Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Sankashti Chaturthi |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

इंडो चायनीज खायला फार आवडत? मग आजच घरी बनवा हॉटेल स्टाईल मंचुरियन ड्राय; लगेच नोट करा रेसिपी

Manchurian Dry Recipe : इंडो चायनीज फूड लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांच्याच आवडीचं आहे, मग तुम्ही ते स्ट्रीटवर खा किंवा हॉटेलमध्ये... यातीलच एक लोकप्रिय प्रकार म्हणजे ड्राय मंचुरियन चिली, चला याची रेसिपी जाणून घेऊया.

  • By नुपूर भगत
Updated On: Sep 16, 2025 | 10:54 AM
इंडो चायनीज खायला फार आवडत? मग आजच घरी बनवा हॉटेल स्टाईल मंचुरियन ड्राय; लगेच नोट करा रेसिपी

इंडो चायनीज खायला फार आवडत? मग आजच घरी बनवा हॉटेल स्टाईल मंचुरियन ड्राय; लगेच नोट करा रेसिपी

Follow Us
Close
Follow Us:

भारतीय जेवणात चायनीज डिशेसना एक खास स्थान मिळालं आहे. त्यातही मंचुरियन हा पदार्थ प्रत्येकाला अत्यंत आवडणारा आहे. रस्त्यावरील चायनीज स्टॉल असो वा नामांकित हॉटेल – तिथे “मंचुरियन” ही डिश हमखास मिळते. कुरकुरीत भाज्यांचे गोळे आणि त्यावर टाकलेले लसूण, आले, सोया सॉस यांचा एक भन्नाट संगम ही डिश खास बनवतो. मंचुरियन ड्राय ही खासकरून स्टार्टर डिश म्हणून खूप लोकप्रिय आहे. याला स्प्रिंग रोल, फ्रायड राईस किंवा नूडल्ससोबत दिलं जातं.

सर्दी खोकल्यापासून आराम मिळवण्यासाठी सकाळच्या नाश्त्यासाठी बनवा टोमॅटो सूप, शरीर राहील उबदार

हॉटेल स्टाईल मंचुरियन घरच्या घरी करण्यासाठी योग्य प्रमाणात भाज्या किसून, मसाले घालून गोळे तयार करणे आणि मग त्यांना तळून सॉससोबत परतणे हे मुख्य टप्पे आहेत. ही रेसिपी एकदा घरी करून पाहिली की तुम्हाला चायनीज हॉटेलला जाण्याची गरजच पडणार नाही. चला तर मग पाहूया, हॉटेल स्टाईल मंचुरियन ड्राय कसा करायचा. चला जाणून घेऊया यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.

साहित्य :

मंचुरियन बॉल्ससाठी –

  • कोबी किसलेला – २ कप
  • गाजर किसलेले – १ कप
  • कांदा बारीक चिरलेला – १
  • हिरवी मिरची बारीक चिरलेली – १
  • आले-लसूण पेस्ट – १ टीस्पून
  • कॉर्नफ्लोअर – २ टेबलस्पून
  • मैदा – २ टेबलस्पून
  • मीठ – चवीनुसार
  • तेल – तळण्यासाठी

सॉससाठी –

  • तेल – २ टेबलस्पून
  • आले-लसूण बारीक चिरलेले – १ टेबलस्पून
  • हिरवी मिरची उभी चिरलेली – २
  • कांदा (क्यूब्समध्ये) – १
  • शिमला मिरची (क्यूब्समध्ये) – १
  • सोया सॉस – १ टेबलस्पून
  • टोमॅटो सॉस – २ टेबलस्पून
  • चिली सॉस – १ टेबलस्पून
  • व्हिनेगर – १ टीस्पून
  • कॉर्नफ्लोअर पेस्ट – १ टीस्पून (पाण्यात मिसळलेली)
  • मीठ – चवीनुसार
  • काळी मिरी पूड – ¼ टीस्पून
  • पातीचा कांदा – सजावटीसाठी

