
पोट सारखं जड होतंय? पोटात साठलेली सर्व गॅस लगेच पडेल बाहेर, आयुर्वेदिक डॉक्टरांनी सांगितल्या 3 पद्धती; वापरताच मिळेल आराम
गर्भाशयातच बाळ होईल बुद्धिमान… डॉक्तरांनी सांगितले ताकद आणि पोषकतत्वांनी भरलेले 4 सुपरफूड
आयुर्वेदिक डॉक्टर सलीम झैदी यांच्या मते, पोटातील गॅस काढून टाकण्यासाठी आणि पोटफुगी कमी करण्यासाठी अनेक प्रभावी घरगुती उपाय आहेत. यासाठी फार काही न करता… तुम्हाला फक्त काही पदार्थांचे सेवन करायचे आहे. यात दही, आले आणि पुदिना या पदार्थांचा समावेश होतो. या घरगुती पदार्थांमध्ये अनेक आयुर्वेदिक घटक उपलब्ध आहेत जे नैसर्गिकरित्या गॅसपासून सुटका मिळवण्यासाठी मदत करतात.
आले
अनेक आजारांना दूर करण्यासाठी आल्याचे सेवन फायदेशीर ठरते. आले हे पचनसंस्थेसाठीही खूप फायद्याचे मानले जाते. पचनास मदत करणारे घटक यात आढळून येतात ज्यामुळे पोटफुगी कमी करण्यास मदत मिळते. यासाठी एक कप पाण्यात आल्याचे काही तुकडे किंवा किसलेले आले घाला. पाण्याला ५-१० मिनिटे चांगल उकळवून घ्या. तयार पाणी गाळा आणि थोड थंड करुन आरामात याचे सेवन करा. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही यात मध आणि लिंबाचा रस देखील टाकू शकता.
पुदीना
पुदीनीचा तोजेपणा पोट हलके बनवण्यास मदत करतो. याचे सेवन पोटाच्या स्नायूंना आराम देतो आणि गॅस बाहेर काढून टाकण्यास मदत करते. यासाठी पुदिन्याची पाने गरम पाण्यात भिजवा आणि थोडा वेळ असेच त्यांना भिजून राहूदेत. मग काहीवेळाने हे पाणी गाळून एका ग्लासमध्ये ओता आणि लगेच याचे सेवन करा. पुदिन्याच्या पानांचा रस काढून पाण्यासोबत घ्या.
‘या’ आजारांनी त्रस्त असलेल्या महिलांनी चुकूनही करू नका जिऱ्याचे सेवन, शरीरासाठी ठरेल विषासमान
दही
दही पचनसंस्थेला प्रोत्साहन देण्यास मदत करते. यातील प्रोबायोटिक्स शरीराला थंड ठेवतात आणि पोटातली गॅस कमी करण्यास मदतनीस ठरतात. तुम्ही जेवणानंतर एक वाटी दह्याचे सेवन करु शकता. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही साध्या दह्याचे सेवन करु शकता किंवा मग यात मीठ, जीरे पावडर आणि काळे मीठ टाकून याची ताक तयार करुनही याचे सेवन केले जाऊ शकते.
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.