
शरीरातील 'या' लहान मोठ्या अवयवांमध्ये बिघाड झाल्यानंतर चेहऱ्यावर सतत येतात पिंपल्स
शरीरात होणाऱ्या बदलांचा परिणाम केस आणि त्वचेवर लगेच दिसून येतो. बऱ्याचदा सकाळी झोपेतून उठल्यानंतर मोठे मोठे पिंपल्स आणि फोड येतात. चेहऱ्यावर अचानक आलेले फोड पाहून मनात अनेक वेगवेगळे विचार येतात. चेहऱ्यावर येणाऱ्या पिंपल्समुळे सौंदर्य कमी होऊन जाते आणि चेहरा खूप जास्त निस्तेज वाटू लागतो. कपाळावर, हनुवटीवर किंवा भुवयांवर पिंपल्स आल्यानंतर ते लवकर कमी होत नाही. हळूहळू पिंपल्स मोठे होऊन त्यातून पाणी किंवा पु बाहेर येतो. पिंपल्स आल्यानंतर घालवण्यासाठी महिला बाजारातील महागडे प्रॉडक्ट किंवा स्किन ट्रीटमेंट करून घेतात. वारंवार कोणत्याही स्किन ट्रीटमेंट केल्यास त्वचेची गुणवत्ता आणखीनच खराब होण्याची शक्यता असते. चेहऱ्यावर आलेले पिंपल्स चुकीच्या प्रॉडक्टच्या वापरामुळे नाहीतर शरीरात होणाऱ्या बदलांमुळे सुद्धा त्वचेवर पिंपल्स येतात. चला तर जाणून घेऊया सविस्तर माहिती.(फोटो सौजन्य – istock)
पोट व्यवस्थित स्वच्छ न झाल्यामुळे गालावर मोठे मोठे पिंपल्स येतात. याशिवाय बद्धकोष्ठता, अपचन, गॅस, ऍसिडिटीच्या परिणामामुळे चेहऱ्यावर पिंपल्स येण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे शरीरातील घाण बाहेर काढून टाकण्यासाठी सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी लिंबाचा रस किंवा डिटॉक्स पेयांचे नियमित सेवन करावे.
बऱ्याचदा फुफ्फुसांसंबधित समस्या उद्भवल्यानंतर अनेक लोक कायमच दुर्लक्ष करतात. पण वारंवार दुर्लक्ष करणे शरीरासाठी धोक्याचे ठरते. धूळ, प्रदूषण किंवा फुफ्फुसांचे आजार झाल्यानंतर गालाच्या मधोमध पिंपल्स येतात. हे पिंपल्स त्वचेचे गंभीर नुकसान करतात. त्यामुळे त्वचेच्या समस्या वाढू लागल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करावेत.
युटेरस किंवा हार्मोन्सचे असंतुलन झाल्यामुळे हनुवटीवर मोठे पिंपल्स येतात. हे पिंपल्स प्रामुख्याने महिलांच्या त्वचेवर दिसून येतात. त्यामुळे शरीरातील हार्मोन्सची पातळी संतुलित ठेवणे आवश्यक आहे. हनुवटीवर पिंपल्स आल्यानंतर घरगुती उपाय करावेत. हार्ट अटॅक, हार्ट ब्लॉकेज किंवा हृद्यासंबंधित कोणत्याही समस्या उद्भवू लागल्यानंतर नाकाच्या टोकावर पिंपल्स येतात.
चेहऱ्यावर आलेले पिंपल्स आणि मुरुमांचे डाग कमी करण्यासाठी संतुलित आहार घेणे आवश्यक आहे. याशिवाय भरपूर पाण्याचे सेवन केल्यामुळे शरीरातील घाण बाहेर पडून जाते आणि आरोग्य सुधारते. त्वचा हायड्रेट ठेवण्यासाठी ३ लिटर पेक्षा जास्त पाणी प्यावे. आहारात हिरव्या पालेभाज्या, फळे आणि सुका मेवा खाल्ल्यास शरीरासोबतच त्वचेला पोषण मिळेल. मानसिक तणाव कमी करण्यासाठी नियमित व्यायाम, ध्यान आणि मेडिटेशन करणे आवश्यक आहे. वारंवार चेहऱ्यावर एकाच ठिकाणी पिंपल्स येत असतील तर डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करावेत.