Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • TCS Nashik Case |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अ‍ॅसिडीटीपासून आराम आणि उत्तम झोप मिळण्‍यासाठी सोप्या टिप्‍स

तुम्‍हाला रात्री झोपेच्‍या वेळी अस्‍वस्‍थ वाटते का, ज्‍यामुळे पुरेशी झोप मिळत नाही? तर मग, तुम्‍ही एकटे नाहीत. झोप पूर्ण न होणाऱ्या व्‍यक्‍तींच्‍या आकडेवारीसंदर्भात भारत जगातील दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे आणि सर्वेक्षणामधून निदर्शनास येते की, 93 टक्‍के भारतीयांना झोपेची कमतरता जाणवते.

  • By दिपाली नाफडे
Updated On: Sep 12, 2024 | 10:39 AM
अ‍ॅसिडीटीसाठी काय उपाय करावे

अ‍ॅसिडीटीसाठी काय उपाय करावे

Follow Us
Close
Follow Us:

अनेकांसाठी अ‍ॅसिड रिफ्लक्‍समुळे घसा किंवा छातीमध्‍ये जळजळ झाल्‍याने झोपमोड होते.  गॅस्‍ट्रोएसोफेजल रिफ्लक्‍स डिसीज (जीईआरडी) किंवा क्रोनिक अ‍ॅसिड रिफ्लक्‍सचा जवळपास 8 टक्‍के आणि 30 टक्‍के भारतीयांवर परिणाम होतो, ज्‍यामुळे झोपमोड होऊ शकते किंवा झोपेचा दर्जा खराब होऊ शकतो. सर्व्हेक्षणातून सध्या 93 टक्के भारतीयांना अ‍ॅसिडीटीचा त्रास असल्यामुळे झोप नसल्याचे समोर आले आहे. 

अ‍ॅबॉट इंडियाच्‍या मेडिकल अफेअर्सचे संचालक डॉ. जेजो करणकुमार म्‍हणाले, ”अ‍ॅसिडीटीचा व्‍यक्‍तीच्‍या दैनंदिन जीवनासह झोपेच्‍या दर्जावर मोठा परिणाम होऊ शकतो. अपुऱ्या झोपेमुळे अ‍ॅसिड रिफ्लक्‍स, तसेच थकवा, चिडचिड आणि अवधान न लागणे असा त्रास होऊ शकतो. अ‍ॅबॉटमध्‍ये आमचे सोल्‍यूशन्‍स निर्माण करण्‍यावर आणि व्‍यक्‍तींना त्‍यांच्‍या अ‍ॅसिडीटीवर उत्तमप्रकारे नियंत्रण ठेवण्‍यास मदत करण्‍यासाठी जागरूक करण्‍यावर लक्ष केंद्रित आहे.” (फोटो सौजन्य – iStock) 

काय सांगतात तज्ज्ञ

डॉ. हार्दिक शाह, कन्‍सल्‍टंट गॅस्‍ट्रोएन्टेरोलॉजिस्‍ट, हेपॅटोलॉजिस्‍ट अँड एन्डोस्‍कोपिस्‍ट, शाह सुपर स्‍पेशालिटी क्लिनिक, भाटिया हॉस्पिटल, वॉकहार्ट हॉस्पिटल आणि जसलोक हॉस्पिटल, मुंबई म्‍हणाले, ”जीईआरडी ही भारतीयांमधील सामान्‍य समस्‍या आहे. माझ्याकडे दर महिन्‍याला येणाऱ्या अनेक रूग्‍णांमध्‍ये गॅस्ट्रिक अ‍ॅसिडीटीसंबंधित लक्षणे दिसून येतात, जसे छातीत जळजळ, ज्‍यामुळे त्‍यांच्‍या झोपेवर परिणाम होतो. या समस्‍यांमध्‍ये वाढ करणाऱ्या खाद्यपदार्थांचे सेवन टाळणे, जीवनशैलीमध्‍ये बदल करणे, तणावाचे व्‍यवस्‍थापन आणि त्‍वरित आराम देणारे उपाय जसे अँटासिड्स किंवा डॉक्‍टरांनी शिफारस केलेली औषधे घेणे यांसारख्‍या सक्रिय उपायांसह या लक्षणांचे त्‍वरित निराकरण करणे महत्त्वाचे आहे.” 

हेदेखील वाचा – ‘या’ हेल्दी ड्रिंक्स करतील ॲसिडिटीचा नायनाट, आजच जाणून घ्या याबद्दल

कशी होतील लक्षणे कमी

अ‍ॅसिडीटी लक्षणे कमी करण्यासाठी काय कराल

अँटासिड्स सिरप्‍स आणि चघळता येणाऱ्या गोळ्यांसह विविध फ्लेवर्स आणि प्रकारांमध्‍ये उपलब्‍ध आहेत, ज्‍यामुळे कूलिंग प्रभाव मिळतो आणि गॅस्ट्रिक अ‍ॅसिडीटीची लक्षणे कमी होतात.  अ‍ॅसिड रिफ्लेक्‍सचा त्रास असतानादेखील उत्तम झोप मिळण्‍यासाठी काही टिप्‍स पुढीलप्रमाणे आहेत, ज्याचा तुम्ही नक्की वापर करावा.     

झोपेची स्थिती सुधारा 

झोपेची काळजी घेणे आवश्यक

छातीत जळजळ होणे कमी करण्‍यासाठी तुमची झोपण्‍याची पद्धत देखील महत्त्वाची आहे. अतिरिक्‍त उशी घेत डोके किंवा शरीराचा वरचा भाग उंचावल्‍याने, तसेच डाव्‍या कुशीवर झोपल्‍याने मदत होऊ शकते. दरम्‍यान, लक्षात ठेवा की पाठीवर झोपल्‍याने अ‍ॅसिड रिफ्लक्‍सचा त्रास होऊ शकतो. 

