मानेवरील काळेपणा घालवण्यासाठी घरगुती उपाय
महिला सुंदर त्वचा मिळवण्यासाठी अनेक प्रयत्न करत असतात. पण कधीच मानेच्या त्वचेकडे लक्ष देत नाही. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये किंवा इतर वेळी उन्हामुळे आणि वातावरणातील आद्र्रतेमुळे शरीराला घाम येतो. सतत घाम येत राहिल्यामुळे शरीराच्या काही अवयवांवर घाम तसाच साचून राहतो. यामुळे हळूहळू मान आणि हातांच्या कोपऱ्यांची त्वचा काळी होऊ लागते. काळी झालेल्या त्वचेकडे लक्ष न दिल्यामुळे त्वचेवर मृत पेशी तशाच जमा होऊन राहतात. मन काळी झाल्यानंतर ती पुन्हा एकदा उजळ्वण्यासाठी अनेक प्रयत्न करावे लागतात.
वातावरणातील धूळ, मातीचे कण जसे त्वचेवर साचून राहतात, तसेच ते शरीराच्या इतर भागांवर सुद्धा तसेच साचून राहतात. त्यामुळे शरीराच्या स्वच्छतेकडे लक्ष देणे गरजेचे आहे. मानेवर काळेपणाचा थर साचून राहिल्यामुळे काही वेळा महिलांचा आत्मविश्वास कमी होऊन जातो. चार माणसांमध्ये गेल्यानंतर लाजिरवण्यासारखे वाटते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला मानेवरील काळेपणा घालवण्यासाठी स्वयंपाक घरातील पदार्थाबद्दल सांगणार आहोत. बेसनाचा वापर करून मानेवरील काळेपणा कसा घालवावा, जाणून घेऊया सविस्तर.(फोटो सौजन्य-istock)
हे देखील वाचा: Navratri 2024 : गरबा खेळण्यासाठी चेहऱ्यावर ग्लो हवाय ? मग ‘असा’ बनवा ग्रीन टी चा फेसपॅक, होतील ‘हे’ आश्चर्यकारक फायदे
मानेवरील किंवा शरीराच्या इतर भागावरील काळेपणा घालवण्यासाठी तुम्ही बेसन आणि हळदीचा वापर करू शकता. कारण हळदीमध्ये असलेल्या गुणधर्मांमुळे मानेवरील काळेपणा कमी होण्यास मदत होईल. हळदीमध्ये अँटीबॅक्टरीयल गुणधर्म आढळून येतात, ज्यामुळे काळे डाग किंवा पिगमेंटेशन कमी होण्यास मदत होते. हळद बेसन पॅक बनवण्यासाठी वाटीमध्ये बेसन घेऊन त्यात हळद आणि पाणी टाकून पेस्ट तयार करा. तयार केलेली पेस्ट मानेवर लावून ठेवा. मानेवर लावून १५ मिनिटं झाल्यानंतर स्वच्छ पाण्याने धुवा.
हे देखील वाचा: काळ्याभोर आणि लांबसडक केसांसाठी मेथी दाण्यांमध्ये मिक्स करा ‘हे’ लाल फुल, केसांवर येईल चमक
वाटीमध्ये बेसन घेऊन त्यात २ चमचे दही आणि लिंबाचा रस टाकून मिक्स करून घ्या. या मिश्रणाची जाडसर पेस्ट बनवा. तयार केलेली पेस्ट संपूर्ण मानेवर लावून लिंबाच्या सालीने हलक्या हाताने मसाज करा. यामुळे मानेवरील काळेपणा कमी होईल. त्यानंतर ५ मिनिटं ठेवून चेहरा कोमट पाण्याने स्वच्छ करा. हा उपाय नियमित केल्यास मानेवरील काळेपणा कमी होण्यास मदत होईल.