स्तनांमधील खाज कमी करण्यासाठी घरगुती उपाय
महिलांच्या शरीरात सतत काहींना काही बदल होत असतात. हार्मोन्सचे असंतुलन झाल्यानंतर अनियमित मासिक पाळी, लठ्ठपणा, शरीरावर अतिरिक्त चरबी वाढणे इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. याशिवाय त्वचेसंबंधित समस्या उद्भवू लागल्यानंतर काहीवेळा महिला मानसिक दृष्ट्या खचून जातात. वातावरणात सतत होणारे बदल आरोग्यासह त्वचेवर सुद्धा परिणाम करतात. त्वचेमधील आर्द्रता कमी झाल्यानंतर त्वचेवर खाज येण्यास सुरुवात होते. अनेकदा महिलांच्या स्तनांमध्ये सुद्धा खाज येऊ लागते. . स्तनामध्ये खाज सुटणे ही एक सामान्य समस्या आहे. मात्र वारंवार स्तनांमध्ये खाज सुटल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ते औषध उपचार करावे.(फोटो सौजन्य – iStock)
त्वचेवरील हरवलेला ग्लो पुन्हा मिळवण्यासाठी ‘या’ पद्धतीने करा मुलतानी मातीचा वापर,चेहरा दिसेल उजळदार
त्वचेमध्ये ओलावा नसणे, हार्मोनल बदल, ऍलर्जी इत्यादी त्वचेसंबंधित समस्यांमुळे स्तनांवर खाज येते. वारंवार खाज आल्यामुळे जळजळ, लालसरपणा किंवा सूज इत्यादी समस्या उद्भवू लागतात. अशावेळी अनेक महिला डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ते औषध उपचार करतात. मात्र काही महिला बाजारात उपलब्ध असलेल्या महागड्या क्रीमचा वापर करतात. पण या गोष्टींचा वापर करण्याऐवजी घरगुती पदार्थांचा वापर खाज येण्याच्या समस्येपासून आराम मिळवावा.
खोबरेल तेलात असलेल्या गुणधर्मांमुळे त्वचेला थंडावा मिळतो. स्तनांखालील पुरळ किंवा खाज कमी करण्यासाठी खोबरेल तेल लावू शकता. यामध्ये अँटी-मायक्रोबियल गुणधर्म आढळून येतात, ज्यामुळे त्वचेसंबंधित समस्या बऱ्या होण्यास मदत होते. तसेच खोबऱ्याच्या तेलात असलेले अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म त्वचेमध्ये होणारी जळजळ आणि खाज कमी करण्यासाठी मदत करतात. यासाठी खोबरेल तेल हातांवर घेऊन स्तनांवर लावून 10ते 15 मिनिटांनी पाण्याने स्वच्छ धुवून टाका. यामुळे खाज आणि पुरळ कमी होईल.
खाज येण्याच्या समस्येपासून आराम मिळवण्यासाठी ऑटमील बाथ चा वापर करावा. गरम केलेल्या पाण्यात बारीक करून घेतलेले ओट्सचे पीठ टाकून मिक्स करून घ्या. त्यानंतर त्या पाण्याने अंघोळ करा. यामुळे त्वचा मुलायम आणि सॉफ्ट होईल. याशिवाय त्वचेसंबंधित अनेक समस्या दूर होतील. स्तनात खाज येत असल्यास दिवसभरातून दोन वेळा अंघोळ करणे आवश्यक आहे.
50 व्या वर्षीही दिसाल तरूण आणि त्वचा राहील तुकतुकीत! डाएटमध्ये फक्त करा ‘याचा’ समावेश
त्वचेसंबंधित समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी चहाच्या झाडाचे तेलक वापरावे. यामध्ये अँटी-बॅक्टेरियल आणि अँटीफंगल गुणधर्म ज्यामुळे जिवाणू आणि जंतू नष्ट होऊन त्वचा पुन्हा एकदा स्वच्छ आणि मुलायम दिसते. चहाचे तेल पाणयात मिक्स करून स्तनांवर लावून घ्या. हा पदार्थ थेट त्वचेवर लावू नये. यामुळे त्वचेचे नुकसान होऊ शकते.