प्रदूषणापासून त्वचेची काळजी घेण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या टिप्स
दिवाळीमध्ये वातावरणात बदल होतो. फटाक्यांच्या धुरामुळे सगळीकडे वातावरण खराब झाले आहे. वातावरणात झालेल्या बदलामुळे आरोग्यासंबंधित अनेक समस्या उद्भवू लागतात. फटाक्यांच्या धुरामुळे आणि आवाजमुळे प्रदूषणात वाढ झाली आहे. प्रदूषणात वाढ झाल्यानंतर आरोग्यासोबतच त्वचा सुद्धा खराब होऊन जाते. त्वचा आणि केस खराब झाल्यानंतर पुन्हा व्यवस्थित करण्यासाठी त्वचेची काळजी योग्य ती काळजी घ्यावी. फटाक्यांच्या धुरामुळे त्वचा कोरडी पडणे, तेलकट होणे, पिंपल्स येणे, त्वचेवर मुरुम येणे इत्यादी अनेक समस्या उद्भवतात. त्यामुळे सर्वच ऋतूंमध्ये त्वचेच्या आरोग्याची योग्य ती काळजी घ्यावी. त्वचेला सूट होईल अशा प्रॉडक्टचा वापर केल्यास त्वचा सुंदर आणि चमकदार होण्यास मदत होते.(फोटो सौजन्य-istock)
वातावरणात होणाऱ्यऊ बदलांमुळे काहीवेळा त्वचा तेलकट होऊन जाते. तेलकट झालेली त्वचा योग्य वेळी स्वच्छ केली नाहीतर चेहऱ्यावर पिंपल्स आणि मुरुम येऊ लागतात. पिंपल्स आल्यानंतर त्याचे डाग तसेच त्वचेवर राहून जातात. त्यामुळे फेश वॉशचा वापर करून त्वचा स्वच्छ करावी जेणेकरून त्वचेवरील घाण, धूळ निघून जाण्यास मदत होईल. आज आम्ही तुम्हाला धूळ, प्रदूषणापासून त्वचेची काळजी कशी घ्यावी, याबद्दल सोप्या टिप्स सांगणार आहोत. या टिप्सचा नियमित वापर केल्यास त्वचेवरील डाग निघून जाण्यास मदत होईल आणि त्वचा स्वच्छ होईल.
हे देखील वाचा: दिवाळीत फटाक्यांमुळे वातावरण होते प्रदूषित, पुढील काही दिवस द्या ‘या’ गोष्टींकडे लक्ष
सुंदर आणि निरोगी त्वचेसाठी त्वचा हायड्रेट ठेवणे आवश्यक आहे. यासाठी नियमित ७ ते ८ ग्लास पाणी प्यावे. पाणी प्यायल्यामुळे शरीर हायड्रेट राहण्यास मदत होते. बाहेर गेल्यानंतर किंवा इतर वेळी घरी असताना शरीराला आवश्यक असलेल्या प्रमाणात पाण्याचे सेवन करावे. पाणी प्यायल्यामुळे आरोग्य सुधारते.
मॉइश्चरायझर त्वचेला हायड्रेट ठेवण्यास मदत करते. नियमित मॉइश्चरायझरचा वापर केल्यास त्वचेमधील ओलावा कायम टिकून राहतो आणि त्वचा ताजी टवटवीत दिसते. तसेच मॉइश्चरायझर लावताना तुमच्या त्वचा प्रकाराला सूट होईल असेच मॉइश्चरायझर लावावे. दिवसभरातून दोन वेळा मॉइश्चरायझरचा वापर करावा.
त्वचेच्या निरोगी आरोग्यासाठी नेहमी पोषण आहार घेणे आवश्यक आहे. रोजच्या आहारात काकडी, दही, दूध आणि इतर पौष्टिक पदार्थांचे सेवन केल्यास त्वचा सुंदर आणि चमकदार होण्यास मदत होते. तसेच दिवाळीमध्ये त्वचेला पोषण आणि ऑक्सिजन मिळावे यासाठी मेकअप करू नये.
हे देखील वाचा: हिवाळ्यात त्वचेवर हवा आहे नैसर्गिक ग्लो! मग अंघोळ केल्यानंतर त्वचेला लावा ‘हा’ पदार्थ, चेहरा दिसेल सुंदर
सुंदर आणि चमकदार त्वचेसाठी दिवसभरात दोन वेळा त्वचा स्वच्छ करणे गरजेचे आहे. त्वचेवरील घाण, धूळ, माती निघून जाण्यासाठी त्वचा पाण्याने स्वच्छ करणे आवश्यक आहे. कोणताही संसर्ग होऊ नये म्हणून हात पाय स्वच्छ करणे आवश्यक आहे. हातापायांच्या स्वच्छतेकडे लक्ष दिल्यास आरोग्य सुधारते.