आहात त्याहून 20 वर्षाने लहान दिसाल, फक्त या दोन गोष्टींचा वापर करून घरगुती फेसपॅक तयार करा
सुंदरता कोणाला आवडत नाही मात्र वाढत्या वयाबरोबरच आपली सुंदरता हळूहळू ढासळू लागते. चेहऱ्यावर सुरकुत्या येणे, त्वचा ढिली पडणे ही आहेत म्हातारी होण्याची लक्षणे. पण अनेकदा तरुण वयातच ही लक्षणे चेहऱ्यावर दिसून येतात. बऱ्याचदा यामुळे डिप्रेशनदेखील येऊ शकते. कारण तरुण पणात म्हातार होणं कोणाला आवडेल. अशावेळी अनेकजण विविध उपाय शोधू लागतात.
अधिकतर लोक या चेहऱ्याच्या समस्या दूर करण्यासाठी बाजारातील रासायनिक प्रोडक्टसचा वापर करत असतात. मात्र हे प्रोडक्टस आपल्या चेहऱ्यासाठी घातकदेखील ठरू शकतात कारण यात बऱ्याचदा केमिकलयुक्त पदार्थांचा वापर केला जातो जो चेहऱ्याला हानी पोहचवू शकतो. आम्ही तुम्हाला सांगतो की, यासाठी तुम्ही घरीच फक्त दोन पदार्थांचा वापर करून एक फेसपॅक तयार करू शकता. या फेसपॅकच्या वापराने तुमच्या चेहऱ्याच्या समस्या निश्चितच कमी होतील अंजी यासाठी तुम्हाला पैसेही घालवावे लागणार नाही.
हेदेखील वाचा – चेहऱ्यासाठी लाभदायक ठरते CC Cream, अशाप्रकारे घरीच तयार करा
या फेसपॅकसाठी आपण गाजर आणि नारळाचे तेल या दोन पदार्थांचा वापर करणार आहोत. यासाठी प्रथम गाजर धुवून, किसून घ्या. हा गाजराचा किस एका बाउलमध्ये काढून घ्या. आता एका कढईमध्ये खोबरेल तेल गरम करा. मग यात किसलेले गाजर टाका आणि मंद आचेवर हे 5 मिनिटे शिजू द्या. यानंतर गॅस बंद करा आणि थंड झाले की मिश्रण चेहऱ्याला लावा.
हेदेखील वाचा – 100 वर्ष जगण्यासाठी जपानी लोक आहारात करतात या पेयाचा समावेश, म्हतारपणातही राहतात फिट
या तयार मिश्रणाला तुमच्या मानेवर आणि चेहऱ्यावर हलक्या हाताने लावा आणि दहा ते पंधरा मिनिटे असेच राहू द्या. प्रक्रियेमुळे त्वचेला फ्रेशनेस मिळेल, आणि गाजर व खोबरेल तेलातील पोषण तत्वे त्वचेमध्ये शोषली जातील. आपल्या त्वचेला दीर्घकाळ तरुण ठेवण्यासाठी हा फेसपॅक फायद्याचा ठरतो. या फेसपॅकचा नियमित वापर केल्याने निश्चितच तुम्हाला चेहऱ्यावर फरक जाणवू लागेल.
टीप – आम्ही देत असलेली माहिती ही तज्ज्ञांशी बोलून आणि रिसर्च करून देत आहोत. हा लेख केवळ तुमच्या माहितीसाठी लिहिण्यात आला आहे. प्रत्येकाची त्वचा वेगळी असते, त्यामुळे कोणत्याही प्रकारचा उपाय करण्यापूर्वी पॅच टेस्ट करायला विसरू नका.