Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 22 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pakistan HIV : माणुसकीला काळिमा! पाकिस्तानमध्ये एकाच सुईने 331 चिमुरड्यांना दिला मृत्यूचा डोस; सरकारी रुग्णालयाचा भयंकर प्रताप

Hospital HIV Outbreak: पाकिस्तानमधील टोंसा येथील एका सरकारी रुग्णालयात घोर निष्काळजीपणा उघडकीस आला आहे. एकाच सिरिंजच्या वापरामुळे ३३१ निष्पाप मुलांना एचआयव्हीची लागण झाली असून, या प्रकरणाची सध्या चौकशी सुरू आहे.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Apr 15, 2026 | 03:23 PM
pakistan hospital negligence 331 children infected with hiv single syringe reuse 2026

pakistan hospital negligence 331 children infected with hiv single syringe reuse 2026

Follow Us
Follow Us:
  • सरकारी रुग्णालयाचे पातक
  • बीबीसीचा ‘स्टिंग ऑपरेशन’मध्ये पर्दाफाश
  • संपूर्ण पिढी धोक्यात

Pakistan HIV outbreak Taunsa hospital : शेजारील देश पाकिस्तानमधून एक अशी बातमी समोर आली आहे, जी ऐकून कोणत्याही संवेदनशील व्यक्तीच्या अंगावर शहारे येतील. पाकिस्तानमधील टौन्सा (Taunsa) येथील एका सरकारी रुग्णालयाने निष्काळजीपणाच्या सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. उपचारासाठी आलेल्या ३३१ निष्पाप मुलांना रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी चक्क एकाच सिरिंजचा वापर करून एचआयव्ही (HIV) सारख्या जीवघेण्या आजाराच्या खाईत लोटले आहे. हा प्रकार इतका भयंकर आहे की, यामुळे आता संपूर्ण पाकिस्तानच्या आरोग्य व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

बीबीसीचा खळबळजनक खुलासा: कॅमेऱ्यात कैद झाले मृत्यूचे तांडव

या घटनेचा पर्दाफाश बीबीसीच्या एका विशेष तपास पथकाने केला आहे. तपास पथकाने रुग्णालयात गुप्तपणे ३२ तासांहून अधिक काळ व्हिडिओ रेकॉर्डिंग केले. या फुटेजमध्ये जे दिसले ते अत्यंत भयावह होते. वैद्यकीय कर्मचारी स्वच्छतेच्या कोणत्याही मानकांचे पालन करत नव्हते. अनेक रुग्णांवर एकामागून एक त्याच सुईचा आणि सिरिंजचा वापर केला जात होता. इतकेच नाही तर, एकाच औषधाच्या कुपीतून (Multi-dose vial) औषध काढून ते वेगवेगळ्या मुलांना टोचले जात होते. ही ‘असुरक्षित वैद्यकीय पद्धत’ (Unsafe Medical Practices) ३३१ मुलांच्या आयुष्याशी खेळणारी ठरली.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : European Union: अमेरिकेला ‘बाय-बाय’! होर्मुझसाठी युरोपचा मोठा प्लॅन; भारत आणि चीनची घेणार मदत? आखाती देशांत नवी समीकरणे

मोहम्मद आणि अस्मा: एका कुटुंबाची शोकांतिका

या भीषण निष्काळजीपणाचा बळी ठरलेल्या मोहम्मद अमीन या ८ वर्षांच्या मुलाची कहाणी अत्यंत हृदयद्रावक आहे. मोहम्मदच्या आईची एचआयव्ही चाचणी निगेटिव्ह आली होती, म्हणजेच मुलाला हा आजार जन्मतः मिळालेला नव्हता. मात्र, सरकारी रुग्णालयात किरकोळ उपचारासाठी गेलेल्या मोहम्मदला तिथे दूषित सिरिंजद्वारे एचआयव्हीची लागण झाली आणि उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे, त्याची छोटी बहीण अस्मा हिची चाचणीही पॉझिटिव्ह आली आहे. केवळ मोहम्मद आणि अस्माच नव्हे, तर अशा ९७ कुटुंबांपैकी ९३ मातांची चाचणी निगेटिव्ह आली आहे, ज्यावरून हे स्पष्ट होते की संसर्ग केवळ रुग्णालयातील अस्वच्छतेमुळेच झाला आहे.