दिवसाची सुरुवात होईल आंनदाने! ५ मिनिटांमध्ये घरीच बनवा परफेक्ट कॅपेचिनो कॉफी, नोट करून घ्या रेसिपी

कृती :

  • यासाठी सर्वप्रथम किसलेला कोबी, गाजर, कांदा, हिरवी मिरची, आले-लसूण पेस्ट, कॉर्नफ्लोअर आणि मैदा एकत्र करून घट्ट मिश्रण तयार करा.
  • त्याचे छोटे-छोटे गोळे करून मध्यम आचेवर गरम तेलात सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्या.
  • आता कढईत २ टेबलस्पून तेल गरम करून त्यात आले-लसूण, हिरवी मिरची टाका आणि छान परतून घ्या.
  • मग त्यात कांदा व शिमला मिरचीचे क्यूब्स टाकून थोडं कुरकुरीत राहील असं परता.
  • सोया सॉस, टोमॅटो सॉस, चिली सॉस आणि व्हिनेगर टाकून व्यवस्थित मिक्स करा.
  • थोडे मीठ, काळी मिरी पूड आणि कॉर्नफ्लोअर पेस्ट घालून सॉस घट्ट होईपर्यंत शिजवा.
  • शेवटी तळलेले मन्चुरियन बॉल्स यात टाकून छान परता आणि पातीच्या कांद्याने सजवा.
  • गरमागरम हॉटेल स्टाईल मन्चुरियन ड्राय स्प्रिंग रोल, फ्रायड राईस किंवा नूडल्ससोबत सर्व्ह करा. स्टार्टर म्हणूनही ही डिश परिपूर्ण लागते.

FAQs (संबंधित प्रश्न)

ड्राय मंचुरियन हेल्दी आहेत का?
नाही, पारंपारिक ड्राय मंचुरियन त्यात कॅलरीज, फॅट, सोडियम आणि रिफाइंड मैद्याचे प्रमाण जास्त असल्याने ते आरोग्यदायी अन्न मानले जात नाही.

मंचुरियन कुरकुरीत होण्यासाठी काय करावं?
मंचुरियन कुरकुरीत होण्यासाठी तांदळाचे पीठ आणि कॉर्नफ्लोरचा वापर करा.

Web Title: Hotel style manchurian chili dry recipe in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 16, 2025 | 10:54 AM

Topics:  

  • gobi manchurian
  • marathi recipe
  • tasty food

संबंधित बातम्या

भूक लागलीये पण जेवण बनवण्याचा कंटाळा आलाय? मग झटपट घरी बनवा हॉटेल स्टाईल ‘जिरा आलू’; काही मिनिटांतच तयार होईल रेसिपी
1

भूक लागलीये पण जेवण बनवण्याचा कंटाळा आलाय? मग झटपट घरी बनवा हॉटेल स्टाईल ‘जिरा आलू’; काही मिनिटांतच तयार होईल रेसिपी

शाकाहारी खाणाऱ्यांसाठी पर्वणी! आता घरीच बनवा हॉटेल स्टाईल ‘व्हेज सीख कबाब’; चवीला मस्त अन् सर्वांच्या आवडीची ठरणारी डिश
2

शाकाहारी खाणाऱ्यांसाठी पर्वणी! आता घरीच बनवा हॉटेल स्टाईल ‘व्हेज सीख कबाब’; चवीला मस्त अन् सर्वांच्या आवडीची ठरणारी डिश

सोप्या पद्धतीमध्ये घरीच बनवा ढाबा स्टाईल मशरूम मसाला; रात्रीच्या जेवणासाठी परफेक्ट पर्याय
3

सोप्या पद्धतीमध्ये घरीच बनवा ढाबा स्टाईल मशरूम मसाला; रात्रीच्या जेवणासाठी परफेक्ट पर्याय

झटपट आणि पौष्टिक अंडा पराठा रेसिपी, प्रोटीनने भरलेला सकाळचा नाश्ता
4

झटपट आणि पौष्टिक अंडा पराठा रेसिपी, प्रोटीनने भरलेला सकाळचा नाश्ता

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.