केसांच्या वाढीसाठी 'हे' पदार्थ खावेत
वातावरणातील बदल, खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी, शरीरातील व्यायामाचा अभाव, हेअर केअर न करणे इत्यादी गोष्टींचा परिणाम लगेच केसांवर दिसून येतो. केसांचे आरोग्य बिघडल्यानंतर संपूर्ण लुकसुद्धा खराब होऊन जातो. अनेकदा पावसाच्या पाण्यात भिजल्यामुळे किंवा इतर कोणत्या कारणांमुळे केसांमध्ये मोठ्या प्रमाणावर कोंडा होतो. केसांमध्ये कोंडा झाल्यानंतर केस गळणे, केस तेलकट आणि चिकट होणे इत्यादी अनेक समस्या जाणवतात. या सर्व समस्या जाणवू लागल्यानंतर अनेक महिला केमिकल ट्रीटमेंट करण्यास प्राधान्य देतात. पण असे करण्याऐवजी आहारात बदल करून केसांची काळजी घ्यावी. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला केसांच्या वाढीसाठी आहारात कोणत्या पदार्थांचे सेवन करावे, याबद्दल सांगणार आहोत. या पदार्थांचे सेवन केल्यामुळे केस गळणे,केसांमधील कोंड्यापासून सुटका होईल.(फोटो सौजन्य-istock)
आरोग्यासाठी अॅव्होकॅडोज हे फळ अतिशय आरोग्यदायी आहे. यामध्ये असलेले विटामिन ई केसांच्या वाढीसाठी प्रभावी असल्यामुळे अनेक लोक या अॅव्होकॅडोजचे सेवन दैनंदिन आहारात करतात. अॅव्होकॅडोजमध्ये हेल्दी फॅट्स भरपूर प्रमाणात आढळून येतात. केसांच्या वाढीसाठी आहारामध्ये अॅव्होकॅडोजचे सेवन करावे. यामध्ये असलेले हेल्दी फॅट्स केसांच्या वाढीसाठी आणि केसांच्या मदतीसाठी फायदेशीर आहेत.
हे देखील वाचा: घरगुती उपाय करून गुडघे दुखीपासून मिळवा सुटका, ७० व्या वर्षीसुद्धा हाडं राहतील मजबूत
अंड्यामध्ये विटामिन बी, बायोटिन आणि प्रथिने मुबलक प्रमाणात आढळून येतात. कमी झालेले वजन वाढवण्यासाठी रोजच्या आहारात अंड्याचे सेवन करावे. यामध्ये आढळून येणारे बायोटिन आणि प्रथिने केसांच्या वाढीसाठी गुणकारी ठरते. तसेच अंड्याचा वापर करून तुम्ही घरी हेअर मास्क बनवू शकता. यामुळे तुमचे केस मजबूत आणि मऊ होतील.
हे देखील वाचा: सकाळी उठल्यावर सगळ्यात आधी काय खावे?
बाजारामध्ये अनेक प्रकारच्या पालेभाज्या मिळतात. या भाज्या खाल्ल्यामुळे शरीराला पोषण मिळते. शरीरामध्ये निर्माण झालेली पोषक तत्वांची कमतरता भरून काढण्यासाठी आहारात पालेभाज्यांचा समावेश करावा. पालक, मेथी, मुळा, चवळी इत्यादी अनेक पालेभाज्या मिळतात. या भाज्यांचे सेवन केल्यामुळे शरीरातील लोहाची कमतरता भरून निघते.