
लहान मुलांची योग्य काळजी घ्या... ! ४२ महिन्यांत 'निमोनिया'चे ३२ बळी
महेश सायखेडे । वर्धा : विकासाच्या नावावर होणाऱ्या वृक्षतोडीचा परिणाम वातावरणावर होत आहे. जिल्ह्यातील वातावरणावर वृक्षतोडीमुळे मोठा परिणाम झाल्याचेही चित्र बधावयास मिळते. याच बदलत्या वातावरणात निमोनिया हा आजार प्रामुख्याने ते ५ वर्ष वयोगटातील चिमुकल्यांना आपल्या कवेत घेत भेट मृत्यूच्या दाढेत नेऊ पाहतो. त्यामुळे थंडीच्या दिवसांत घरातील चिमुकल्यांच्या आरोग्याची योग्य निगा घरातीलच मोठ्या व्यक्तींनी घेणे गरजेचे आहे. मागील ४२ महिन्यांत निमोनिया या आजारामुळे जिल्ह्यात तब्बल ३२ चिमुकल्यांचा मृत्यू झाला आहे.
निमोनिया हा आजार सामान्य असल्याचे सांगितले जात असले तरी बहुदा गुंतागुंत होत रुग्ण गंभीरही होतो. इतकेच नव्हे तर रुग्णाचा मृत्यूही निमोनियामुळे होतो. अशा परिस्थितीत घरातील मोठ्या व्यक्तींनी अतिजोखमेत येणा-या घरातील ते ५ वर्ष वयोगटातील मुला-मुलींच्या आरोग्याची योग्य निगा घेत काही सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे. बालकास खोकला येत आहे. किंवा श्वास घेण्यास त्रास होत आहे. बालकास १४ दिवसांपेक्षा अधिक काळ पासून खोकला असल्यास कुटुंबियांनी घरगुती उपाय न करता नजीकच्या रुग्णालयात जात बालरोग तज्ज्ञाच्या सल्ल्याने बालकावर उपचार करावे.
शिवाय थंडीच्या दिवसांत चिमुकल्यांना जास्तीत जास्त गरम ठेवण्यासाठी उबदार कपडे परिधान करून द्यावे. एप्रिल २०२२ ते सप्टेंबर २०२५ या ४२ महिन्यांच्या काळात जिल्ह्यात ते ५ वर्ष वयोगटातील ५६० बालकांचा मृत्यू झाला. त्यापैकी तब्बल ३२ चिमुकल्यांचा मृत्यू एकट्या निमोनियामुळे झाल्याचे सुक्ष्म निरीक्षण आरोग्य विभागाच्या अधिका-यांचे असून तशी नोंदही आरोग्य विभागाने घेतली आहे. काय आहे निमोनिया; निमोनिया हा फुफ्फुसांमध्ये होणारा संसर्ग आहे. जो बॅक्टेरिया, विषाणू किंवा बुरशीमुळे होतो. निमोनियामुळे तुमच्या फुफ्फुसांच्या ऊतींना सूज येते. त्यामुळे तुमच्या फुफ्फुसांमध्ये द्रव किंवा पू येऊ शकतो. बॅक्टेरियल निमोनिया हा सहसा विषाणूजन्य निमोनियापेक्षा जास्त गंभीर असतो. रुग्ण वेळीच उपचाराखाली आल्यास निमोनिया मृत्यू टाळता येतो.
उच्च ताप, कोरडा खोकला किंवा पिवळ्या व हिरव्या किंवा रक्तासारख्या भुंकीचा खोकला, धाप लागणे किंवा श्वास घेण्यास त्रास होणे, श्वास घेताना छातीत दुखणे, खूप जास्त थकवा जाणवणे ही निमोनियाची प्राथमिक लक्षणे असल्याचे सांगण्यात आले.
सन २०२२-२३: ०७
सन २०२३-२४ १२
सन २०२४-२५:०४
सन २०२५-२६ (सप्टेंबरपर्यंत): ०९