How and why Pakistani hospitals might be putting children at risk of HIV. 🎧 A window into our world, through in-depth storytelling https://t.co/9T22afOzud — BBC World Service (@bbcworldservice) April 14, 2026

credit – social media and Twitter

डॉक्टरांचा इशारा आणि प्रशासनाचे दुर्लक्ष

२०२४ च्या अखेरीस स्थानिक डॉक्टर गुल कैसरानी यांच्या लक्षात आले की त्यांच्याकडे येणाऱ्या मुलांमध्ये एचआयव्हीची लक्षणे वेगाने वाढत आहेत. त्यांनी जेव्हा या मुलांच्या वैद्यकीय इतिहासाचा अभ्यास केला, तेव्हा त्यांना समजले की या सर्व ६५ ते ७० मुलांवर यापूर्वी टीएचक्यू तौन्सा (THQ Taunsa) या सरकारी रुग्णालयात उपचार झाले होते. त्यांनी वारंवार प्रशासनाला सावध करण्याचा प्रयत्न केला, परंतु प्रशासनाने वेळीच पावले उचलली नाहीत. परिणामी, नोव्हेंबर २०२४ ते ऑक्टोबर २०२५ या एका वर्षात ३३१ हून अधिक बालके या आजाराचे बळी ठरली.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : European Union: अमेरिकेला ‘बाय-बाय’! होर्मुझसाठी युरोपचा मोठा प्लॅन; भारत आणि चीनची घेणार मदत? आखाती देशांत नवी समीकरणे

पाकिस्तानच्या आरोग्य व्यवस्थेचे पितळ उघडे

या घटनेने पाकिस्तानमधील सरकारी आरोग्य सेवा किती खिळखिळी झाली आहे, हे जगासमोर आणले आहे. स्वच्छतेचा अभाव, सुईचा पुनर्वापर आणि कर्मचाऱ्यांची बेफिकीरी यामुळे निष्पाप जिवांचे आयुष्य उद्ध्वस्त झाले आहे. हे केवळ एका रुग्णालयाचे प्रकरण नसून, पाकिस्तानच्या दुर्गम भागात अशा अनेक घटना घडत असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सध्या या प्रकरणाची आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा सुरू असून, जबाबदार वैद्यकीय कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: पाकिस्तानमध्ये ३३१ मुलांना एचआयव्हीची लागण कशी झाली?

    Ans: पाकिस्तानमधील टौन्सा येथील सरकारी रुग्णालयात वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी अनेक रुग्णांवर एकाच सिरिंजचा (Syringe Reuse) वापर केला, ज्यामुळे हा संसर्ग वेगाने पसरला.

  • Que: या प्रकरणाचा खुलासा कोणी केला?

    Ans: बीबीसीच्या एका विशेष गुप्त तपास पथकाने (Secret Investigation) ३२ तासांच्या व्हिडिओ फुटेजद्वारे हा निष्काळजीपणा उघडकीस आणला.

  • Que: मुलांच्या मातांची चाचणी निगेटिव्ह असूनही त्यांना संसर्ग कसा झाला?

    Ans: या प्रकरणातील ९०% पेक्षा जास्त मुलांच्या माता निगेटिव्ह आहेत, ज्याचा अर्थ हा संसर्ग आईकडून मुलाकडे आलेला नसून केवळ रुग्णालयातील दूषित सुयांमुळे झाला आहे.

Web Title: Pakistan hospital negligence 331 children infected with hiv single syringe reuse 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 15, 2026 | 03:23 PM

Topics:  

  • AIDS
  • health issues
  • Pakistan News

संबंधित बातम्या

Flood News : भारताच्या शेजारी देशात मुसळधार पावसाचा हाहा:कार; १२ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
1

Flood News : भारताच्या शेजारी देशात मुसळधार पावसाचा हाहा:कार; १२ जणांचा मृत्यू, अनेक जखमी

Fazlur Rehman: ‘कारगिल युद्धाचे सर्वात मोठे पाप, पाकिस्तानी लष्कराने स्वतःच्या सैनिकांचे मृतदेह’ मौलाना डिझेल यांचा खळबळजनक दावा
2

Fazlur Rehman: ‘कारगिल युद्धाचे सर्वात मोठे पाप, पाकिस्तानी लष्कराने स्वतःच्या सैनिकांचे मृतदेह’ मौलाना डिझेल यांचा खळबळजनक दावा

India Nuclear Power : भारताने एअरबेसवर अचानक तैनात केली 12 अण्वस्त्रे; SIPRI रिपोर्ट बनला चर्चेचा विषय, पाकिस्तान चिंतेत
3

India Nuclear Power : भारताने एअरबेसवर अचानक तैनात केली 12 अण्वस्त्रे; SIPRI रिपोर्ट बनला चर्चेचा विषय, पाकिस्तान चिंतेत

Male Fertility: फक्त सिगारेट-तंबाखूच नाही, ‘या’ कारणांमुळेही स्पर्म काउंट होऊ शकतो कमी
4

Male Fertility: फक्त सिगारेट-तंबाखूच नाही, ‘या’ कारणांमुळेही स्पर्म काउंट होऊ शकतो कमी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.