Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 25 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Black Rain : युद्धापेक्षाही भयंकर ‘ब्लॅक रेन’चा विळखा! इराणमध्ये आकाशातून बरसतोय मृत्यू; तेल साठ्यांवरील हल्ल्यांनी निसर्गाचा कोप

Iran तेहरानमधील तेल डेपोंवरील हल्ल्यानंतर 'काळ्या पावसाने' हाहाकार माजवला आहे! तेहरानमधील विषारी पाऊस आणि पीएम २.५ च्या धोकादायक पातळीमुळे एक आरोग्य संकट निर्माण झाले आहे.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Apr 18, 2026 | 01:25 PM
iran black rain tehran health crisis environmental impact us missile strikes 2026

iran black rain tehran health crisis environmental impact us missile strikes 2026

Follow Us
Follow Us:
  • काय आहे ‘ब्लॅक रेन’?
  • आरोग्याचे भीषण संकट
  • पुढच्या पिढीवर टांगती तलवार

Tehran oil refinery attack environmental impact : इराण (iran) आणि अमेरिका यांच्यातील युद्धाने आता एका अशा वळणावर प्रवेश केला आहे, जिथे केवळ बॉम्ब आणि क्षेपणास्त्रेच नव्हे, तर निसर्गही माणसाचा शत्रू बनला आहे. मार्च २०२६ मध्ये तेहरान आणि आसपासच्या तेल शुद्धीकरण कारखान्यांवर झालेल्या अमेरिकन क्षेपणास्त्र हल्ल्यांमुळे इराणमध्ये ‘ब्लॅक रेन’ म्हणजेच काळ्या पावसाने हाहाकार माजवला आहे. हे युद्ध आता रणांगणावरून थेट लोकांच्या फुफ्फुसात आणि घरात शिरले असून, याचे परिणाम येणाऱ्या अनेक दशकांपर्यंत टिकू शकतात, असा इशारा शास्त्रज्ञांनी दिला आहे.

आकाशातून पडणारे ‘चिटकणारे मृत्यू’

जेव्हा तेहरानमधील तेल साठ्यांवर हल्ले झाले, तेव्हा लाखो लिटर कच्चे तेल जळून खाक झाले. या अपूर्ण ज्वलनातून निर्माण झालेला काळा धूर, कार्बनचे अतिसूक्ष्म कण आणि विषारी रसायने वातावरणात मैलोन्मैल पसरली. जेव्हा पाऊस पडला, तेव्हा हे कण पावसाच्या थेंबांमध्ये मिसळून जमिनीवर ‘काळ्या आणि चिकट’ स्वरूपात पडू लागले. यालाच ‘ब्लॅक रेन’ म्हटले जाते. हा पाऊस म्हणजे केवळ पाणी नसून ते रसायने, जड धातू आणि कर्करोग निर्माण करणाऱ्या घटकांचे जीवघेणे मिश्रण आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Hormuz Strait : जगाची जीवनवाहिनी ‘होर्मुझची सामुद्रधुनी’ पुन्हा प्रवाहित! पण ट्रम्प यांच्या ‘या’ एका इशाऱ्याने तणावाचे वातावरण

तेहरान बनले ‘गॅस चेंबर’

या काळ्या पावसामुळे तेहरानमधील हवेची गुणवत्ता कमालीची खालावली आहे. हवेतील PM 2.5 (अतिसूक्ष्म कण) ची पातळी सामान्य मर्यादेपेक्षा कित्येक पटींनी वाढली आहे. हे कण इतके लहान असतात की ते थेट फुफ्फुसांमधून रक्ताभिसरण संस्थेत प्रवेश करतात. स्थानिक रहिवाशांच्या मते, सध्या तिथले वातावरण एखाद्या “रासायनिक हल्ल्यासारखे” झाले आहे. लोकांना डोळ्यांची जळजळ, श्वास घेण्यास प्रचंड त्रास, कातडीचे आजार आणि तीव्र ॲलर्जीचा सामना करावा लागत आहे.

Thick, toxic smoke and black, acid rain has blanketed Iran’s capital, Tehran, this week, after missiles damaged oil depots and refinerieshttps://t.co/WsC27KY86N — nature (@Nature) March 11, 2026

credit – social media and Twitter

भावी पिढ्यांचे काय?

