दिवसाची सुरुवात होईल आंनदाने! ५ मिनिटांमध्ये घरीच बनवा परफेक्ट कॅपेचिनो कॉफी
सकाळी उठल्यानंतर काहींना चहा पिण्याची सवय असते तर काहींना कॉफी पिण्याची सवय असते. चहा कॉफीशिवाय दिवसाची सुरुवात आनंदी होत नाही. ब्लॅक कॉफी, दूध टाकून तयार केलेली कॉफी तर काहींना कॅपेचिनो कॉफी प्यायला खूप जास्त आवडते. त्यातील अनेकांच्या आवडीची कॉफी म्हणजे कॅपेचिनो कॉफी. बऱ्याचदा कॅपेचिनो कॉफी पिण्यासाठी कॅफेमध्ये किंवा हॉटेलमध्ये जावं लागत. पण आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये कॅपेचिनो कॉफी बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हा पदार्थ बनवण्यासाठी अतिशय सोपा आहे. घरी आलेल्या पाहुण्यांना कायमच चहा किंवा साधी कॉफी दिली जाते. पण तुम्ही या सोप्या टिप्स वापरून कॅपेचिनो कॉफी बनवू शकता. या कॉफीचा तुम्ही वेगवेगळे फ्लेवर्ससुद्धा देऊ शकता. चला तर जाणून घेऊया कॅपेचिनो कॉफी बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)






