तांदळाच्या पिठाचा 'या' पद्धतीने करा वापर
सुंदर दिसण्यासाठी महिला सतत काहींना काही करत असतात. कधी मेकअप केला जातो तर कधी बाजारात उपलब्ध असलेल्या वेगवेगळ्या ट्रीटमेंट करून त्वचा आणखीनच उजळदार आणि सुंदर केली जाते. पण उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये तेलकट चिकट त्वचेवर आलेले पिंपल्स किंवा फोड लगेच निघून जात नाही. याशिवाय सर्वच महिलांच्या त्वचेवर ब्लॅकहेड्स, व्हाईटहेड्स मोठ्या प्रमाणावर येतात. काहींच्या नाकावर येतात, तर काहींना ओठांच्या खाली येतात. मात्र चेहऱ्यावर ब्लॅकहेड्स आल्यानंतर त्वचा अधिक निस्तेज आणि खराब दिसू लागते. नाकावर आलेले ब्लॅकहेड्स घालवण्यासाठी महिला काहींना काही उपाय, क्रीम्स इत्यादी अनेक गोष्टी लावल्या जातात.(फोटो सौजन्य – iStock)
डोळ्यांखालील काळी वर्तुळे थकवा आणि झोपच नाही तर असू शकते ‘या’ आजरांचे लक्षण; वेळीच जाणून घ्या
सर्वच महिलांना ब्लॅकहेड्सची समस्या उद्भवते. त्वचेमधील छिद्रांमध्ये घाण किंवा प्रदूषणाचे बारीक कण उडाल्यानंतर ते थेट त्वचेमध्ये जातात. ज्यामुळे चेहऱ्यावर ब्लॅकहेड्स किंवा व्हाईटहेड्स येण्याची जास्त शक्यता असते. हवेच्या जास्त संपर्कात आल्यामुळे त्वचा अधिकच खराब होऊन जाते. नाकावर आलेले ब्लॅकहेड्स घालवण्यासाठी बाजारात अनेक प्रॉडक्ट उपलब्ध आहेत. स्क्रब्स आणि स्ट्रिप्स, फेशिअल किंवा क्लीनअप करून घेतले जाते. मात्र हे उपाय करण्याऐवजी घरगुती उपाय करून त्वचेची काळजी घ्यावी. आज आम्ही तुम्हाला नाकावर आलेले ब्लॅकहेड्स घालवण्यासाठी तांदळाच्या पिठाचा वापर कसा करावा, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.
घरगुती उपाय त्वचा आतून स्वच्छ करण्यास मदत करतात. तांदळाच्या पिठात असलेल्या गुणधर्मांमुळे त्वचा अधिक सुंदर आणि चमकदार होते. चेहऱ्यावर वाढलेली डेड स्किन घालवण्यासाठी तुम्ही या फेसपॅकचा वापर करू शकता. टोमॅटो त्वचेवर वाढलेले टॅनिंग कमी करण्यासाठी मदत करते. मधाचा वापर फेसपॅक बनवतना केस त्वचा अधिक सुंदर होईल.