झोपेचे नियोजन करा 

झोप पूर्ण वेळ कशी मिळेल यासाठी प्रयत्न करा

दररोज झोप अपुरी होत असल्‍यास अ‍ॅसिडीटी पातळ्यांमध्‍ये वाढ होऊ शकते. झोपेचे योग्‍य शेड्युल असणे महत्त्वाचे आहे. दररोज झोपण्‍याची वेळ आणि सकाळी उठण्‍याची वेळ समान असली पाहिजे. यामुळे शरीरातील अवयवांचे कार्य सुरळीत होण्‍यास मदत होते, झोपेचा दर्जा उत्तम होतो. तसेच, आराम करण्‍याचा प्रयत्‍न करा आणि आरामदायी वातावरण तयार करा, वाचन करा किंवा आराम देणाऱ्या तंत्रांचा आनंद घ्‍या (जसे चिंतन), आंघोळ करा, रूममध्‍ये शक्‍यतो अंधार आणि थंडावा ठेवा.  

हेदेखील वाचा – अ‍ॅसिडिटीच्या समस्येला करा बाय बाय, उन्हाळ्यात ‘या’ पदार्थांचे सेवन ठरेल उपयुक्त

आहार सेवनावर लक्ष ठेवा 

आहाराचे योग्य सेवन करा

झोपण्‍यापूर्वी मसालेदार पदार्थांचे किंवा अतिप्रमाणात आहार सेवन करणे टाळा. झोपण्‍यापूर्वी किमान तीन तास अगोदर रात्रीचे जेवण सेवन करा, ज्‍यामुळे अन्‍नपचन योग्‍यप्रकारे होते आणि अ‍ॅसिड रिफ्लक्‍सचा धोका कमी होतो.  खरेतर, दिवसभरात वारंवार लहान प्रमाणात आहार सेवन केल्‍यास उत्तम ठरू शकते. चॉकलेट, लिंबूवर्गीय फळे व टोमॅटो यांसारख्‍या अ‍ॅसिडीटी वाढवणाऱ्या खाद्यपदार्थांचे सेवन करणे टाळा. तसेच झोपण्‍यापूर्वी मद्यपान व कॅफिनचे सेवन कमी करा.    

जीवनशैली बदल करा 

तणावामुळे अ‍ॅसिडीटी वाढू शकते. आरामदायी तंत्रे, नियमित व्‍यायाम आणि मानसिक आरोग्‍य उत्तम राखणाऱ्या क्रियाकलापांसह तणावाचे उत्तमप्रकारे व्‍यवस्थापन करा.  नियमित शारीरिक व्‍यायाम उत्तम ठरू शकतो, पण झोपण्‍यापूर्वी अधिक प्रमाणात व्‍यायाम करणे टाळा. झोपण्‍यापूर्वी मनात अधिक विचार करू नका.   

गरज असल्‍यास डॉक्‍टरांचा सल्‍ला घ्‍या 

डॉक्टरांकडून योग्य सल्ला घ्या

तुम्‍हाला सतत गॅस्ट्रिक अ‍ॅसिडीटीचा त्रास होत असेल तर वैयक्तिक मार्गदर्शन आणि उपचार पर्यायांसाठी डॉक्‍टरांचा सल्‍ला घ्‍या. ते उपयुक्‍त जीवनशैली बदल किंवा औषधोपचारांची शिफारस करू शकतात, ज्‍यामुळे तुम्‍ही अ‍ॅसिडीटीचे व्‍यवस्‍थापन करण्‍यासोबत झोपेचा दर्जा सुधारू शकता. 

या टिप्‍सचे पालन करत आणि अ‍ॅसिडीटी वाढवणाऱ्या घटकांवर नियंत्रण ठेवत तुम्‍ही रात्रीच्‍या वेळी आरामदायी, उत्‍साहपूर्ण झोपेचा आनंद घेऊ शकता, ज्‍यामुळे सकाळी उठल्‍यानंतर उत्‍साहवर्धक वाटेल आणि तुम्‍ही दिवसभरातील कामासाठी उत्‍साहाने सुसज्‍ज असाल.

Web Title: Home remedies to get rid of acidity and to get good sleep in the night

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 12, 2024 | 10:39 AM

Topics:  

  • health issues

संबंधित बातम्या

Black Rain : युद्धापेक्षाही भयंकर ‘ब्लॅक रेन’चा विळखा! इराणमध्ये आकाशातून बरसतोय मृत्यू; तेल साठ्यांवरील हल्ल्यांनी निसर्गाचा कोप
1

Black Rain : युद्धापेक्षाही भयंकर ‘ब्लॅक रेन’चा विळखा! इराणमध्ये आकाशातून बरसतोय मृत्यू; तेल साठ्यांवरील हल्ल्यांनी निसर्गाचा कोप

Pakistan HIV : माणुसकीला काळिमा! पाकिस्तानमध्ये एकाच सुईने 331 चिमुरड्यांना दिला मृत्यूचा डोस; सरकारी रुग्णालयाचा भयंकर प्रताप
2

Pakistan HIV : माणुसकीला काळिमा! पाकिस्तानमध्ये एकाच सुईने 331 चिमुरड्यांना दिला मृत्यूचा डोस; सरकारी रुग्णालयाचा भयंकर प्रताप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.