मेथी दाणे जास्वंदी हेअर मास्क लावण्याचे फायदे
सर्वच महिला पुरुषांना काळेभोर सुंदर केस हवे असतात. पण वातावरणात सतत होणाऱ्या बदलांचा परिणाम केसांवर होण्याची शक्यता असते. सतत केस गळणे, केसांमध्ये कोंडा होणे, केसांच्या मुळांना खाज येणे इत्यादी अनेक समस्या उद्भवतात. या समस्या उद्भवू लागल्यानंतर आरोग्य बिघडण्याची शक्यता असते. त्यामुळे आरोग्यासोबतच केसांची सुद्धा काळजी घेणे आवश्यक आहे. केसांच्या निरोगी आणि मजबूत वाढीसाठी अनेक वेगवेगळ्या प्रकारचे शॅम्पू किंवा कंडिशनर वापरले जातात. पण हे प्रॉडक्ट केसांच्या वाढीसाठी अनेकदा हानिकारक ठरतात. पाण्यात बदल झाल्यानंतर सुद्धा केस गळू लागतात.
वातावरणातील अद्र्तेचा परिणाम जसा त्वचेवर दिसून येतो, तासाचा परिणाम केसांच्या वाढीवर सुद्धा दिसून येतो. वातावरणात बदल झाल्यानंतर केस गळू लागतात. काहीवेळा जास्त प्रमाणात केस गळू लागल्यानंतर केसांमध्ये टक्कल पडेल की काय अशी भीती निर्माण होते. त्यामुळे केसांची काळजी घेण्यासाठी केमिकल युक्त प्रॉडक्ट वापरण्याऐवजी घरगुती पदार्थांचा वापर करावा, ज्यामुळे केसांची वाढ निरोगी होईल. आज आम्ही तुम्हाला केसांच्या मजबूत आणि घनदाट वाढीसाठी मेथी दाणे आणि जास्वंदीच्या फुलाचा वापर कसा करावा, याबद्दल सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.
हे देखील वाचा: त्वचेवर खोबरेल तेल लावणं सुरक्षित आहे का? जाणून घ्या खोबरेल तेलाचे त्वचेला होणारे फायदे
हे देखील वाचा: चेहऱ्यावरील ओपन पोअर्समुळे त्रस्त आहात? मग चेहरा उजळ्वण्यासाठी घरीच करून पहा ‘हे’ सोपे उपाय