यंदाच्या प्रॉमिस डे ला जोडीदाराला द्या हे खास वचन
फेब्रुवारी महिन्याला सुरुवात झाल्यानंतर प्रेमयुगुलांच्या मनात प्रेमाचे वारे वाहू लागतात. या महिन्यात व्हॅलेंटाईन वीक साजरा केला जातो. व्हॅलेंटाईन वीकमध्ये साजरा केला जाणारा प्रत्येक दिवस हा प्रेम आणि नातेसंबंध मजबूत करण्यासाठी साजरा केला जातो. 11 फेब्रुवारी रोजी साजरा केल्या जाणाऱ्या प्रॉमिस डे ला विशेष महत्व आहे. या दिवशी प्रेमी, मित्र आणि जवळचे व्यक्ती एकमेकांना वाचन देऊन प्रॉमिस डे साजरा करतात. ज्यामुळे दोन व्यक्तींमध्ये असलेले प्रेमाचे नाते आणखीन घट्ट होते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला जगभरात 11 फेब्रुवारीला प्रॉमिस डे का साजरा केला जातो? यामागे नेमका काय इतिहास आहे? याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य – iStock)
दोन व्यक्तींमध्ये नाते संबंध तयार होताना त्यांच्यामध्ये विश्वास असणे अतिशय महत्वाचे आहे. मग ते नाते मैत्रीचे असो किंवा प्रेमाचे. व्हॅलेंटाईन वीकच्या पाचव्या दिवशी म्हणजे प्रॉमिस डे ला नात्यांमधील विश्वास आणखीन घट्ट करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. या दिवशी लोक एकमेकांना प्रामाणिक, निष्ठावान राहण्याचे आणि नात्यात नेहमी एकत्र राहण्याचे वचन देतात. हे वचन दोन व्यक्तींमध्ये मर्यादीत नसून मित्र, जोडीदार, कुटुंबातील सदस्य आणि इतर जवळचे व्यक्तीसुद्धा एकमेकांना वचन देऊन हा दिवस आनंद आणि उत्साहाने साजरा करतात.
जगभरात सगळीकडे फेब्रुवारी महिन्यात व्हॅलेंटाईन वीक साजरा करून त्यातील प्रत्येक दिवस आनंद आणि उत्साहाने साजरे केले जातात. याशिवाय या दिवसाची कधीपासून सुरुवात झाली यावर कोणताही पुरावा नसल्याचे सांगण्यात आले आहे. प्रॉमिस डे संबंधित एका कथेनुसार, 1816 मध्ये राजकुमारी चार्लोटने तिच्या भावी पतीला प्रपोज केले होते. त्यानंतर त्यांच्यातील नातं आणखीन घट्ट होण्यासाठी त्यांनी एकमेकांना वचन दिली. त्यानंतर हळूहळू ही परंपरा पुढे चालत गेली आणि व्हॅलेंटाईन वीकमध्ये प्रॉमिस डे साजरा केला जाऊ लागला.
प्रत्येक व्यक्तीचे त्यांच्या जोडी दारासोबत असलेले नाते वेगळे आहे. त्यामुळे पुढील वचनांचे पालन केल्यास नात्यामध्ये कधीच तडे पडणार नाहीत- नात्यात प्रामाणिकपणा सर्वात महत्वाचा असतो. अशा परिस्थितीत, या प्रॉमिस डे ला, तुमच्या जोडीदाराला वचन द्या की,तुम्ही नेहमीच त्याच्याशी प्रामाणिक राहाल आणि तुमच्या मनातील सर्व काही त्याला पूर्ण सत्यतेने सांगाल.
व्हॅलेंटाईन डे येतोय, एकत्र वेळ घालवायचं आहे? नवी मुंबईतील ‘या’ ठिकाणांना नक्कीच भेट द्या
आदर आणि समजूतदारपणाचे वचन: तुम्ही त्यांच्या भावनांचा आदर कराल आणि प्रत्येक परिस्थितीत त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न करून त्यांना पूर्ण आदर द्याल.
विश्वास आणि निष्ठेचे वचन: तुम्ही त्यांचा विश्वास कधीही तोडणार नाही आणि नेहमीच एकनिष्ठ राहाल.
नेहमी आनंदी राहण्याचे वचन: तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत कायम आनंदी आणि सदैव त्यांच्या सोबत राहा.