या पद्धतीने करा मुलतानी मातीचा वापर:
सर्वच महिला त्वचेची काळजी घेण्यासाठी सतत काहींना काही उपाय करत असतात. मात्र नेहमी नेहमी त्वचेवर कोणतेही प्रॉडक्ट लावल्यामुळे त्वचेची गुणवत्ता खराब होऊन जाते. त्यामुळे त्वचेची काळजी घेण्यासाठी सतत काहींना काही लावण्याऐवजी आहारात बदल करून त्वचेची गुणवत्ता सुधारावी. चेहऱ्यावर आलेले डाग, पिंपल्स, पिंगमेंटेशन इत्यादी समस्या उद्भवू लागतात. अशावेळी त्वचेसंबंधित समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी मुलतानी मातीचा वापर करावा. मुलतानी मातीचा वापर केल्यामुळे त्वचेसंबंधित अनेक समस्यांपासून आराम मिळतो.(फोटो सौजन्य – iStock)
दिवसभरातून किती वेळा चेहरा स्वच्छ करावा? जाणून घ्या फेसवॉश करण्याची ‘ही’ आहे योग्य पद्धत
मागील अनेक वर्षांपासून मुलतानी मातीचा वापर त्वचेसाठी केला जात आहे. मुलतानी मातीमध्ये असलेले गुणधर्म त्वचा मुलायम आणि ग्लोइंग करण्यासाठी मदत करतात. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला त्वचेवरील हरवलेला ग्लो पुन्हा मिळवण्यासाठी मुलतानी मातीचा वापर कसा करावा, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. मुलतानी मातीमध्ये तुम्ही इतर घरगुती पदार्थ टाकून त्वचेवर लावू शकता.
मुलतानी माती आणि चंदन पावडर मिक्स करून त्वचेवर लावल्यामुळे त्वचेवरील हरवलेला ग्लो पुन्हा परत मिळ्वण्यास मदत होते. मुलतानी माती आणि चंदनचा फेसपॅक बनवण्यासाठी बाऊलमध्ये मुलतानी माती आणि चंदन पावडर मिक्स करून घ्या. त्यानंतर त्यात गुलाब पाणी टाकून मिक्स करून घ्या. मिक्स करून झाल्यानंतर तयार केलेला फेसपॅक त्वचेवर लावून 15 मिनिटं ठेवून नंतर पाण्याने स्वच्छ धुवा. यामुळं त्वचेवर चमक येईल आणि चेहरा सुंदर दिसेल.
आयुर्वेदामध्ये मधला विशेष महत्व आहे. मधाचा वापर त्वचेवर केल्यामुळे त्वचेमध्ये होणारी जळजळ कमी होण्यास मदत होते. यासाठी मुलतानी मातीमध्ये मध मिक्स करून पेस्ट बनवून घ्या. त्यानंतर तयार केलेली पेस्ट त्वचेवर लावून 15 ते 20 मिनिटं ठेवून नंतर पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. हा फेसपॅक आठवड्यातून दोनदा लावल्यामुळे त्वचेमधील घाण स्वच्छ होते.
चाळिशीतही त्वचेवर दिसून येणार नाही वृद्धत्व, Young Skin साठी ‘या’ बॉडी स्क्रबचा वापर करा
पिंपल्स, डाग, त्वचेमधील जळजळ कमी करण्यासाठी गुलाब पाणी अतिशय फायदेशीर आहे.गुलाब पाण्याचा वापर त्वचेवर केल्यामुळे त्वचा थंड राहते. यासाठी वाटीमध्ये मुलतानी माती घेऊन त्यात गुलाब पाणी मिक्स करून पेस्ट तयार करून घ्या. त्यानंतर केलेली पेस्ट त्वचेवर लावून काहीवेळ तशीच ठेवून द्या. त्यानंतर थंड पाण्याने त्वचा स्वच्छ करा. हा उपाय आठवड्यातून दोनदा ऐकीव तीनदा केल्यास त्वचेवर आलेले पिंपल्स, डाग निघून जाण्यास मदत होईल.