जपान फक्त आपल्या तंत्राद्यानासाठीच नाही तर आपल्या निरोगी लाइफस्टाइलसाठीही जगभरात ओळखला जातो. जपानी लोक संपूर्ण जगात आपल्या दीर्घायुष्यासाठी आणि परफेक्ट जीवनशैलीसाठी प्रसिद्ध आहेत. त्यांच्या दिनचर्येमध्ये काही खास सवयी आहेत ज्या त्यांच्या शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्याची काळजी घेतात. या सवयी त्यांना दीर्घकाळ जगण्यास आणि सुंदर दिसण्यास मदत करत असतात.
जपानी लोकांच्या या सवयीमुळे आणि हेल्दी लाइफस्टाइलमुळे ते तणाव, थकवा, आणि आजारपणाच्या समस्यांपासून दूर राहतात. यासोबतच जपानी लोक आपल्या रोजच्या दिनचर्येत एका विशिष्ट पेयाचा समावेश करतात. हे पेय त्यांना म्हतारपणातही फिट राहण्यास आणि दीर्घकाळ जगण्यास मदत करतात. आज आम्ही तुम्हाला या जादुई पेयाबाबत सविस्तर माहिती सांगणार आहोत. तुम्हीही तुमच्या आहारात या पेयाचा समावेश करू शकता.
हेदेखील वाचा – Navratri Skincare: उपवासाच्या दिवशीही चेहरा राहील टवटवीत फक्त या घरगुती टोनरचा वापर करा
खरंतर हे जादुई पेय म्हणजे जपानी लोकांचा चहा आहे. याला ‘माचा टी’ असे म्हटले जाते. हा चहा भारतात बनवतात त्या चहापेक्षा फार वेगळा असतो. यामध्ये ग्रीन टी प्रमाणेच अनेक पोषक घटक असतात पण त्यांचं प्रमाण फार जास्त असत. हे चहा शरीराला अनेक फायदे मिळवून देतं. या चहाचे नियमित सेवन केल्याने मनाला शांती मिळते, शरीरात ऊर्जा राहते आणि आयुष्याची वर्षेही वाढली जातात.
एका शोधात असे दिसून आले आहे की, माचा टी’चे सेवन केल्याने तणाव कमी होतो. हा चहा 90%कॅमेलिया सिनेन्सिस झाडांच्या नव्या पानांपासून बनवला जातो, ज्यामुळे यात मोठ्या प्रमाणात अँटिऑक्सिडंट्स असतात. हे अँटीऑक्सिडंट्स शरीरातील फ्री रॅडिकल्सशी लढा देतात, ज्यामुळे शरीराचे नुकसान कमी होते. हा चहा शरीरातील विषारी घटकांशी लढण्यास मदत करतो आणि आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवतो.
हेदेखील वाचा – चेहरा आणि नाकावरील ब्लॅकहेड्स काढून छिद्र मोकळी करण्यासाठी लिंबू करेल तुमची मदत, अशाप्रकारे करा वापर