निरोगी राहण्यासाठी घरगुती उपाय
पूर्वीच्या काळातील लोक 100 वर्षांपेक्षा अधिक काळ जीवन जगत होती. निरोगी जीवनशैली, सात्विक अन्नपदार्थ, व्यायाम करणे इत्यादी गोष्टींमुळे पूर्वीच्या काळातील लोक 100 वर्षांपेक्षा अधिक काळ जगत होती. पण हल्लीच्या बदललेल्या जीवनशैलीमुळे 60 वर्ष जीवन जगणे सुद्धा कठीण झाले आहे. सतत वातावरणात सतत होणारे बदल, खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी इत्यादी गोष्टींचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. यामुळे सांधेदुखी, मधुमेह, हृदयविकार, कॅन्सर यांसारखे गंभीर आजार होण्याची शक्यता असते. कमी वयात म्हतारपण येऊ लागल्यामुळे सगळीकडे चिंता व्यक्त केली जात आहे. पण या समस्या उद्भवू नये, म्हणून आपण पूर्वीच्या लोकांच्या काही सवयी फॉलो करू शकतो. ज्या आरोग्यासाठी सुद्धा फायदेशीर ठरतील. आज आम्ही तुम्हाला 100 वर्षाहून अधिक काळ जीवन जगण्यासाठी किचनमधील कोणत्या पदार्थाचे सेवन करावे, याबद्दल सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य-istock)
हे देखील वाचा: तुळशी आणि रुद्राक्षाची जपमाळ एकत्र घालण्याचे फायदे जाणून घ्या
स्वयंपाक घरात बडीशेप हा मसाल्यातील पदार्थ असतोच. बडीशेप खाल्ल्यामुळे पचनक्रिया सुधारते. तसेच हृदयरोग, लठ्ठपणा, कर्करोग, न्यूरोलॉजिकल रोग आणि टाइप 2 मधुमेहापासून शरीराचा बचाव करण्यासाठी मदत करते. बडीशेपचे पाण्यात अँटी-इंफ्लेमेटरी, अँटी-कॅन्सर, अँटी-मायक्रोबियल, अँटी-व्हायरल गुणधर्म आढळून येतात. ज्याचे सेवन केल्यामुळे तोंडातील दुर्गंधी निघून जाते.
निरोगी राहण्यासाठी घरगुती उपाय
रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित राहण्यासाठी आहारात बडीशेपचे सेवन करावे. बडीशेप खाल्ल्यामुळे शरीराला अनेक फायदे होतात. तसेच मधुमेह असलेल्या लोकांनी रोजच्या आहारात मेथी दाण्यांचे पाणी प्यावे. यामुळे मधुमेह नियंत्रित राहण्यास मदत होते. रक्तातील साखरेचे प्रमाण वाढल्यानंतर मूत्रपिंड, नसा आणि डोळ्यांचे नुकसान होण्यापासून रक्षण होते.
हे देखील वाचा: केसांमधील पोषण कमी झाले आहे? मग आहारात करा ‘या’ पदार्थांचे सेवन