उन्हाळ्यात अशी घ्या त्वचेची काळजी
उन्हाळा वाढल्यानंतर आरोग्यासह त्वचेदेखील पूर्णपणे खराब होऊन जाते. जास्तीचा घाम आल्यामुळे चेहरा आणि शरीर स्वच्छ ठेवणे आवश्यक आहे. उन्हाळ्यात बाहेर फिरुन आल्यानंतर किंवा इतर वेळी घरी आल्यानंतर त्वचा अधिक तेलकट आणि चिकट होऊन जाते. तेलकट झालेली त्वचा योग्य वेळी स्वच्छ न केल्यामुळे चेहऱ्यावर पिंपल्स, मुरूम, फोड किंवा रॅश येण्याची शक्यता असते. या समस्या उद्भवू लागल्यानंतर त्वचेचे तारुण्य कमी होऊन जाते. त्वचा अधिक निस्तेज आणि कोरडी दिसू लागते. त्वचेची गुणवत्ता खराब झाल्यानंतर ती सुधारण्यासाठी अनेक प्रयत्न करावे लागतात.(फोटो सौजन्य – iStock)
उन्हाळ्यात चंदन पावडर त्वचेवर आणेल चमकदार ग्लो! ‘या’ पद्धतीने करा पावडरचा वापर, तेलकटपणा होईल दूर
उन्हाळ्यामध्ये त्वचेसंबंधित समस्या उद्भवू लागल्यानंतर त्वचा खराब होऊन जाते. उन्हात थोडंसं जरी बाहेर फिरून आल्यानंतर चेहऱ्यावर लाल रॅश किंवा लालसरपणा जाणवू लागतो. ॲलर्जी किंवा सनबर्न झाल्यामुळे चेहरा लाल दिसू लागतो. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला उन्हाळ्यात लाल झालेली त्वचा पुन्हा सुधारण्यासाठी कोणते घरगुती उपाय करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. हे उपाय केल्यामुळे त्वचेची खराब झालेली गुणवत्ता सुधारण्यास मदत होईल.
उन्हाळ्यात शरीरामध्ये उष्णता वाढते. ज्यामुळे चेहऱ्यावर पिंपल्स किंवा मुरूम येण्याची शक्यता असते. अशावेळी त्वचा थंड ठेवण्यासाठी गुलाब पाणी किंवा टोनरचा वापर करावा. गुलाब पाणी त्वचेमधील ओलावा कायम टिकवून ठेवते. गुलाब पाण्यात असलेले घटक त्वचेची गुणवत्ता कायम टिकून ठेवतात. त्यामुळे उन्हातून बाहेर जाऊन आल्यानंतर चेहरा स्वच्छ करून नंतर वरून गुलाब पाणी लावावे. यामुळे त्वचेवरील लालसरपणा कमी होईल आणि चेहरा उजळदार दिसेल.
मागील अनेक वर्षांपासून त्वचेची गुणवत्ता सुधारण्यासाठी कोरफड जेलचा वापर केला जात आहे. कोरफड जेल त्वचा हायड्रेट आणि चमकदार ठेवण्यासाठी मदत करते. त्यामुळे त्वचा थंड ठेवण्यासाठी नियमित कोरफड जेलचा वापर करावा. त्वचा स्वच्छ करून नंतर चेहऱ्यावर कोरफड जेल लावून हलक्या हाताने मसाज करून घ्या. मसाज केल्यामुळे त्वचेवरील डेड स्किन निघून जाईल आणि त्वचा स्वच्छ होईल. कोरफड जेल लावून काहीवेळ ठेवल्यानंतर चेहरा पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. यामुळे त्वचेमधील उष्णता कमी होईल थंड राहील.
कमी वयात त्वचा सैल झाली आहे? मग त्वचा घट्ट होण्यासाठी करा ‘हे’ प्रभावी उपाय, चेहरा राहील कायम तरुण
कडक उन्हामुळे त्वचा लाल आणि कोरडी पडून जाते. याशिवाय चेहऱ्यावरील टॅनिंग देखील वाढते. त्वचा काळवंडल्यानंतर ती सुधारण्यासाठी अनेक प्रयत्न करावे लागतात. त्यामुळे त्वचेची खराब झालेली गुणवत्ता सुधारण्यासाठी बर्फच वापर करावा. नियमित किंवा आठवड्यातून दोनदा बर्फ त्वचेवर फिरवावा. यामुळे चेहऱ्यावर होणारी जळजळ आणि खाज कमी होईल.