त्वचेसाठी उपयुक्त धण्याचे पाणी (फोटो सौजन्य - iStock)
वास्तविक,धण्याचा वापर जेवणाची चव वाढवण्यासाठी केला जातो. पण धण्याचे इतरही अनेक फायदे आहेत. त्याचा एक फायदा म्हणजे चेहऱ्याचे सौंदर्य वाढवणे. जर आपण अख्ख्या धण्याबद्दल बोललो तर ते 30 दिवसांत तुम्हाला इतके सौंदर्य देऊ शकते की लोकांना तुमचा हेवा वाटू लागेल. धण्याचे पाणी हे रामबाण औषधापेक्षा कमी नाही.
अनेक अभ्यासातूनही हे सिद्ध झाले आहे. धण्याचा वापर आपण केवळ मसाला म्हणून नाही तर तुम्ही आरोग्याच्या फायद्यासाठीही करू शकता. धण्याचे पाणी आपल्या शरीराला विविध प्रकारे उपयोगी ठरते. कशा पद्धतीने याचा उपयोग करून घ्यावा जाणून घ्या (फोटो सौजन्य – iStock)
रात्रभर भिजवा धणे
धण्याचा करा वापर
चेहऱ्याचे सौंदर्य वाढवायचे असेल तर धणे रात्रभर भिजत ठेवा. सकाळी उठल्याबरोबर हे पाणी गाळून गाळून प्या. महिनाभर असे केल्यास तुमच्या चेहऱ्यावरील चमक लोकांना आश्चर्यचकित करेल. वास्तविक पोट साफ करण्यासाठी धण्याचे पाणी अतिशय उपयुक्त आहे. हे पोटातील घाण साफ करते आणि तुमचे रक्त देखील फिल्टर करते. त्याचे पाणी तुमचे आरोग्य सुधारू शकते. चेहऱ्यावर घाण निघून जाऊन चेहरा अधिक चमकदार आणि तरूण दिसण्यासाठी तुम्ही नियमित धण्याच्या पाण्याचा वापर करू शकता आणि न चुकता हे पाणी प्यावे
चेहऱ्यावरील नैसर्गिक चमक टिकवून ठेवण्यासाठी नियमित करा ‘ही’ योगासने, त्वचा राहील तरुण
वजन नियंत्रणात आणण्यासाठी
वजन नियंत्रणासाठी वापरा धण्याचे पाणी
धण्याचे पाणी तुमचे वजनही बऱ्याच प्रमाणात नियंत्रित करते. दररोज सकाळी धने बियांचे पाणी वापरा. म्हणजेच हे पाणी प्यायल्याने तुमची चयापचय क्रिया मजबूत होते आणि तुमचे वजन नियंत्रित राहते. जर तुमचे वजन अनियंत्रित असेल आणि तुम्ही व्यायामही करत असाल तर त्यासोबत धण्याचे पाणी प्या. त्यामुळे वजन नियंत्रणात खूप मदत होईल. तुम्ही रोज सकाळी धणे उकळून पाणी प्यायल्यास त्याचा फायदा तुमच्या शरीराला आणि त्वचेलाही होतो
थायरॉईडसाठी गुणकारी
थायरॉईडचा त्रास होऊ नये वाटत असेल तर नक्की धण्याचे पाणी प्या
धण्याचे पाणी थायरॉईडमध्येही खूप गुणकारी आहे. जर तुम्ही अख्ख्या धण्याचे पाणी नियमितपणे पीत असाल तर थायरॉईड नियंत्रित ठेवण्यासाठी तुम्हाला खूप मदत होईल. धण्यामध्ये अनेक प्रकारचे पोषक घटक आढळतात जे थायरॉईड नियंत्रित करण्यासाठी उपयुक्त ठरतात. थायरॉईड हा आजार मुलींना जास्त प्रमाणात होत असून त्यांनी नियमित या पाण्याचा वापर करावा
सुंदर आणि चमकदार त्वचेसाठी ‘या’ पद्धतीने करा मधाचा वापर, त्वचेवरील व्हाईटहेड्स, पिगमेंटेशन होईल गायब
उत्तम पचनासाठी
पचनक्रिया चांगली होण्यासाठी
धण्याचे पाणी तुमची पचनक्रिया सुधारते. हे पाणी तुमच्या पोटासाठी खूप फायदेशीर आहे. संपूर्ण धण्यामध्ये असलेले पोषक तत्व तुमचे पचन सुधारण्यास खूप मदत करतात. ज्यांना बद्धकोष्ठतेची समस्या आहे त्यांना संपूर्ण धण्याचे पाणी प्यायल्याने यापासून सुटका मिळते आणि पचनक्रिया सुरळीत होते आणि तब्बेतही चांगली राहण्यास मदत मिळते
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.