Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 25 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

चेहऱ्यावर येईल सेलिब्रिटींप्रमाणे चमकदार ग्लो! चमचाभर मसूर डाळीचा ‘या’ पद्धतीने करा वापर,पिंपल्स होतील कायमचे नष्ट

चेहऱ्यावर वाढलेले पिंपल्स आणि डेड स्किन कमी करण्यासाठी मसूर डाळीचा वापर करावा. यामुळे त्वचा आतून स्वच्छ होते आणि चमकदार दिसते. चला तर जाणून घेऊया मसूर डाळीचे क्लीनअप कसे करावे.

  • By सुरुची कदम
Updated On: Jan 04, 2026 | 09:46 AM
चेहऱ्यावर येईल सेलिब्रिटींप्रमाणे चमकदार ग्लो! चमचाभर मसूर डाळीचा 'या' पद्धतीने करा वापर

चेहऱ्यावर येईल सेलिब्रिटींप्रमाणे चमकदार ग्लो! चमचाभर मसूर डाळीचा 'या' पद्धतीने करा वापर

Follow Us
Follow Us:

चेहऱ्यावरील हरवलेला ग्लो पुन्हा परत मिळवण्यासाठी महिला सतत काहींना काही करत असतात. कधी स्किन केअरमध्ये बदल तर कधी बाजारात उपलब्ध असलेल्या महागड्या स्किन ट्रीटमेंट करून त्वचेची काळजी घेतली जाते. पण वातावरणात होणाऱ्या बदलांमुळे त्वचा खूप जास्त कोरडी आणि निस्तेज होऊन जाते. त्वचेची गुणवत्ता खराब झाल्यानंतर ती सुधारण्यासाठी खूप जास्त प्रयत्न करावे लागतात. त्यामुळे उन्हाळ्यासह इतर सर्वच ऋतूंमध्ये त्वचेची योग्य काळजी घ्यावी. शरीरात निर्माण झालेली पाण्याची कमतरता, पोषक घटकांचा अभाव, वारंवार उद्भवणाऱ्या पचनाच्या समस्यांमुळे चेहऱ्यावर मोठे मोठे पिंपल्स आणि पुरळ, मुरूम येतात. चेहऱ्यावर हेच पिंपल्स लवकर निघून जात नाही.(फोटो सौजन्य – istock)

Lifestyle Tips :साठीत वाटाल तिशीतले, ‘या’ गोष्टी आहारात समाविष्ट करा

प्रत्येक महिन्याला महिला क्लीनअप, फेशिअल इत्यादी अनेक गोष्टी करून घेतात. यामुळे चेहऱ्यावरील मळ, डेड स्किन, अतिरिक्त तेल आणि ब्लॅकहेड्स कमी होण्यास मदत होते. पण काही दिवसांमध्ये त्वचा होती तशीच दिसू लागते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला चेहऱ्यावर सेलिब्रिटींप्रमाणे चमकदार ग्लो मिळवण्यासाठी चमचाभर मसूर डाळीचा वापर कशा पद्धतीने करावा, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. जेवणातील अनेक वेगवेगळे पदार्थ बनवण्यासाठी मसूर डाळीचा वापर केला जातो. ही डाळ पदार्थाची चव वाढवण्यासाठी आणि शरीरासाठी सुद्धा अतिशय गुणकारी आहे. यामध्ये असलेले नैसर्गिक घटक त्वचा आतून स्वच्छ करतात.

मसूर डाळ त्वचेसाठी का फायदेशीर आहे?

मसूर डाळीमध्ये असलेले घटक त्वचा स्वच्छ आणि सुंदर करण्यासाठी मदत करतात. याशिवाय त्वचेसंबंधित समस्या वाढू लागल्यानंतर महिला वारंवार दुर्लक्ष करतात. मात्र कालांतराने त्वचा खूप जास्त खराब आणि निस्तेज होऊन जाते. त्यामुळे त्वचा टॅन झाल्यानंतर वेळीच उपचार करावेत. मसूर डाळीमध्ये प्रोटीन, अँटीऑक्सिडंट्स आणि जीवनसत्त्वे असतात, ज्यामुळे त्वचा खोलवर स्वच्छ होते. चेहऱ्यावर जमा झालेला मळ आणि टॅन कमी करण्यासाठी मसूर डाळीचा वापर करावा. यामुळे त्वचेवर नैसर्गिक ग्लो येतो.

