
आजीबाईच्या बटव्यातील गुणकारी उपाय! पांढरे केस काळे करण्यासाठी मेहेंदीमध्ये मिक्स करा 'हे' पदार्थ
केसांची काळजी घेण्यासाठी महिला सतत काहींना काही करत असतात. हल्ली लहान वयातच अनेकांचे केस पांढरे होतात. केस पांढरे झाल्यानंतर पुन्हा एकदा चमकदार आणि काळेभोर करण्यासाठी मेहेंदी, हेअर कलर, हेअर डाय इत्यादी अनेक गोष्टी लावल्या जातात. केसांना रंग केल्यानंतर किंवा मेहेंदी लावल्यानंतर केस खूप जास्त कोरडे दिसतात. केसांमधील नैसर्गिक चमक कमी होऊन जाते. याशिवाय केसांची खराब झालेली गुणवत्ता सुधारण्यासाठी केमिकलयुक्त हेअर कलर स्ट्रेटनिंग, स्मूदनिंग यांसारख्या वेगवेगळ्या ट्रीटमेंट केल्या जातात. यामुळे केस काही काळापुरते खूप जास्त सुंदर दिसतात. मात्र कालांतराने केसांमधील प्रॉडक्ट कमी झाल्यानंतर कोरडेपणा वाढणे, कोंडा, केस गळणे इत्यादी बऱ्याच समस्या उद्भवू लागतात. केसांची खराब झालेली गुणवत्ता सुधारण्यासाठी अनेक वेगवेगळे उपाय करण्याऐवजी घरगुती उपाय करावेत. (फोटो सौजन्य – istock)
वाढत्या थंडीत रोज अंघोळ करावी का? रिसर्चमध्ये करण्यात आला आश्चर्यकारक खुलासा, कारण वाचून व्हाल आनंदी
पांढऱ्या केसांची समस्या वाढू लागल्यानंतर महिला सतत काहींना काही करत असतात. पण त्याऐवजी आजीबाईच्या बटव्यातील घरगुती उपाय करावेत. बाजारात मिळणाऱ्या हेअर डाय लावण्याऐवजी मेहेंदी लावताना स्वयंपाक घरातील हे पदार्थ मिक्स करून लावावे. या पदार्थांच्या वापरामुळे केस अतिशय मुलायम होतील. नैसर्गिक पदार्थांचा वापर केल्यामुळे केस गळणे, केसांमध्ये वाढलेला कोंडा कमी होण्यास मदत होईल. याशिवाय पांढरे केस काळे होऊन केस सुंदर दिसतील.
मेहेंदी तयार करण्यासाठी जास्वंदीची पावडर, एक चमचा मेथी दाणे, चार कढीपत्त्याची पाने, कोरफड जेल, रोझमेरी आणि बीटरूट पावडर इत्यादी गोष्टी लागतात. मेहेंदी बनवताना सर्वप्रथम, टोपात पाणी गरम करण्यासाठी ठेवा. पाणी गरम झाल्यानंतर त्यात कढीपत्ता, मेथी दाणे आणि रोझमेरी घालून पाण्याला उकळी काढा. तयार केलेले पाणी गाळून घ्या. मिक्सरच्या भांड्यात कोरफड जेल, उकळवून घेतलेलेसर्व पदार्थ घालून बारीक पेस्ट तयार करा. तयार केलेली पेस्ट काळ्या रंगाच्या कढईमध्ये काढून घ्या. त्यानंतर त्यात बीटचा रस किंवा बीटची पावडर घालून व्यवस्थित मिक्स करा. त्यानंतर त्यात मेहेंदी पावडर मिक्स करून ३ तास मिश्रण तसेच ठेवा. यामुळे मेहेंदीला चांगला रंग येईल.
तयार केलेली मेहेंदी केसांच्या मुळांपासून ते टोकापर्यंत सगळीकडे लावून २ ते ३ तास तशीच ठेवून द्या. यामुळे केसांना चांगला रंग येईल आणि केस सुंदर दिसतील. जास्वंदीची पावडर टाकल्यामुळे केस लालसर दिसू लागतील. ३ तास झाल्यानंतर केस पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. यामुळे केसांची नैसर्गिक चमक कायम तशीच राहील आणि केस सुंदर दिसतील. हा उपाय आठवड्यातून एकदा किंवा महिन्यातून दोनदा केल्यास कोणत्याही हेअर डाय किंवा केमिकलयुक्त हेअर कलर लावण्याची आवश्यकता भासणार नाही. नैसर्गिक रंगामुळे केसांना कोणतीही हानी पोहचणार नाही.