Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 29 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

रात्रीच्या जेवणानंतर करा ‘ही’ सोपी गोष्ट! कधीच उद्भवणार नाही बद्धकोष्ठता-अपचनाची समस्या, लागेल सुखाची शांत झोप

रात्रीच्या जेवणानंतर नियमित वज्रासनात ५ मिनिटं बसावे. यामुळे खाल्लेले अन्नपदार्थ सहज पचन होतात आणि आरोग्य सुधारण्यास मदत होते. जाणून घ्या वज्रासन करण्याचे फायदे.

  • By सुरुची कदम
Updated On: Dec 29, 2025 | 05:30 AM
रात्रीच्या जेवणानंतर करा 'ही' सोपी गोष्ट! कधीच उद्भवणार नाही बद्धकोष्ठता-अपचनाची समस्या

रात्रीच्या जेवणानंतर करा 'ही' सोपी गोष्ट! कधीच उद्भवणार नाही बद्धकोष्ठता-अपचनाची समस्या

Follow Us
Follow Us:

वज्रासन करण्याचे फायदे?
रात्रीच्या जेवणानंतर ऍसिडिटी का वाढते?
शांत आणि गाढ झोपेसाठी काय करावे?

धावपळीच्या जीवनशैलीमुळे संपूर्ण शरीराला हानी पोहचण्याची शक्यता असते. कामाचा तणाव, पोषक घटकांचा अभाव, अपुरी झोप, बिघडलेली पचनक्रिया, वारंवार जंक फूडचे सेवन इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम शरीरावर होतात. रात्रीच्या जेवणात अतितिखट आणि तेलकट पदार्थांचे अतिसेवन केल्यामुळे पचनक्रिया बिघडून जाते. खाल्लेले अन्नपदार्थ सहज पचन न झाल्यामुळे ऍसिडिटी, गॅस आणि बद्धकोष्ठता वाढून उलट्या आणि मळमळ होते. ऍसिडिटी वाढल्यानंतर डोकेदुखीचा सुद्धा त्रास होतो. रात्रीच्या वेळी शरीराची पचनक्रिया मंदावते, त्यामुळे तिखट आणि तेलकट पदार्थ लवकर पचन होत नाहीत. वारंवार उद्भवणाऱ्या पोटाच्या समस्यांकडे दुर्लक्ष करणे शरीरासाठी धोक्याचे ठरू शकते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला ऍसिडिटी आणि अपचनाच्या समस्येपासून कायमची सुटका मिळवण्यासाठी रात्री जेवणानंतर ५ मिनिटं वज्रासनात बसल्यास शरीराला नेमके काय फायदे होतात, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. (फोटो सौजन्य – istock)

थंडीच्या कडाक्यात सुकामेव्याला ऊबदार’ मागणी! दर स्थिर असल्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांना मिळतोय दिलासा

पचनक्रियेला चालना मिळते:

रात्रीच्या जेवणानंतर शरीराची पचनक्रिया मंदावते. त्यामुळे खाल्लेले अन्नपदार्थ पचन होण्यासाठी जास्तीचा वेळ लागतो. पोटात अन्नपदार्थ बराच वेळ तसेच राहिल्यामुळे पोटात जडपणा जाणवणे, उलट्या, ऍसिडिटी इत्यादी समस्या वाढतात. त्यामुळे जेवल्यानंतर ५ ते १० मिनिटं नियमित वज्रासनात बसावे. असे केल्यामुळे शरीराच्या मध्यभागातील रक्तभिसरण वाढते. तसेच रक्ताचा प्रवाह पचनसंस्थेकडे वळवल्यामुळे अन्नपदार्थ पचन होतात. तसेच वज्रासनात बसल्यामुळे जेवल्यानंतर येणारी सुस्ती कमी होते आणि शरीर आतून सक्रिय राहते.