मसूर डाळीने क्लीनअप करण्याची कृती:

सर्वप्रथम, वाटीमध्ये दूध घेऊन त्यात मसूर डाळ २ तास भिजत ठेवा. त्यानंतर डाळ मिक्सरमधून बारीक वाटून घ्या. पेस्ट केलेल्या डाळीमध्ये आवश्यकता वाटल्यास गुलाबपाणी मिक्स करून घ्या. त्यानंतर तयार केलेले मिश्रण चेहऱ्यावर लावून हलक्या हाताने मसाज करा. यामुळे त्वचेवर जमा झालेली धूळ आणि माती स्वच्छ होण्यास मदत होईल. तयार केलेली पेस्ट डोळ्यांभोवती वाढलेल्या काळ्या डागांवर लावून गोलाकार आकारात फिरवून स्क्रबिंग करा. यामुळे चेहऱ्यावर जमा झालेली डेड स्किन नष्ट होण्यास मदत होईल.

कोरियन स्किनकेअर रुटीन घ्या! चेहऱ्याला येईल चमक, हिराच जणू

उरलेली पेस्ट चेहऱ्यावर लावून २० मिनिटं तशीच ठेवून घ्या. त्यानंतर कोमट पाण्याने त्वचा स्वच्छ धुवून घ्या. या पद्धतीने क्लीनअप केल्यास चेहऱ्यावर वाढलेला टॅन आठवडाभर कमी होईल आणि त्वचा चमकदार दिसू लागेल. क्लीनअप करून झाल्यानंतर हलके मॉइश्चरायझर किंवा अ‍ॅलोवेरा जेल लावा. यामुळे चेहरा कोरडा पडणार नाही.

मसूर डाळीने क्लीनअप करण्याचे फायदे:

वाढत्या उन्हात चेहऱ्यावर वाढलेले टॅनिंग कमी करण्यासाठी मसूर डाळीचा वापर करावा. या डाळीमध्ये असलेले घटक त्वचा आतून स्वच्छ करतात. याशिवाय चेहऱ्यावर वाढलेल्या सुरकुत्या कमी करण्यासाठी आणि बारीक रेषा नष्ट करण्यासाठी मसूर डाळीचा वापर करावा. चेहऱ्यावरील रक्तभिसरण सुधारण्यासाठी मसूर डाळीचा वापर करावा.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: Get a radiant glow on your face just like celebrities use a spoonful of red lentils in this way

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 04, 2026 | 09:46 AM

Topics:  

  • glowing face
  • home remedies
  • skin care tips

संबंधित बातम्या

Rakshabandhan: Glowing Skin मिळविण्यासाठी हजारो रुपयांची गरज नाही, घरीच करा नैसर्गिक फेशियल
1

Rakshabandhan: Glowing Skin मिळविण्यासाठी हजारो रुपयांची गरज नाही, घरीच करा नैसर्गिक फेशियल

केस खूप जास्त कोरडे झाले आहेत? मग दह्याचा वापर करून घरीच तयार करा हेअर मास्क, केस दिसतील सुंदर
2

केस खूप जास्त कोरडे झाले आहेत? मग दह्याचा वापर करून घरीच तयार करा हेअर मास्क, केस दिसतील सुंदर

पावसाळ्यात व्हिटॅमिन ई कॅप्सूलचा वापर कसा करावा? तज्ञांकडून जाणून घ्या योग्य पद्धत
3

पावसाळ्यात व्हिटॅमिन ई कॅप्सूलचा वापर कसा करावा? तज्ञांकडून जाणून घ्या योग्य पद्धत

ब्राऊन केसांसाठी कायमच हेअर कलरचा वापर करता? मग मेहेंदी भिजवताना मिक्स करा ‘हे’ पदार्थ, केसांना येईल नॅचरल शेड
4

ब्राऊन केसांसाठी कायमच हेअर कलरचा वापर करता? मग मेहेंदी भिजवताना मिक्स करा ‘हे’ पदार्थ, केसांना येईल नॅचरल शेड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.