ओपन पोअर्स कमी करण्यासाठी घरगुती उपाय
चेहऱ्याचे नैसर्गिक सौंदर्य टिकवून ठेवण्यासाठी महिला सतत काहींना काही उपाय करत असतात. कधी फेसपॅक लावणे. कधी फेस मास्क लावणे,सतत फेस वॉश बदलणे इत्यादी अनेक उपाय केले जातात. पण तुमच्या त्वचेवर जर छिद्र किंवा ओपन पोअर्स असतील तर तुम्ही किती उपाय केले तरीसुद्धा तुमची त्वचा रुक्ष आणि कोरडी दिसेल. ओपन पोअर्स असल्यामुळे त्वचेवर मुरुम, ब्लॅकहेड्स, पिंपल्स इत्यादी अनेक अनेक समस्या वाढू लागतात. तसेच चेहऱ्यावर छिद्र असल्यामुळे त्वचेचा नैसर्गिक ताजेपणा कमी होतो आणि मेकअप सुद्धा नीट बसत नाही. त्यामुळे या समस्येपासून आराम मिळवण्यासाठी केमिकल उपाय न करता घरगुती उपाय करा. यामुळे त्वचा मऊ, चमकदार, ताजीतवानी दिसू लागते.(फोटो सौजन्य-istock)
हे देखील वाचा: हळद आणि या 5 रुपयाच्या पदार्थाने बनवा पॅक, त्वचेच्या समस्यांवर ठरेल जालीम उपाय
ओपन पोअर्स येऊ नये म्हणून काय करावे
सुंदर चमकदार त्वचा मिळवण्यासाठी चेहऱ्यावर बर्फाने मसाज करा. बर्फाने मसाज केल्यास त्वचेवरील छिद्र बंद होण्यास मदत होते. हा एक नैसर्गिक उपाय आहे. यासाठी बर्फाचा खडा कपड्यामध्ये घेऊन हलक्या हाताने चेहऱ्यावर फिरवून घ्या. 2 ते 3 मिनिटं चेहऱ्यावर बर्फ फिरवून झाल्यानंतर पाण्याने चेहरा स्वच्छ करा. हा उपाय नियमित केल्यास त्वचेवरील छिद्र भरण्यास मदत होईल. चेहऱ्यावर बर्फाने मसाज केल्यास त्वचेला आलेली सूज कमी होते.
चेहऱ्यावर लिंबू मधाचा लेप लावल्यामुळे त्वचेवरील छिद्र कमी होतात. मध त्वचेमधील ओलावा कायम टिकवून ठेवण्यास मदत करते तर लिंबाच्या रसात विटामिन सी असते, ज्यामुळे त्वचेवरील डाग निघून जातात. लिंबू मधाचा लेप बनवण्यासाठी 1 चमचा मध घेऊन त्यात 1 चमचा लिंबाचा रस मिक्स करा. लेप तयार करून झाल्यानंतर संपूर्ण त्वचेवर लावा. 10 मिनिटांनी कोमट पाण्याने त्वचा स्वच्छ धुवा.
हे देखील वाचा: केस कोरडे आणि रुक्ष झाले आहेत? मग ‘या’ पद्धतीने करा कापूरचा वापर, केस होतील मऊ
ओपन पोअर्स येऊ नये म्हणून काय करावे
चेहऱ्यावरील छिद्र बंद करण्यासाठी दही बेसन पॅक लावा. यामुळे त्वचा उजळण्यास मदत होईल. मागील अनेक वर्षांपासून बेसन आणि दह्याचा वापर त्वचेचा रंग उजळ्वण्यासाठी सुद्धा केला जात आहे.वाटीमध्ये 1 चमचा बेसन घेऊन त्यात 1 चमचा दही मिक्स करून चेहऱ्यावर लावा. 10 ते 15 मिनिटं झाल्यानंतर चेहरा स्वच्छ पाण्याने धुवून घ्या. यामुळे त्वचेवरील छिद्र बंद होण्यास मदत होईल.