वायू प्रदू,णामुळे त्वचेवर होणारा परिणाम
गेल्या महिन्यात मान्सून परतण्यासह ऑक्टोबर हीट सुरू झाली, जेथे वातावरणीय बदलामुळे मुंबईतील प्रदूषणामध्ये मोठी वाढ झाली. शहराचा एअर क्वॉलिटी इंडेक्स (एक्यूआय) खूप खालावला आणि शहरातील निवासींना अनेक आरोग्यविषयक आजारांचा सामना करावा लागला. आमच्या निदर्शनास आले की, दररोज जवळपास ४० ते ६० टक्के बाह्यरूग्ण (ओपीडी) वायू प्रदूषणामुळे त्वचेवर झालेल्या परिणामांवरील उपचारासाठी आले होते आणि बहुतांश केसेसमध्ये ऑक्टोबरच्या पहिल्याच आठवड्यात सुरूवातीच्या लक्षणांना सुरूवात झाली होती असे मुलुंड येथील फोर्टिस हॉस्पिटलमधील कन्संल्टंट डर्माटोलॉजिस्ट व कॉस्मेटिक डर्माटोलॉजिस्ट डॉ. स्मृती नस्वा सिंग यांनी सांगितले आहे. त्यांनी या लेखातून अधिक माहिती दिली आहे. (फोटो सौजन्य – iStock)
त्वचेची काळजी
त्वचेची काळजी घेण्याची गरज
त्वचा शरीराच्या पृष्ठभागावरील अवयव आहे आणि वातावरणातील धोकादायक घटकांपासून संरक्षण करते. तसेच, त्वचेमधून उत्सर्जन देखील होते आणि सतत बाहेरील वातावरणाच्या संपर्कात असते. याच कारणामुळे हवामानातील बदल, कीटक, परागकण, डास, एलर्जीन्स, प्रदूषित हवेतील कण, यांचा त्वचेवर परिणाम होतो. हवेतील प्रदूषके ‘एन्डोक्राइन डिरप्टर्स’ म्हणून काम करतात, ज्यामुळे आपल्या सिस्टम्समधील हार्मोनलचा नाश होतो.
सुरूवातीला मुरमं, कोंडा, पुरळ अशी लक्षणे दिसून येतात आणि दीर्घकाळापर्यंत हार्मोनल असंतुलन, वंध्यत्व, पॉलिसायस्टिक ओव्हरी सिंड्रोम (पीसीओएस) व कर्करोग असे आजार होऊ शकतात. तसेच, प्रदूषित हवेमध्ये फ्रेश ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे त्वचेच्या बाह्य भागावर परिणाम होतो. बहुतांश रूग्ण खाली देण्यात आलेल्या त्वचासंबंधित समस्यांबाबत तक्रार करत आहेत आणि या सर्वांसाठी कारणीभूत घटक वायू प्रदूषणामध्ये वाढ असू शकतो.
त्वचेसंबंधित काळजी घेण्यासाठी काय करावे जाणून घ्या करा क्लिक
काय होतो परिणाम
प्रदूषमामुळे चेहऱ्यावर होणारा परिणाम
कशी घ्यावी काळजी
त्वचेची काळजी घेण्यासाठी काय करावे
त्वचेची योग्य काळजी घेणे सर्वात मोठा प्रतिबंध आहे. दररोज खोबरेल तेल, कोरफड जेल, ग्लायसेरिन, पॅराफिन, शिया बटर इत्यादींसह त्वचेला मॉइश्चराइज करा, ते हायपोएलर्जिक व असुगंधी असतात. सौम्य सल्फेट-मुक्त साबण किंवा बॉडीवॉशेसचा वापर करा. फळे, भाज्या, बाजरी, शेंगा, नट्स व बियांनी संपन्न आहाराचे सेवन करा, कारण या घटकांमध्ये अँटीऑक्सिडंट्स असतात आणि आतड्यांना शरीरातील टॉक्झिन्स उत्सर्जित करण्यास मदत करू शकतात.
त्वचेसंबंधित काळजीसाठी कसे असावे रूटीन वाचा
कसा करावा प्रतिबंध
प्रतिबंध करताना काय काळजी घ्यावी, कशी ठेवावी त्वचा
त्वचेला खाज सुटण्यापासून प्रतिबंध करण्यासाठी आसपासच्या परिसराची काळजी घेणे देखील महत्त्वाचे आहे. घरातील धूळ झाडून न काढता ओल्या कपड्याने पुसून काढा. फर्निचर व फर्निशिंग्स ओल्या कपड्याने पुसा आणि तागाचे कपडे दर दोन ते दिवसांनी धुवा. घरामध्ये ताजी कोरफड जेल, स्नेक प्लांट, स्पायडर बांबूची लागवड करा, ते वातावरण स्वच्छ ठेवण्यास मदत करतात. या सूचनांचे पालन केल्यास तुमच्या त्वचेचे प्रदूषणाच्या घातक परिणामांपासून संरक्षण होऊ शकते, पण गंभीर त्वचेसंबंधित आजार असल्यास ते पुरेसे ठरू शकणार नाहीत. वर उल्लेख करण्यात आलेली लक्षणे किंवा त्वचेसंबंधित परिणाम आढळून आल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या.