरीराला कॅल्शियम शोषून घेण्यास मदत करते. त्यामुळे हाडांची मजबुती टिकवण्यासाठी व्हिटॅमिन डी महत्त्वाचे आहे.
Ans: दूध, दही, पनीर, नाचणी, तीळ, बदाम, हिरव्या पालेभाज्या आणि कॅल्शियमयुक्त पदार्थांचा आहारात समावेश करावा.