कपाळावरील सुरकुत्या कमी करण्यासाठी घरगुती उपाय:
वाढत्या वयानुसार त्वचेमध्ये अनेक बदल होण्यास सुरुवात होते. चेहऱ्यावर सुरकुत्या येणे, वांग येणे, पिंपल्स येणे, त्वचा काळी पडणे इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. वय वाढल्यानंतर त्वचेवर उद्भवणाऱ्या समस्या कमी करण्यासाठी अनेक प्रयत्न करावे लागतात. तसेच कमी वयात त्वचेवर आलेले पिंपल्स आणि सुरकुत्या निघून जातात. त्वचा तरुण आणि सुंदर दिसण्यासाठी महिला सतत काहींना काही उपाय करत असतात. कधी घरगुती उपाय केले जातात तर काही केमिकल ट्रीटमेंट घेऊन त्वचेची काळजी घेतली जाते. पण हे सर्व उपाय करून काहीकाळ त्वचा सुंदर दिसते. मात्र कालांतराने त्वचेमध्ये अनेक बदल होऊ लागतात.(फोटो सौजन्य-istock)
स्किन केअरसंबंधित बातम्यांसाठी इथे क्लिक करा
चुकीच्या पद्धतीचा आहार, अपुरी झोप, शरीरात निर्माण झालेली पाण्याची कमतरता, त्वचेची योग्य काळजी न घेणे गोष्टींचा परिणाम आरोग्यासह त्वचेवर लगेच दिसून येतो. त्यामुळे त्वचेची योग्य काळजी घेणे आवश्यक आहे. कपाळावर आलेल्या सुरकुत्या त्वचेचे सौंदर्य खराब करून टाकतात. त्वचेची काळजी घेण्यासाठी केमिकल ट्रीटमेंट करण्याऐवजी घरगुती उपाय करावे, यामुळे त्वचा अधिक सुंदर आणि चमकदार दिसते. आज आम्ही तुम्हाला कपाळावरील सुरकुत्या कमी करण्यासाठी काही घरगुती उपाय सांगणार आहोत. हे उपाय नक्की ट्राय करून पहा.
पपईमध्ये मुबलक प्रमाणात विटामिन सी आढळून येते, ज्यामुळे त्वचेला अनेक फायदे होतात. त्वचेसंबंधित समस्यांपासून आराम मिळवून देण्यासाठी पपईचे सेवन करावे. यामुळे त्वचा नेहमी ताज़ीटवटवीत राहते. कपाळावर आलेल्या सुरकुत्या कमी करण्यासाठी एक चमचा प[पपईचा गर चेहऱ्यावर लावून हलक्या हाताने मालिश करून नंतर चेहरा पाण्याने स्वच्छ करा. यामुळे त्वचा उजळण्यास मदत होईल आणि कपाळावरील सुरकुत्यासुद्धा निघून जातील.
मागील अनेक वर्षांपासून त्वचेसंबंधित समस्यांपासून आराम मिळवून देण्यासाठी खोबरेल तेलाचा वापर करावा. यामुळे त्वचेमधील नैसर्गिक तेल टिकून राहते आणि त्वचा हायड्रेट दिसते. तसेच यामध्ये आढळून येणारे अॅंटी-ऑक्सिडेंट डेड स्किन काढून त्वचा चमकदार आणि सुंदर करण्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. रात्री झोपण्याआधी २ थेंब तेलाने कपाळावर मसाज करावा.
स्किन केअरसंबंधित बातम्यांसाठी इथे क्लिक करा
थंडीच्या दिवसांमध्ये बाजारात संत्र्याच्याबी साली मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असतात. यामध्ये विटामिन सी मोठ्या प्रमाणावर आढळून येते. फेसपॅक तयार करण्यासाठी वाटीमध्ये संत्र्याच्या सालीची पावडर घेऊन त्यात गुलाबी पाणी मिक्स करावे. तयार केलेला फेसपॅक त्वचेला लावून घ्या. फेसपॅक कोरडा झाल्यानंतर चेहरा पाण्याने स्वच्छ धुवा.