Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 6 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Appendix झाल्यानंतर शरीराच्या ‘या’ अवयवांमध्ये होतात असह्य वेदना, अपेंडिक्स फुटू नये म्हणून करा घरगुती उपाय

अपेंडिक्स झाल्यानंतर पोटात खूप जास्त वेदना होतात. त्यामुळे वेळीच डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ते औषध उपचार करावेत आणि शरीराची काळजी घ्यावी. जाणून घ्या अपेंडिक्स म्हणजे काय आणि त्याची गंभीर लक्षणे.

  • By सुरुची कदम
Updated On: Mar 07, 2026 | 08:42 AM
Appendix झाल्यानंतर शरीराच्या 'या' अवयवांमध्ये होतात असह्य वेदना, अपेंडिक्स फुटू नये म्हणून करा घरगुती उपाय

Appendix झाल्यानंतर शरीराच्या 'या' अवयवांमध्ये होतात असह्य वेदना, अपेंडिक्स फुटू नये म्हणून करा घरगुती उपाय

Follow Us
Follow Us:

अपेंडिक्स म्हणजे काय?
अपेंडिक्स झाल्यानंतर दिसून येणारी लक्षणे?
अपेंडिक्स बरा करण्यासाठी कोणते उपाय करावेत?

दैनंदिन आहारात होणारा बदल, कामाचा वाढलेला तणाव, बैठी जीवनशैली, पोषक घटकांचा अभाव, अपुरी झोप इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. त्यामुळे शरीरात होणाऱ्या बदलांकडे अजिबात दुर्लक्ष न करता वेळीच उपचार करावेत. बऱ्याचदा कोणत्याही कारंणाशिवाय पोटात वेदना वाढतात. या वेदनांकडे कायमच दुर्लक्ष केले जाते. पण याच वेदना अपेंडिक्ससारख्या गंभीर आजारामुळे होण्याची जास्त शक्यता असते. अपेंडिक्स हा शरीरातील निरुपयोगी अवयव आहे, ज्यामुळे आपण जगू शकतो. पण काहीवेळा याच अवयवामध्ये खूप जास्त वेदना होतात.अपेंडिक्स झाल्यानंतर वेळीच लक्ष न दिल्यामुळे पू होऊन अपेंडिक्स फुटण्याची जास्त शक्यता असते. ही स्थिती शरीरासाठी अतिशय गुंतागुंतीची आहे. त्यामुळे अपेंडिक्स झाल्यानंतर वेळीच उपचार करणे आवश्यक आहे. आज आम्ही तुम्हाला अपेंडिक्स म्हणजे काय? अपेंडिक्स झाल्यानंतर शरीरात कोणती लक्षणे दिसून येतात? याबद्दल जाणून घेऊया सविस्तर माहिती.(फोटो सौजन्य – istock)

प्रत्येक मधुमेह रुग्णाने खावीत ही 2 फळे, याचे सेवन कोणत्या औषधाहून कमी नाही… डॉक्टरांनी दिला सल्ला

अपेंडिक्स म्हणजे काय?

अपेंडिक्स हा पोटातील उजव्या बाजूला मोठ्या आतड्याला जोडलेला बोटाच्या आकाराचा एक नाजूक अवयव आहे. मानवी उत्क्रांतीमध्ये अपेंडिक्स या अवयवाचे कार्य कमी झाले असेल तरीसुद्धा शरीराची रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यासाठी आणि चांगल्या बॅक्टेरियांचा साठा वाढवण्यासाठी महत्वपूर्ण काम करते. पण याच अवयवात संसर्ग वाढल्यानंतर संपूर्ण शरीराला हानी पोहचते. जगभरात सुमारे ७% लोकांना त्यांच्या आयुष्यात एकदा तरी अपेंडिक्ससारख्या गंभीर आजाराला सामोरे जावे लागते. योग्य वेळी उपचार न मिळाल्यास अपेंडिक्स फुटण्याची जास्त शक्यता असते.

अपेंडिक्स झाल्यानंतर दिसून येणारी लक्षणे?

  • नाभीच्या भोवती वाढलेल्या वेदना
  • चालताना, खोकताना किंवा पोटाला स्पर्श केल्यास तीव्र वेदना
  • मळमळणे, उलट्या होणे
  • बद्धकोष्ठता
  • ओटीपोटात सूज येणे
  • भूक पूर्णपणे मरणे
  • हलका ताप येणे
  • गॅस सोडताना किंवा मलविसर्जन करताना त्रास होणे
  • लघवी करताना वेदना, गुदाशय, पाठ किंवा पोटाच्या इतर भागात वेदना, ही लक्षणे अपेंडिक्स झाल्यानंतर दिसून येतात.