सर्वात भीतीदायक बाब म्हणजे या प्रदूषणाचे दीर्घकालीन परिणाम. या पावसात सल्फर डायऑक्साइड, नायट्रोजन ऑक्साईड आणि शिसे (Lead), कॅडमियम यांसारखे जड धातू आहेत. हे धातू माती आणि भूजलात मिसळल्याने शेती आणि पिण्याचे पाणी विषारी झाले आहे. याचा सर्वाधिक फटका गर्भवती महिलांना बसत असून, जन्माला येणाऱ्या बाळांमध्ये मज्जासंस्थेचे दोष आणि कमकुवत रोगप्रतिकारशक्ती निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. शास्त्रज्ञांच्या मते, हा एक प्रकारचा ‘स्लो पॉयझन’ असून तो इराणच्या पुढच्या पिढीला अपंग बनवू शकतो.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Paris Summit: ‘मॅक्रॉन यांनी मेलोनींना मारली मिठी अन् Kiss…’ पॅरिस शिखर परिषदेतील ‘तो’ VIDEO VIRAL; मेलोनींची खास प्रतिक्रिया

पर्यावरणाची मोठी हानी

युद्धाच्या पहिल्या दोन आठवड्यांतच ५ दशलक्ष टन कार्बन उत्सर्जन झाले आहे, जे एका मध्यम देशाच्या वार्षिक उत्सर्जनाइतके आहे. हा काळा धूर केवळ इराणपुरता मर्यादित नसून तो हिमनद्या वितळण्यास कारणीभूत ठरत आहे, ज्यामुळे जागतिक तापमानवाढीचा धोका वाढला आहे. युद्ध कदाचित आज संपेल, पण या ‘काळ्या पावसाने’ माती आणि पाण्यात पेरलेले विष पुढची ५० वर्षे मानवाचा पाठलाग करत राहील.

💡

Frequently Asked Questions

  • Que: 'ब्लॅक रेन' किंवा काळा पाऊस म्हणजे नक्की काय?

    Ans: तेल डेपो किंवा रासायनिक प्रकल्पांना आग लागल्यानंतर वातावरणात पसरलेले कार्बन आणि तेलाचे कण पावसासोबत खाली येतात, त्याला काळा पाऊस म्हणतात.

  • Que: हा पाऊस आरोग्यासाठी किती घातक आहे?

    Ans: यामध्ये कॅन्सर निर्माण करणारी रसायने आणि जड धातू असतात, ज्यामुळे फुफ्फुसाचे आजार, हृदयविकार आणि डीएनएचे नुकसान होऊ शकते.

  • Que: मुलांच्या आरोग्यावर याचा काय परिणाम होतो?

    Ans: गर्भवती महिलांमार्फत हे विष बाळापर्यंत पोहोचू शकते, ज्यामुळे बाळाची वाढ खुंटणे आणि मज्जासंस्थेचे आजार होण्याचा धोका असतो.

Web Title: Iran black rain tehran health crisis environmental impact us missile strikes 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 18, 2026 | 01:25 PM

Topics:  

  • chemical
  • health issues
  • iran
  • World news

संबंधित बातम्या

Ebola Outbreak : फ्रान्समध्ये इबोलाचा शिरकाव!कॉंगोहून परतलेल्या डॉक्टरमध्ये आढळला संसर्ग; WHO कडून अलर्ट जारी
1

Ebola Outbreak : फ्रान्समध्ये इबोलाचा शिरकाव!कॉंगोहून परतलेल्या डॉक्टरमध्ये आढळला संसर्ग; WHO कडून अलर्ट जारी

Venezuela Earthquake: व्हेनेझुएलामध्ये 7.5 तीव्रतेच्या भूकंपाने भीषण तांडव; 22 मजली इमारत जमीनदोस्त, जपानसह अनेक देश हादरले
2

Venezuela Earthquake: व्हेनेझुएलामध्ये 7.5 तीव्रतेच्या भूकंपाने भीषण तांडव; 22 मजली इमारत जमीनदोस्त, जपानसह अनेक देश हादरले

India LPG Import : भारतावरील ऊर्जा संकट टळणार? अमेरिकेकडून जूनमध्ये विक्रमी १० लाख टन LPG आयात
3

India LPG Import : भारतावरील ऊर्जा संकट टळणार? अमेरिकेकडून जूनमध्ये विक्रमी १० लाख टन LPG आयात

India-Pakistan Dispute : पाकिस्तानची बोलती बंद! UNSC मध्ये काश्मीर मुद्याचा उल्लेख करताचा भारताने दाखवला आरसा
4

India-Pakistan Dispute : पाकिस्तानची बोलती बंद! UNSC मध्ये काश्मीर मुद्याचा उल्लेख करताचा भारताने दाखवला आरसा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.