
चहा आणि कॉफीच्या व्यसनामुळे काय होऊ शकते
हिवाळ्यातील सकाळ असो किंवा संध्याकाळ अनेकदा गरम चहा किंवा कॉफीशिवाय ते अपूर्ण वाटतात आणि ज्यांना सतत चहा वा कॉफी लागते त्यांना हिवाळ्याचीही गरज नाही. हातात गरम पेयाचा कप घेऊन मित्र आणि कुटुंबियांशी गप्पा मारणे हा आपल्या परंपरेचा भाग आहे. पण, हाच चहा किंवा कॉफी तुमच्या आरोग्यासाठी एवढा मोठा धोका ठरू शकतो, असा विचार कोणी केला असेल? होय, तुम्ही ते बरोबर वाचले! अलीकडील संशोधनात असे दिसून आले आहे की खूप गरम चहा किंवा कॉफी प्यायल्याने कर्करोगासारख्या गंभीर आजाराचा धोका वाढू शकतो.
डॉ. शिल्पी अग्रवाल, हेड अँड नेक ऑन्कोसर्जन, मुंबईस्थित एचसीजी कॅन्सर सेंटर यांनी एका मुलाखतीत HT लाइफस्टाइलला सांगितले की, चहा आणि कॉफी यासारख्या गरम पेय आणि Oral Cancer आणि Esophageal Cancer यांच्यातील चिंताजनक दुवा अलीकडच्या अभ्यासातून समोर आला आहे. जेव्हा आपण आपल्या हातात चहा किंवा कॉफीचा कप हातात धरतो अथवा तुम्हाला चहा वा कॉफीची जेव्हा सतत तलप येत असते तेव्हा आपण विचार केला पाहिजे की त्याचे तापमान आपल्या आरोग्यावर काय परिणाम करू शकते, जाणून घ्या अधिक माहिती (फोटो सौजन्य – iStock)
गरम पेय आणि कॅन्सरचा संबंध
गरम पेय पिण्याचा आणि कर्करोगाचा नेमका संबंध काय आहे
डॉ. शिल्पीने सांगितले की, गरम पेये विशेषतः आपल्या पचनसंस्थेवर गंभीर परिणाम करतात. गरम पेयांचे उच्च तापमान आपल्या वरच्या पचनसंस्थेतील पेशींचे विभाजन आणि दुरुस्तीची प्रक्रिया रोखू शकते. यामुळे एसोफॅगिटिस ज्याचा अर्थ घशात जळजळ वा सूज येणे आणि डिसप्लेसिया अर्थात पेशींमध्ये असामान्य बदल होणे यासारख्या परिस्थिती उद्भवतात, जे कर्करोगाचे प्रारंभिक लक्षण असू शकतात.
‘ही’ लक्षणंच असू शकतात कॅन्सर; दुर्लक्ष करू नका, वाचा तज्ञांचं मत
घशाच्या कर्करोगाचा धोका
घशाच्या कर्करोगाचा त्रास उद्भवू शकतो
डॉक्टरांच्या म्हणण्याप्रमाणे सतत गरम पेये सेवन केल्याने अन्ननलिका कर्करोगाचा धोका वाढू शकतो. गरम पेयांचे उच्च तापमान घशाच्या कर्करोगास कारणीभूत ठरते, विशेषत: धुम्रपान, अल्कोहोल आणि खराब आहार यासारख्या इतर जोखीम घटकांसह. तथापि, जर आपण आपल्या पेयांचे तापमान नियंत्रित केले तर हे धोके कमी होऊ शकतात असेही त्यांनी यावेळी नमूद केले आहे
चहाच्या गाळण्यामुळे होऊ शकतो कॅन्सर? वैज्ञानिकांनी दिला इशारा, एक चूक पडेल महागात; गमवाल जीव
काय काळजी घ्यावी
कोणती काळजी घेणे गरजेचे आहे
हिवाळ्यात गरम पेयांचा आनंद घेण्यासाठी काहीच रोकटोक नाही अथवा त्याने काही नुकसान होत नाही, परंतु त्यांचे तापमान इतके गरम नसावे की ते आपल्या पचनसंस्थेला हानी पोहोचवेल. त्यामुळे ते इतके गरम नसेल याची खात्री करून मगच त्याचे सेवन करावे. डॉक्टरांचा असा विश्वास आहे की योग्य तापमानात पेये सेवन केल्याने चव तर वाढतेच शिवाय तुमचे आरोग्यही सुरक्षित राहते.
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.