ॲपेंडिक्स फुटल्यास निर्माण होणारे धोके:

ॲपेंडिक्स फुटल्यानंतर त्यातून पू आणि विष्ठा संपूर्ण पोटाच्या पोकळीमध्ये पसरून जाते. सेप्सिस हा शरीरसंबंधित अतिशय गंभीर आजार आहे. पोटाच्या आतील भागात काहीवेळा सुरक्षित यंत्रणेमुळे एक गाठ तयार होते. या गाठीमध्ये पू किंवा पाणी तयार होते. शस्त्रक्रिया न केल्यास शरीरात असंख्य बदल होतात. रक्ताची चाचणी, लघवीची चाचणी, सिटी स्कॅन, सोनोग्राफी यांसारख्या चाचण्या करून आजाराचे निदान केले जाते.

देशात वाढतोय ब्रेस्ट कॅन्सरचा धोका! 1990 पासून मृत्यूंमध्ये 74% वाढ; तज्ज्ञांची गंभीर चिंता

ॲपेंडिक्सची समस्या वाढल्यानंतर किंवा गंभीर आजारांपासून शरीराचे नुकसान होऊ नये दैनंदिन आहारात फळे, भाज्या आणि कडधान्ये इत्यादी पदार्थांचे सेवन करणे आवश्यक आहे. यामुळे पचनक्रिया सुरळीत चालू राहते. शस्त्रक्रियेनंतर झाल्यानंतर २ ते ३ आठवडे आराम करणे आवश्यक आहे. कोणतीही हालचाल किंवा अतितिखट पदार्थांचे सेवन अजिबात करू नये. जखम झालेल्या भागाची व्यवस्थित स्वच्छता करावी. ॲपेंडिक्स काहीवेळा शरीराच्या नाजूक अवयवांवर तणाव येण्याची जास्त शक्यता असते.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

💡

Frequently Asked Questions

  • Que: अपेंडिक्स म्हणजे काय?

    Ans: हे मोठ्या आतड्याच्या सुरुवातीला जोडलेले, बोटाच्या आकाराचे, लहान, थैलीसारखे अंग आहे.

  • Que: अपेंडिक्सची मुख्य लक्षणे कोणती?

    Ans: नाभीभोवती किंवा पोटाच्या वरच्या भागात वेदना सुरू होणे, खोकताना, चालताना किंवा खोल श्वास घेताना वेदना वाढणे.

  • Que: अपेंडिक्सचा त्रास का होतो?

    Ans: जेव्हा अपेंडिक्सच्या पोकळीत अडथळा निर्माण होतो (उदा. संक्रमण, लिम्फ नोड्सची सूज), तेव्हा त्यात सूज येते, रक्तपुरवठा कमी होतो आणि वेदना वाढते.

Web Title: Unbearable pain occurs in these parts of the body after the appendix do home remedies to prevent the appendix from bursting

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 07, 2026 | 08:42 AM

Topics:  

  • Health Care Tips
  • health issue
  • stomach health

संबंधित बातम्या

health Care Tips: शिड्या चढताना कायमच दमल्यासारखे होते? वेदनांकडे दुर्लक्ष न करता वेळीच करा ‘या’ सवयींमध्ये बदल
1

health Care Tips: शिड्या चढताना कायमच दमल्यासारखे होते? वेदनांकडे दुर्लक्ष न करता वेळीच करा ‘या’ सवयींमध्ये बदल

Skin Care साठी गोकर्णाच्या फुलांचा चहा ठरेल फायदेशीर! चेहऱ्यावर महिनाभरात दिसेल नैसर्गिक चमक
2

Skin Care साठी गोकर्णाच्या फुलांचा चहा ठरेल फायदेशीर! चेहऱ्यावर महिनाभरात दिसेल नैसर्गिक चमक

Kidney Stone: मुतखडा पुन्हा होण्याची कारणे? जीवनशैलीत केलेल्या ‘या’ चुका शरीरासाठी ठरतात महाभयंकर, वेळीच करा बदल
3

Kidney Stone: मुतखडा पुन्हा होण्याची कारणे? जीवनशैलीत केलेल्या ‘या’ चुका शरीरासाठी ठरतात महाभयंकर, वेळीच करा बदल

Inflammation: दीर्घकाळ टिकणाऱ्या सुजेमुळे हैराण झाला आहात? मग आहारात करा ‘या’ सुपरफूड्सचा समावेश
4

Inflammation: दीर्घकाळ टिकणाऱ्या सुजेमुळे हैराण झाला आहात? मग आहारात करा ‘या’ सुपरफूड्सचा समावेश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.