डोळ्यांखालील काळी वर्तुळ घालवण्यासाठी घरगुती उपाय:
सर्वच महिलांना सुंदर आणि चमकदार त्वचा हवी असते. पण डोळ्यांखाली आलेली काळी वर्तुळ त्वचेचे सौंदर्य खराब करून टाकतात. सर्वच महिलांना सामान्यपणे उद्भवणारी समस्या म्हणजे डोळ्यांखाली येणारी काळी वर्तुळ. यामुळे त्वचेचा संपूर्ण लुक खराब होऊन जातो. त्यामुळे डोळ्यांखाली आलेल्या काळ्या वर्तुळांकडे दुर्लक्ष न करता त्वचेची योग्य ती काळजी घ्यावी. काही महिला या समस्येकडे दुर्लक्ष करतात, ज्यामुळे डोळ्यांखालची त्वचा आणखीनच गडद होत जाते. डोळ्यांखाली आलेल्या काळ्या वर्तुळांमुळे त्वचा जास्त थकल्यासारखी दिसू लागते. त्यामुळे त्वचेच्या समस्यांकडे लक्ष देऊन योग्य ते उपाय करावे. (फोटो सौजन्य-istock)
स्किन केअरसंबंधित बातम्यांसाठी इथे क्लिक करा
डोळ्यांखाली काळी वर्तुळ आल्यानंतर अनेक महिला बाजारात उपलब्ध असलेल्या क्रीम्स आणून लावतात. या क्रीम्स लावल्यामुळे काहीकाळ त्वचा चमकदार आणि सुंदर दिसते. मात्र पुन्हा एकदा त्वचा होती तशीच होऊन जाते. डोळ्यांखाली काळी वर्तुळ येण्यामागे अनेक कारण आहेत. अपुऱ्या झोपेमुळे डोळ्यांखाली काळी वर्तुळ येतात. त्यामुळे नियमित ८ तासांची शांत झोप घेणे आवश्यक आहे. डोळ्यांखाली आलेली काळी वर्तुळ कायमची घालवण्यासाठी विश्रांती घेणे, सकस आहार, नियमित व्यायाम करणे, शरीर हायड्रेट ठेवणे इत्यादी गोष्टी करणे आवश्यक आहे. त्यामुळे डोळ्यांखाली आलेली काळी वर्तुळ घालवण्यासाठी तुम्ही आयुर्वेदातील जेष्ठमधाचा वापर करू शकता. आज आम्ही तुम्हाला डोळ्यांखाली आलेली काळी वर्तुळ घालवण्यासाठी कोणते घरगुती उपाय करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.
स्किन केअरसंबंधित बातम्यांसाठी इथे क्लिक करा
तयार केलेली पेस्ट बोटांच्या किंवा ब्रशच्या सहाय्याने डोळ्यांखाली लावून घ्या. शिवाय हे मिश्रण तुम्ही डोळ्यांच्या बाजूला असलेल्या त्वचेवर सुद्धा लावू शकता. 10 ते 15 मिनिटं लावून झाल्यानंतर हलक्या हाताने 2 मिनिटं मसाज करून पाण्याने त्वचा स्वच्छ धुवून टाका. हा उपाय तुम्ही आठवड्यातून दोन किंवा तीन वेळा केल्यास डोळ्यांखालील काळी वर्तुळ निघून जातील आणि तुम्ही फ्रेश दिसाल.