आम्लपित्त आणि जळजळ रोखण्यासाठी गुणकारी:

बऱ्याचदा जेवल्यानंतर छातीत जळजळ किंवा वारंवार आंबट ढेकर येतात. या समस्येपासून आराम मिळवण्यासाठी वज्रासनात बसावे. यामुळे पोटातील आम्ल वरच्या दिशेने अन्ननलिकेत येण्यापासून रोखले जाते आणि पोटाची स्थिती कायमच निरोगी राहते. वज्रासनात बसल्यामुळे जुनाट पित्ताच्या त्रासापासून कायमची सुटका मिळते आणि शरीरातील अवयवांची स्थिती सुधारते.

छातीत साचून राहिलेल्या कोरड्या कफापासून मिळेल कायमची सुटका! ‘या’ औषधी काडीचे सेवन केल्यास शरीर होईल स्वच्छ

मानसिक शांतता आणि गाढ झोप:

शरीरात वाढलेल्या मानसिक तणावाचा परिणाम संपूर्ण आरोग्यावर लगेच दिसून येतो. त्यामुळे आरोग्याची योग्य काळजी घेणे आवश्यक आहे. मन शांत राहिल्यास शारीरिक स्थितीसुद्धा कायमच हेल्दी राहते. जेवणानंतर तसेच सकाळी उठल्यानंतर नियमित वज्रासन केल्यास शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारेल आणि पोट हलके राहील. निद्रानाशाच्या समस्येपासून कायमचा आराम मिळवण्यासाठी वज्रासन करावे.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

💡

Frequently Asked Questions

  • Que: ऍसिडिटी म्हणजे काय?

    Ans: पोटात तयार होणारे ऍसिड अन्ननलिकेत परत येणे, ज्यामुळे जळजळ होते.

  • Que: ऍसिडिटीची लक्षणे?

    Ans: छातीत आणि घशात जळजळ, पोटात मळमळ, पोटदुखी, गोळा येणे.

  • Que: बद्धकोष्ठता म्हणजे काय?

    Ans: पोट साफ न झाल्यासारखे वाटते, शौचास त्रास होतो आणि अस्वस्थता येते.

Web Title: Do this simple thing after dinner you will never experience constipation or indigestion problems

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 29, 2025 | 05:30 AM

Topics:  

  • acidity
  • home remedies
  • yogasana

संबंधित बातम्या

Skin Care: तरुण वयात चेहऱ्यावरील त्वचा सैल झाली आहे? मग स्वयंपाक घरात उपलब्ध असलेल्या ‘या’ पदार्थांचा वापर करून बनवा फेसपॅक
1

Skin Care: तरुण वयात चेहऱ्यावरील त्वचा सैल झाली आहे? मग स्वयंपाक घरात उपलब्ध असलेल्या ‘या’ पदार्थांचा वापर करून बनवा फेसपॅक

Lip Care: ओठांची काळजी घेण्यासाठी महागडे प्रॉडक्ट वापरत असाल तर थांबा! ‘या’ पदार्थांचा वापर करून बनवा नॅचरल लीपबाम
2

Lip Care: ओठांची काळजी घेण्यासाठी महागडे प्रॉडक्ट वापरत असाल तर थांबा! ‘या’ पदार्थांचा वापर करून बनवा नॅचरल लीपबाम

Hair Care: पांढऱ्या केसांसाठी कायमच केमिकल हेअर डायचा वापर करता? केसांना लावा ‘या’ हिरव्या पानांचा रस, केस होतील काळेभोर
3

Hair Care: पांढऱ्या केसांसाठी कायमच केमिकल हेअर डायचा वापर करता? केसांना लावा ‘या’ हिरव्या पानांचा रस, केस होतील काळेभोर

Vegetables For Acidity: जेवणात बदल झाल्यानंतर लगेच ॲसिडीटी होते? मग रोजच्या आहारात करा ‘या’ भाज्यांचा समावेश
4

Vegetables For Acidity: जेवणात बदल झाल्यानंतर लगेच ॲसिडीटी होते? मग रोजच्या आहारात करा ‘या’ भाज्यांचा समावेश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.